
आयफोन युजर्स तुम्हालाही Siri आवडत नाही का? Apple लवकरच मोठा बदल करण्याची शक्यता, साईड बटनमध्ये मिळणार ही खास सुविधा
खरं तर Apple ने त्यांच्या डेवलपर डॉक्यूमेंटेशनमध्ये कंफर्म केलं आहे की, iPhone यूजर्स लवकरच Siri ऐवजी थर्ड-पार्टी व्हॉईस असिस्टेंटचा वापर करू शकणार आहेत. यूजर्स iPhone च्या साइड बटनचा वापर करून थेट कोणत्याही थर्ड-पार्टी व्हॉईस असिस्टेंटला अॅक्टिव्हेट करू शकणार आहेत. ही सुविधा डेवलपर्सने अॅप अपडेट केल्यानंतरच योग्य पद्धतीने काम करणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
सध्या हे फीचर जगातील इतर कोणत्याही देशात उपलब्ध असेल की नाही याबाबत अद्याप माहिती देण्यात आली नाही. मात्र कंपनीने अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे की, हा ऑप्शन सध्या तरी केवळ जपानमधील आयफोन युजर्ससाठी रिलीज केला जाणार आहे. यासाठी, यूजर्सचे Apple अकाऊंट रीजन जपानमध्ये सेट करणे आवश्यक आहे आणि डिव्हाइस देखील जपानमध्ये असणे आवश्यक आहे.
रिपोर्ट्समध्ये असं सांगण्यात आलं आहे की, Apple ने हे पाऊल जपानमधील मोबाइल सॉफ्टवेअर कॉम्पिटिशन ॲक्ट गाईडलाइन्स उचललं आहे. असं देखील सांगितलं जात आहे की, कंपनी हे बदल स्थानिक नियमांचे पालन करूनच करणार आहे. हे बदल कोणत्याही ग्लोबल पॉलिसी अतंर्गत केले जात नाहीत.
थोडक्यात सांगायचं तर, Apple आयफोन यूजर्ससाठी एक मोठा बदल घेऊन येणार आहे. आता यूजर्स सिरीऐवजी थर्ड-पार्टी व्हॉईस असिटंटचा वापर करू शकणार आहेत. नवीन iOS अपडेटमध्ये यूजर्सना ही सुविधा मिळणार आहे. सध्या हे फीचर केवळ जापानमधील यूजर्ससाठी उपलब्ध आहे. सिरी अपग्रेड करण्यासाठी अॅपलने गुगलच्या जेमिनी मॉडेलचा वापर करण्याची योजना आखली आहे.
तर, जगभरातील यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. Apple Siri मध्ये मोठ्या प्रमाणात अपग्रेड करण्याची योजना आखत आहे. अहवाल असेही सूचित करतात की Apple पुढील वर्षी Siri साठी Google चे Gemini मॉडेल वापरण्यासाठी अंदाजे 1 बिलियन डॉलरचे पेमेंट करणार आहे.
Ans: Siri हा Apple चा व्हॉईस असिस्टंट आहे जो तुमचे आदेश ऐकून कामे करतो.
Ans: iPhone, iPad, Apple Watch, Mac, HomePod, AirPods आणि CarPlay वर Siri वापरता येते.
Ans: आपण "Hey Siri" म्हणू शकता किंवा iPhone च्या साइड बटनला लाँग-प्रेस करून Siri सुरू करता येतो.