Realme GT 7 Pro Racing Edition: तगडा क्वालकॉम प्रोसेसर आणि पावरफुल बॅटरीसह लाँच झाला Realme चा स्वस्त स्मार्टफोन
Realme युजर्सना गेल्या अनेक दिवसांपासून ज्या स्मार्टफोनची प्रतिक्षा होती, तो म्हणजे Realme GT 7 Pro Racing Edition. आता अखेर Realme GT 7 Pro Racing Edition स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा प्रीमियम Snapdragon 8 Elite प्रोसेसर देण्यात आला आहे. क्वालकॉमचा प्रीमियम Snapdragon 8 Elite प्रोसेसरसह लाँच करण्यात आलेला Realme GT 7 Pro Racing Edition हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे.
कंपनीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये Realme GT 7 Pro हा स्मार्टफोन लाँच केला होता. आता कंपनीने या स्मार्टफोनचे नवीन एडीशन लाँच केलं आहे. Realme GT 7 Pro Racing Edition फोन गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लाँच झालेल्या Realme GT 7 Pro चे रेसिंग एडिशन आहे. Realme GT 7 Pro Racing Edition स्मार्टफोनमध्ये 1.5K OLED डिस्प्ले, Android 15 OS आणि 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट आहे. चला तर मग स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सवर नजर टाकूया. (फोटो सौजन्य – X)
Realme GT 7 Pro Racing Edition चीनमध्ये 3099 CNY म्हणजेच सुमारे 36,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. Snapdragon 8 Elite प्रोसेसरसह येणारा हा फोन थेट OnePlus Ace 5 Pro सोबत स्पर्धा करत आहे, ज्याची चीनमध्ये किंमत 3,399 CNY म्हणजेच सुमारे 40,400 रुपयांपासून सुरू होते. हा फोन Neptune Explorer Edition (ब्लू) आणि Star Trail Titanium रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
Realme GT 7 Pro Racing Edition व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये 12GB रॅम + 256GB, 16GB + 256GB, 12GB + 512GB आणि 16GB + 512GB यांचा समावेश आहे. 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 3,099 म्हणजेच सुमारे 36,900 रुपये आहे. 16GB + 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 3,399 म्हणजेच सुमारे 40,400 रुपये आहे. 12GB + 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 3,699 म्हणजेच सुमारे 44,000 रुपये आहे. 16GB + 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 3,999 म्हणजेच सुमारे 47,500 रुपये आहे.
Realme GT 7 Pro Racing Edition मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंचाचा 1.5K 8T LTPO OLED मायक्रो क्वाड-कर्व्ह डिस्प्ले आहे. यासोबतच फोनच्या डिस्प्लेमध्ये डॉल्बी व्हिजन, HDR10+ दिले आहे. या फोनमध्ये ग्राफिक्ससाठी क्वालकॉम Snapdragon 8 Elite प्रोसेसर आणि अॅड्रेनो जीपीयू आहे. हा फोन 16 जीबी पर्यंत रॅमला सपोर्ट करतो. हा Realme फोन Android 15 वर आधारित Realme UI 6.0 वर चालतो.
कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, फोनमध्ये ड्युअल कॅमेरा मॉड्यूल आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा 50MP Sony IMX896 आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) ला सपोर्ट करतो. यासोबतच फोनमध्ये 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देण्यात आला आहे. या फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.
Snapdragon 6 Gen 4: मिड-रेंज स्मार्टफोन्ससाठी क्वालकॉम घेऊन आलाय नवा प्रोसेसर, हे आहेत खास फीचर्स
या Realme फोनमध्ये 6,500mAh टायटन बॅटरी आहे, ज्यामध्ये 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. गेमिंगवेळी चार्जिंग करताना फोन गरम होऊ नये म्हणून, या फोनमध्ये बायपास चार्जिंग सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, या Realme फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 7, Bluetooth 5.4, NFC, GPS आणि USB Type-C पोर्ट आहे.