
Amazon Sale: नवा फोन खरेदीचं स्वप्न आता होणार पूर्ण! ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये मिळणार जबरदस्त डील्स अन् भरघोस सूट...
तसेच, स्मार्टफोनच्या खरेदीवर बँक ऑफर्स, एक्सचेंज बोनस आणि नो-कॉस्ट ईएमआयसारखे फायदे देखील मिळणार आहेत. त्यामुळे जर यंदाच्या फेस्टिव्ह सेलमध्ये तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर हा सेल तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो.
सॅमसंगने लाँच केलेला हा फ्लॅगशिप स्मार्टफोन सेलमध्ये अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. खरं तर या स्मार्टफोनची किंमत 1,29,999 रुपयांपासून सुरु होते. मात्र सेलमध्ये हा स्मार्टफोन केवळ 94,999 रुपयांत उपलब्ध आहे. तसेच कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर 10 हजार रुपयांचे कूपन डिस्काऊंट देखील देत आहे. या ऑफर्सनंतर फोनची किंमत 84,999 रुपये होणार आहे. एक्सचेंज ऑफर्सनंतर फोनची किंमत 70 हजार रुपयांपर्यंत कमी होऊ शकते.
सेलमध्ये ॲपल आयफोन 16 च्या किंमतीत देखील घसरण झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. आयफोन 16 ची किंमत 89,900 रुपये आहे. मात्र सेलमध्ये हा आयफोन मॉडेल केवळ 76,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. एसबीआय क्रेडिट कार्डच्या ईएमआई पर्यायाद्वारे तुम्हाला या फोनवर 1250 रुपयांपर्यंतची सवलत मिळू शकते, ज्यामुळे त्याची किंमत आणखी कमी होईल.
ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये वनप्लस नॉर्ड 6 वर देखील डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. या फोनची किंमत 52,999 रुपयांपासून सुरु होते. मात्र सेलमध्ये तुम्ही हा स्मार्टफोन 44,999 रुपयांत खरेदी करू शकता. एसबीआय क्रेडिट कार्ड ईएमआई पर्यायाद्वारे या फोनवरही 1250 रुपयांपर्यंतची सवलत उपलब्ध आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये डिव्हाईस 42 हजार रुपयांपर्यंत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
जर तुम्ही परवडणाऱ्या किमतीतील रेडमी फोनच्या शोधात असाल, तर सेलदरम्यान ‘रेडमी 15सी 5G प्राइम एडिशन’ हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. हा फोन केवळ 15,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. मात्र या स्मार्टफोनची मूळ किंमत 29,999 रुपये आहे.
JioHotstar चा जागतिक विस्तार! आता मध्य पूर्वेतही मिळणार भारतीय मनोरंजनाचा खजिना, कंपनीने केली घोषणा
सेलमध्ये लावा बोल्ड एन4 प्रो 5G हा स्मार्टफोन 15 हजार रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. सेलमध्ये हा स्मार्टफोन 14,999 रुपयांत उपलब्ध आहे. तर या फोनची किंमत 21,999 रुपये आहे. बँक ऑफर्सचा विचार करता, एसबीआय क्रेडिट कार्डच्या ईएमआय पर्यायाद्वारे या फोनवर 1250 रुपयांपर्यंतची सवलत उपलब्ध आहे, तर एक्सचेंज ऑफरद्वारे 14,200 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज मूल्य मिळवता येऊ शकते.