Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

या दिवशी लाँच होणार Apple चा नवीन फॅमिली मेंबर, टिम कुक ने जारी केली टीझर! युजर्सची उत्सुकता शिगेला…

iPhone SE सिरीजमधील नवीनतम मॉडेल या आठवड्यात लाँच होणार अश्या बातम्या समोर आल्या होत्या, पण हे लाँचिंग पूर्ण झाले नाही. आता असं सांगितलं जात आहे की, हा नवीन आणि स्वस्त आयफोन पुढील आठवड्यात लाँच होऊ शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 15, 2025 | 12:02 PM
या दिवशी लाँच होणार Apple चा नवीन फॅमिली मेंबर, टिम कुक ने जारी केली टीझर! युजर्सची उत्सुकता शिगेला...

या दिवशी लाँच होणार Apple चा नवीन फॅमिली मेंबर, टिम कुक ने जारी केली टीझर! युजर्सची उत्सुकता शिगेला...

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून टेक जायंट कंपनी अ‍ॅपलच्या नवीन आणि स्वस्त आयफोनची चर्चा सुरु आहे. कंपनीचा हा आगामी आयफोन iPhone SE 4 या नावाने लाँच केला जाऊ शकतो. हा आयफोन या आठवड्यात लाँच होणार अशी बातमी समोर आली होती, मात्र नंतर सांगण्यात आलं की, आगामी आयफोन पुढील आठवड्यात लाँच केला जाऊ शकतो. आणि आता अशातच अ‍ॅपलचे सिईओ टिम कुक यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे.

Realme GT 7 Pro Racing Edition: तगडा क्वालकॉम प्रोसेसर आणि पावरफुल बॅटरीसह लाँच झाला Realme चा स्वस्त स्मार्टफोन

अ‍ॅपलचे सिईओ टिम कुकने शेअर केलेल्या पोस्टमध्ये 19 फेब्रुवारी रोजी नवीन प्रोडक्ट लाँच करण्याची घोषणा केली. कुकने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पुढील आठवड्यात एक नवीन सदस्य अ‍ॅपल कुटुंबात सामील होणार आहे. कुटुंबातील नवीन सदस्याला भेटण्यासाठी तयार व्हा. त्यामुळे आता असा अंदाज लावला जात आहे की, नवीन iPhone SE 4 19 फेब्रुवारी रोजी लाँच केला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)

7 सेकंदांच्या या प्रमोशनल क्लिपमध्ये पुढील बुधवारी होणाऱ्या लाँचची झलक दाखवण्यात आली आहे. तथापि, सिईओ टिम कुकने मेटल अ‍ॅपल लोगोशिवाय इतर कोणतीही माहिती दिली नाही ज्याभोवती चमकदार रिंग आहे. हे नवीन डिव्हाईस अ‍ॅपल कुटुंबातील कोणत्या सेक्शनमध्ये सहभागी होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अ‍ॅपल त्यांच्या इकोसिस्टममध्ये मॅकबुक, आयपॅड, आयफोन आणि इतर अनेक उपकरणे ऑफर करते. टीझरनंतर, अ‍ॅपलच्या शेअर्समध्ये दोन टक्क्यांनी वाढ झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे असा दाट अंदाज लावला जात आहे की, 19 फेब्रुवारी रोजी आगामी स्वस्त आयफोन लाँच केला जाऊ शकतो.

Get ready to meet the newest member of the family.

Wednesday, February 19. #AppleLaunch pic.twitter.com/0ML0NfMedu

— Tim Cook (@tim_cook) February 13, 2025

iPhone SE 4 असेल का?

iPhone SE सिरीजमधील नवीनतम मॉडेल या आठवड्यात लाँच होणार होते. मात्र यानंतर काही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या ज्यामध्ये सांगण्यात आलं की, नवीन आयफोन मॉडेल पुढील आठवड्यात लाँच होणार आहे, असे सूचित केले गेले आहे. आणि अशातच अ‍ॅपल सिईओ कुकने देखील सोशल मीडियावर एक टिझर शेअर केला आहे. त्यामुळे आता iPhone SE 4 पुढील आठवड्यात लाँच होण्याची दाट शक्यता आहे.

iPhone SE मार्च 2016 मध्ये लाँच झाला आणि जुन्या iPhone 5 S सारख्याच आकारमानाचा हा एक परवडणारा स्मार्टफोन आहे. त्याच वेळी, दुसरी पिढी 2020 मध्ये लाँच करण्यात आली आणि तिसरी पिढी 2022 मध्ये ग्राहकांसाठी लाँच करण्यात आली. आता बहुचर्चित iPhone SE 4 जवळजवळ तीन वर्षांनी बाजारात येणार आहे. अहवालांनुसार, नवीन स्मार्टफोनमध्ये त्याच्या प्रोसेसर आणि डिझाइनमध्ये काही मोठे अपग्रेड दिसतील.

आतापर्यंत, अनेक अहवालांनी असे सुचवले आहे की iPhone SE 4 मध्ये iPhone 14 सारखीच रचना असू शकते, ज्यामध्ये कोपऱ्यांभोवती फ्लॅट रेल्स आणि एक नॉच असलेला मोठा 6.1-इंचाचा डिस्प्ले असू शकतो. सध्याच्या थर्ड जनरेशनच्या iPhone SE मध्ये 4.7 इंचाचा छोटा डिस्प्ले आहे, त्यामुळे मोठा डिस्प्ले खरोखरच एक मोठा अपडेट असेल.

पुन्हा पुन्हा लॅपटॉप चार्ज करून हैराण झालात? या स्मार्ट ट्रिक्सने वाढवता येईल लॅपटॉपची बॅटरी लाइफ

तसेच, वरच्या बाजूला असलेल्या नॉचमध्ये फेसटाइम एचडी कॅमेरा आणि बायोमेट्रिक सेन्सर असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे टच आयडी फिंगरप्रिंट सेन्सरची आवश्यकता नाहीशी होईल. कॅमेऱ्यांबद्दल बोलायचे झाले तर, फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह एकच 48 मेगापिक्सेल लेन्स असू शकतो. याशिवाय, फोनमध्ये काही Apple Intelligence वैशिष्ट्ये असू शकतात आणि कंपनीचा 5G सेल्युलर मॉडेम असलेले हे पहिले Apple डिव्हाइस देखील असू शकते.

Web Title: Apple is going to launch new product on 19 february tim cook released teaser on social media tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2025 | 12:02 PM

Topics:  

  • apple
  • Apple Company
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज
1

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या
2

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…
3

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…

करोडपती होण्याची सुवर्णसंधी! iPhone हॅक करा आणि मिळणार करोडो रुपये! Apple घेऊन आलाय आतापर्यंतचं सर्वात मोठं बक्षीस
4

करोडपती होण्याची सुवर्णसंधी! iPhone हॅक करा आणि मिळणार करोडो रुपये! Apple घेऊन आलाय आतापर्यंतचं सर्वात मोठं बक्षीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.