Oppo Find X9: अखेर तो दिवस आलाच! नव्या स्मार्टफोन सिरीजची धमाकेदार भारतात एंट्री, किंमत ऐकून थक्क व्हाल, फीचर्सही भन्नाट
Oppo Find X9 Series Launched: स्मार्टफोन कंपनीने Oppo Find X9 सीरीज भारतात लाँच करण्यात आली आहे. कंपनीने या सिरीजमध्ये Oppo Find X9 आणि Find X9 Pro या दोन स्मार्टफोन्सचा समावेश केला आहे. Find X9 सीरीजमध्ये Hasselblad सह को-डेवलप करण्यात आलेला ट्रिपल रियर कॅमेरा सिस्टम दिली आहे. Find X9 आणि Find X9 Pro Android 16 वर बेस्ड ColorOS 16 वर आधारित आहेत. दोन्ही स्मार्टफोनच्या किंमती आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.
Oppo Find X9 ची किंमत भारतात 12GB+256GB व्हेरिअंटसाठी 74,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर या स्मार्टफोनच्या 16GB+512GB वर्जनची किंमत 84,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा लेटेस्ट स्मार्टफोन स्पेस ब्लॅक आण टाइटेनियम ग्रे या दोन रंगांत खरेदीसाठी उपलब्ध आहे.
Oppo Find X9 Pro हा स्मार्टफोन 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज या सिंगल व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्याची किंमत 1,09,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन येसिल्क व्हाइट आणि टाइटेनियम चारकोल या दोन रंगांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. Oppo Find X9 सीरीज 21 नोव्हेंबरपासून ओप्पो इंडिया स्टोअर, फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवरून खरेदी केला जाऊ शकतो. कंपनी Find X9 साठी Oppo Hasselblad Teleconverter Kit ला 29,999 रुपयांच्या किंमतीत विकत आहे. (फोटो सौजन्य – X)
डुअल-SIM (nano + nano) Oppo Find X9 ColorOS 16 वर आधारित आहे, जो Android 16 वर बेस्ड आहे. या स्मार्टफोनला 5 OS upgrades आणि 6 वर्षांचे SMR अपडेट्स देण्याचा दावा करण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये 6.59-इंच (1,256 × 2,760 pixels) AMOLED स्क्रीन दिली आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 460ppi पिक्सेल डेंसिटी आणि 3,600 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आहे. डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस 2 चे प्रोटेक्शन दिले आहे.
फोटोग्राफीसाठी, Oppo Find X9 मध्ये Hasselblad ट्यून्ड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या सेटअपमध्ये OIS सह 50-मेगापिक्सेल (f/1.6) Sony LYT-808 वाइड कॅमेरा, 50-मेगापिक्सेल (f/2.0) अल्ट्रावाइड कॅमेरा आणि OIS सह 50-मेगापिक्सेल (f/2.6) Sony LYT-600 टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32-मेगापिक्सेल Sony IMX615 कॅमेरा दिला आहे. कॅमेरा सिस्टम Oppo च्या नव्या Lumo Imaging Engine ने सुसज्ज आहे, जो कम्प्यूटेशनल फोटोग्राफी वापरतात.
Oppo Find X9 मध्ये 3nm MediaTek Dimensity 9500 चिपसेट आहे, ज्याला up to 16GB LPDDR5X रॅम आणि 512GB पर्यंत UFS 4.1 स्टोरेजसह जोडण्यात आलं आहे. यामध्ये 32,052.5 sq mm एरिया वाली VC कूलिंग सिस्टम आहे. यामध्ये हॅप्टिक्ससाठी एक X-axis लीनियर मोटर देखील दिली आहे.
Oppo Find X9 च्या कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये ब्लूटूथ 6.0, वाय-फाय 7, एन-एफ-सी, एआय लिंक-बूस्ट, ओप्पो आर-एफ चिप, यू-एस-बी 3.2, जन 1, टाइप-सी पोर्ट, जी-पी-एस, ग्लोनास, क्यू-झेड-एस-एस, गॅलिलिओ यांचा समावेश आहे. यामध्ये 3D अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट सेंसर आणि क्वाड-माइक्रोफोनसेटअप दिला आहे. ड्यूरेबिलिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये IP66 + IP68 + IP69 रेटिंग्स आणि फाइव-स्टार SGS ड्रॉप रेजिस्टेंस देखील आहे. Oppo Find X9 मध्ये 7,025mAh सिलिकॉन कार्बन बॅटरी आहे, जी 80W वायर्ड फास्ट चार्जिंग, 50W AirVOOC वायरलेस चार्जिंग आणि10W रिवर्स वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
Oppo Find X9 Pro मध्ये मोठा 6.78-inch 1,272 × 2,772 पिक्सेल AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 20:9 आस्पेक्ट रेश्यो, 3,600 निट्स पीक ब्राइटनेस आणि 450 ppi पिक्सेल डेंसिटी आहे. डिस्प्ले स्पेसिफिकेशन्स स्टँडर्ड मॉडेलसारखेच आहेत.
फोटोग्राफीसाठी Oppo Find X9 Pro मध्ये 50-मेगापिक्सेल (f/1.5) Sony LYT-828 प्रायमरी कॅमेरा आहे. ज्यामध्ये 1/1.28-इंच सेंसर, 23mm फोकल लेंथ आणि OIS सपोर्ट आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेल (f/2.0) Samsung ISOCELL 5KJN5 अल्ट्रावाइड लेंस (15mm फोकल लेंथ) आणि 200-मेगापिक्सेल (f/2.1) टेलीफोटो कॅमेरा (70mm फोकल लेंथ) आहे. फ्रंटला 50-मेगापिक्सेल (f/2.0) Samsung 5KJN5 सेल्फी कॅमेरा दिला आहे.
या व्हेरिअंटमध्ये Find X9 सारखा चिपसेट, स्टोरेज आणि सॉफ्टवेयर सपोर्ट आहे. कनेक्टिविटी फीचर्स स्टँडर्ड मॉडेलसारखेच आहेत. हँडसेटमध्ये 7,500mAh सिलिकॉन कार्बन बॅटरी आहे, जी 80W SuperVOOC वायर्ड, 50W AirVOOC AirVOOC वायरलेस आणि 10W रिवर्स वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
Ans: Oppo स्मार्टफोन्स Android वर चालतात आणि त्यावर ColorOS ची कस्टम UI मिळते.
Ans: हे मॉडेलनुसार बदलते, पण बहुतेक Oppo फोनमध्ये 4500mAh ते 5500mAh बॅटरी मिळते, ज्यामुळे एक दिवस सहज चालतो.
Ans: होय, SUPERVOOC किंवा VOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी बहुतेक मॉडेल्समध्ये असते.






