International Mens Day 2025: यंदा तुमच्या भावाला आणि वडीलांना करा खूश! गिफ्ट करा हे स्मार्टफोन्स, किंमत 15 हजारांहून कमी
या यादीमध्ये पहिला स्मार्टफोन सॅमसंगचा आहे, ज्याची किंमत सध्या 12,499 रुपये आहे. या डिव्हाईसमध्ये 6.7 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे, जो रोजच्या वापरासाठी अधिक चांगले व्हिज्युअल्स आणि चांगली ब्राइटनेस ऑफर करतो. या डिव्हाईसमध्ये Exynos चिपसेट आणि 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अशा लोकांसाठी बेस्ट ऑप्शन आहे, ज्यांना सॅमसंगचे एक दमदार डिव्हाईस खरेदी करण्याची इच्छा आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
मोटोरोलाच्या या स्मार्टफोनची किंमत 9999 रुपये आहे. या डिव्हाईसमध्ये ड्यूल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा सेकेंडरी कॅमेरा दिला आहे. एवढंच नाही तर या फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट सेल्फी कॅमेरा देखील दिला आहे. या डिव्हाईसमध्ये 5000 एमएएच बॅटरी आणि 6.5 इंच आईपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. कमी किंमतीत हे डिव्हाईस एक चांगला पर्याय आहे.
वीवोच्या या फोनची किंमत 14,999 रुपये आहे आणि यामध्ये 6.68-इंच IPS LCD डिस्प्ले आहे. हे डिव्हाईस 1000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. 6500mAh बॅटरी दिली आहे आणि स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 प्रोसेसर देखील आहे.
या यादीमधील चौथा स्मार्टफोन IQOO कंपनी चा आहे, हा स्मार्टफोन सध्या बाजारात 13,998 रुपयांत उपलब्ध आहे. या फोनमध्ये मीडियाटेक 7300 चिपसेट आणि 6,500 ची मोठी बॅटरी आहे. फोनमध्ये 6.72 इंचाचा IPS LCD डिस्प्ले देखील आहे. या डीव्हीसमध्ये 50 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा सेल्फी कैमरा आहे. हा स्मार्टफोन एक चांगला आणि बजेट फ्रेंडली ऑप्शन आहे.
या यादीमध्ये पाचवा स्मार्टफोन Realme चा आहे. या व्हेरिएंटची किंमत 11,499 रुपये आहे. या फोनमधे 120Hz रिफ्रेश रेट वाला 6.72-इंच डिस्प्ले आणि MediaTek Dimensity 6400 प्रोसेसर आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 6,000mAh ची मोठी बॅटरी आहे. या स्मार्टफोनमध्ये चांगली 5G कनेक्टिविटी आणि अधिक चांगला परफॉर्मेंस देण्यात आला आहे.
Ans: हा दिवस पुरुषांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी, त्यांचे आरोग्य, मानसिक स्वास्थ्य आणि सामाजिक जबाबदाऱ्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.
Ans: प्रत्येक वर्षी 19 नोव्हेंबर रोजी
Ans: पहिल्यांदा 1999 मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे.






