Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Appleचा पुढचा मोठा धमाका! iPhone 18 Pro Max मध्ये मिळणार ‘हे’ खास अपग्रेड

Apple: Appleच्या आगामी iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max सीरिजबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मॉडेल्समध्ये केवळ स्क्रीन किंवा बॅटरीमध्येच नव्हे, तर कॅमेऱ्याच्या फीचर्समध्येही फरक असू शकतो.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 20, 2026 | 11:33 AM
Appleचा पुढचा मोठा धमाका! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Appleचा पुढचा मोठा धमाका! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • iPhone 18 Pro Max मध्ये Variable Aperture कॅमेरा मिळण्याची शक्यता
  • iPhone 18 Pro मध्ये हे फीचर नसण्याची चर्चा
  • Appleकडून अद्याप अधिकृत पुष्टी नाही
I phone 18  vs I phone 18 pro:  Apple युर्जरसाठी मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून iPhone च्या नव्या सीरिजबाबत चर्चा सुरु होती. iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max हे दोन फिचर्स कधी येणार त्याच्यामध्ये नेमके काय फीचर्स असणार कॅमेरा कसा असेल याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होते. मात्र यावेळी दोन्ही फोनमध्ये फक्त स्क्रीन किंवा बॅटरीचाच फरक नसेल, तर कॅमेऱ्याच्या बाबतीतही मोठे अंतर ठेवले जाऊ शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, iPhone 18 Pro Max मध्ये Variable Aperture कॅमेरा मिळू शकतो तर छोट्या iPhone 18 Pro मध्ये हे फीचर नसण्याची शक्यता आहे. ही माहिती प्रसिद्ध टिपस्टर Ice Universe कडून समोर आली आहे. अर्थात, Apple कडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

मोठ्या फोनलाच खास कॅमेरा का?

Variable Aperture कॅमेऱ्यासाठी फोनच्या आत नेहमीच्या कॅमेऱ्यापेक्षा जास्त जागा लागते. त्यामुळे मोठ्या आकाराच्या Pro Max मॉडेलमध्ये हे हार्डवेअर बसवणे Apple साठी सोपे ठरु शकते.

iPhone 18 Pro Max हा आकाराने थोडा मोठा असेल, त्यामुळे या अतिरिक्त जागेचा वापर कंपनी कॅमेरा यंत्रणेसाठी करू शकते, असा अंदाज आहे. मात्र, Apple या तंत्रज्ञानाचा नेमका कसा वापर करणार आहे, याबाबत सध्या ठोस माहिती उपलब्ध नाही.

Variable Aperture म्हणजे नेमकं काय?

साध्या भाषेत सांगायचे झाले तर कॅमेऱ्याच्या लेन्समधून आत जाणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण बदलण्याची सुविधा म्हणजे Variable Aperture. उदाहरणार्थ, रात्री किंवा कमी उजेडात फोटो काढताना लेन्स अधिक उघडली तर जास्त प्रकाश कॅमेऱ्याच्या सेन्सरपर्यंत पोहोचतो. त्यामुळे फोटो अधिक उजळ दिसण्यास मदत होऊ शकते.

दुसरीकडे, खूप उजेड असताना लेन्सचे छिद्र कमी करता येते. त्यामुळे फोटोमधील अधिक भाग स्पष्ट ठेवण्यास मदत मिळू शकते. फोटोग्राफी करणाऱ्यांसाठी ही सुविधा नक्कीच उपयोगी ठरू शकते.

Pro आणि Pro Max नेमका काय फरक?

iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max मधील फरक यावेळी अधिक स्पष्ट होऊ शकतो. दोन्ही फोनची स्क्रीन आणि बॅटरी वेगळी असण्याची चर्चा तर आहेच; त्यात कॅमेऱ्याचे हे खास फीचर Pro Max ला आणखी प्रीमियम बनवू शकते. Apple ने यापूर्वीही असे केले आहे. iPhone 15 Pro Max मध्ये कंपनीने टेट्राप्रिझम टेलिफोटो कॅमेरा दिला होता. त्यावेळी छोट्या iPhone 15 Pro मध्ये हे फीचर नव्हते. मात्र, पुढील पिढीत Apple ने हे कॅमेरा तंत्रज्ञान दोन्ही Pro मॉडेल्समध्ये आणले.त्यामुळे iPhone 18 Pro Max ला मिळणारे Variable Aperture फीचर भविष्यात छोट्या Pro मॉडेलमध्येही येईल का, याकडे लक्ष असेल.

BGMI LITE : क्राफ्टन 2026 च्या अखेरपर्यंत BGMI LITE लाँच करणार. 25 ऑगस्टपासून अँड्रॉइड प्री-रजिस्ट्रेशन सुरू

फोन जाड आणि वजनदार होणार?

लीकमधून आणखी एक दावा समोर आला आहे. त्यानुसार iPhone 18 Pro Max चे वजन सुमारे 240 ग्रॅम आणि जाडी जवळपास 9 मिमी असू शकतो. म्हणजेच सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत फोन थोडा जड आणि जाड होण्याची शक्यता आहे. मोठी बॅटरी आणि नवीन कॅमेरा यंत्रणा बसवण्यासाठी फोनच्या बॉडीमध्ये अधिक जागा लागणार असल्याने हा बदल केला जाऊ शकतो, असा अंदाज आहे.

लवकरच भारतात होणार धमाका! Realme P4s 5G ची लाँच डेट जाहीर… जबरदस्त फीचर्स आणि बॅटरीचा तगडा कॉम्बो

आतमध्ये आणखी काय बदल होणार?

कॅमेऱ्याव्यतिरिक्त iPhone 18 Pro सीरिजमध्ये A20 Pro चिपसेट, मोठी बॅटरी आणि काही इतर हार्डवेअर सुधारणा मिळण्याची चर्चा आहे. त्यामुळे Apple यावेळी परफॉर्मन्ससोबत कॅमेरा आणि बॅटरीवरही भर देऊ शकते.पण सध्या या सगळ्या गोष्टी लीक आणि चर्चांवर आधारित आहेत. Apple ने कोणत्याही फीचरची अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे अंतिम फोन बाजारात आल्यानंतरच नेमकं काय मिळणार, हे स्पष्ट होईल.

Web Title: Apple iphone 18 pro max will have one big camera difference compared to the iphone 18 pro

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 11:33 AM

Topics:  

  • Apple Company
  • iphone users

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.