Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुन्हा होणार धमाका! Apple ने केली नव्या ऑक्टोबर ईव्हेंटची घोषणा, होमपॉड मिनी अन् ॲपल टिव्हीची होऊ शकते एंट्री

Apple Welcome Home Event 2026: ॲपल पुन्हा एकदा एका मोठ्या ईव्हेंटचे आयोजन करणार आहे. हा ईव्हेंट पुढील आठवड्यात आयोजित केला जाणार आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी त्यांचे विविध डिव्हाईस सादर करणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 10, 2026 | 09:45 AM
पुन्हा होणार धमाका! Apple ने केली नव्या ऑक्टोबर ईव्हेंटची घोषणा, होमपॉड मिनी अन् ॲपल टिव्हीची होऊ शकते एंट्री

पुन्हा होणार धमाका! Apple ने केली नव्या ऑक्टोबर ईव्हेंटची घोषणा, होमपॉड मिनी अन् ॲपल टिव्हीची होऊ शकते एंट्री

Follow Us
Follow Us:
  • वेलकम होम ईव्हेंटचे पुढील आठवड्यात आयोजन
  • आगामी ईव्हेंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर
  • ऑक्टोबरच्या अखेरीस पुन्हा नव्या ईव्हेंटचे होऊ शकते आयोजन
Apple Event 2026: क्यूपर्टिनो बेस्ड टेक दिग्गज ॲपलने सप्टेंबर महिन्यात त्यांच्या मोठ्या लाँच ईव्हेंटचे आयोजन केले होते. त्यानंतर आता कंपनीने पुन्हा एकदा एका नव्या ईव्हेंटची घोषणा केली आहे. पुढील आठवड्यात दिग्गज टेक कंपनी एक मोठा ईव्हेंट आयोजित करणार आहे. कंपनीने या ईव्हेंटला वेलकम होम असे नाव दिले आहे. आगामी ईव्हेंटचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. कंपनी आपल्या ‘की-नोट’ प्रेजेंटेशनदरम्यान स्मार्ट होम आणि मनोरंजन डिव्हाईसची नवीन श्रेणी सादर करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितलं जात आहे.

10,200mAh बॅटरीसह Vivo चा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच! 120Hz डिस्प्ले अन् 90W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज… जाणून घ्या किंमत

कंपनीच्या नव्या डिव्हाईसची चर्चा

कंपनीच्या स्मार्ट होम हब, सेकेंड-जेनरेशन होमपॉड मिनी आणि नव्या ॲपल टिव्ही 4K सेट-टॉप बॉक्सबाबत सोशल मीडियावर गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरु आहेत. कंपनी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस देखील आणखी एका ईव्हेंटचे आयोजन करणार असल्याचे सांगितलं जात आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

Welcome home. October 13. https://t.co/ChelGSDOTI — Greg Joswiak (@gregjoz) October 8, 2026

एक्सवर शेअर केली पोस्ट

एक्सवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टनुसार, ॲपलचे सीनियर वाइस प्रेसिडेंट ऑफ वर्ल्डवाइड मार्केटिंग Greg Joswiak यांनी घोषणा केली आहे की, क्यूपर्टिनो बेस्ड टेक कंपनी 13 ऑक्टोबर रोजी त्यांच्या वेलकम होम ईव्हेंटचे आयोजन करणार आहे. टिझर व्हिडीओवरून असे संकेत मिळत आहेत की, कंपनी त्यांच्या ईव्हेंटदरम्यान सध्या चर्चेत असलेले होम डिव्हाईस लाँच करू शकते. याव्यतिरिक्त, यूट्यूबर आणि टेक रिव्यूअर मार्केस ब्राउनली (@MKBHD) यांनीही माध्यमांना पाठवल्या जाणाऱ्या ॲपलच्या निमंत्रण पत्रिकेचा फोटो शेअर केला आहे.

वेलकम होम ईव्हेंटचे आयोजन

ॲपल वेलकम होम ईव्हेंट न्यूयॉर्कच्या ट्रायबेकामध्ये आयोजित केला जाणार आहे आणि भारतीय वेळेनुसार हा ईव्हेंट संध्याकाळी 6.30 वाजता (ईस्टर्न वेळ सकाळी 9 वाजता) सुरु होणार आहे. कंपनी त्यांच्या अधिकृत युट्यूब चॅनेलद्वारे या ईव्हेंटचे लाईव्हस्ट्रिम करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या ईव्हेंटदरम्यान कंपनीचे पहिले स्मार्ट होम हब, होमपॉड मिनी (2026) आणि ॲपल टिव्ही 4K (2026) लाँच केले जाण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबरच्या अखेरीस होणार तिसरा ईव्हेंट

ब्लूमबर्गद्वारे शेअर करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार, ॲपल 27 ऑक्टोबर आणखी एका ईव्हेंटचे आयोजन करणार आहे. खरं असं झालं तर हा कंपनीच्या या वर्षातील तिसरा ईव्हेंट असू शकतो. या ईव्हेंटमध्ये कंपनी ॲपलचा पहिला मॅकबुक मॉडेल, M6 चिपसेटवाला नवीन मॅकबुक प्रो, M6 चिप अपग्रेडवाला नेक्स्ट-जेनरेशन आयमॅक आणि नवीन आयपॅड मिनी मॉडेल लाँच करण्याची शक्यता आहे. टचस्क्रीन वाले मॅकबुक बाजारात मॅकबुक अल्ट्रा या नावाने लाँच केले जाऊ शकते. कंपनीने अद्याप या गॅझेट्सचे कोणतेही डिटेल्स शेअर केले नाहीत.

Amazon Sale: नवा फोन खरेदीचं स्वप्न आता होणार पूर्ण! ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये मिळणार जबरदस्त डील्स अन् भरघोस सूट…

स्मार्ट होम हबच्या लीक्सबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 6-इंच किंवा 7-इंचाचा स्क्वेयर टचस्क्रीन डिस्प्ले मिळणार आहे, जो एका गोलाकार बेसला जोडलेला असू शकतो. या बेसमध्येच इन-बिल्ट स्पीकरची व्यवस्था असण्याचीही शक्यता आहे. हे स्मार्ट होम डिव्हाईस कथितपणे सिरी एआय क्षमता आणि ॲपलच्या ए18 चिपसेटसह लाँच होऊ शकते.

Web Title: Apple announces welcome home event on 13th october 2026 know which new products will launch hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 09:44 AM

Topics:  

  • apple
  • tech event
  • tech updates

संबंधित बातम्या

Amazon Sale: नवा फोन खरेदीचं स्वप्न आता होणार पूर्ण! ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये मिळणार जबरदस्त डील्स अन् भरघोस सूट…
1

Amazon Sale: नवा फोन खरेदीचं स्वप्न आता होणार पूर्ण! ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये मिळणार जबरदस्त डील्स अन् भरघोस सूट…

परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा
2

परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा

JioHotstar चा जागतिक विस्तार! आता मध्य पूर्वेतही मिळणार भारतीय मनोरंजनाचा खजिना, कंपनीने केली घोषणा
3

JioHotstar चा जागतिक विस्तार! आता मध्य पूर्वेतही मिळणार भारतीय मनोरंजनाचा खजिना, कंपनीने केली घोषणा

Tech Tips: स्मार्टफोनचा कॅमेरा झाला खराब? ब्लर फोटोंनी झालात हैराण? सर्विस सेंटरला जाण्यापूर्वी वापरा ‘या’ टिप्स
4

Tech Tips: स्मार्टफोनचा कॅमेरा झाला खराब? ब्लर फोटोंनी झालात हैराण? सर्विस सेंटरला जाण्यापूर्वी वापरा ‘या’ टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.