Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone Price Hike: नवा आयफोन ग्राहकांच्या खिशाला लावणार कात्री? लाँचपूर्वीच Tim Cook यांनी दिली मोठी हिंट

iPhone Price Update: आगामी आयफोन 18 मॉडेल्स लाँच होण्यापूर्वीच त्यांच्याबाबत सतत नवीन अपडेट्स समोर येत आहेत. कधी आयफोनची लाँच डेट तर आगामी आयफोनचे फीचर्स... पण आता आगामी आयफोनच्या किंमतींबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ज्यामुळे सर्वच ग्राहकांना धक्का बसला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 20, 2026 | 09:18 AM
iPhone Price Hike: नवा आयफोन ग्राहकांच्या खिशाला लावणार कात्री? लाँचपूर्वीच Tim Cook यांनी दिली मोठी हिंट

iPhone Price Hike: नवा आयफोन ग्राहकांच्या खिशाला लावणार कात्री? लाँचपूर्वीच Tim Cook यांनी दिली मोठी हिंट

Follow Us
Follow Us:
  • मेमरी आणि स्टोरेज चिप्सच्या वाढत्या किमतींमुळे आयफोन 18 आणि आयफोन 18 प्रो मॉडेल्स महाग होण्याची शक्यता आहे.
  • टिम कुक यांनी वाढता उत्पादन खर्च आता ग्राहकांपासून लपवणे शक्य नसल्याचे संकेत दिले आहेत.
  • काही रिपोर्ट्सनुसार iPhone 18 Pro च्या किंमतीत 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.
गेल्या काही काळापासून स्मार्टफोनच्या किंमतीमध्ये सतत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सॅमसंग आणि शाओमी सारख्या टेक कंपन्यांनी आधीच त्यांच्या ग्राहकांना झटका देत स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ केली आहे. आता या शर्यतीत टेक कंपनी अ‍ॅपलचा आयफोन देखील समाविष्ट होणार आहे. कारण असे संकेत मिळाले आहेत की, आगामी आयफोन 18 आणि आयफोन 18 प्रो मॉडेल्सच्या किंमतीत मोठी वाढ होऊ शकते.

Father’s Day Gift: शर्ट किंवा चॉकलेट नाही… यंदा तुमच्या बाबांना द्या हे बेस्ट गॅझेट्स, दिवस बनेल अधिक संस्मरणीय

आयफोन खरेदीसाठी मोजावे लागणार जास्त पैसे?

आतापर्यंत अनेकजण असा अंदाज वर्तवत होते की, आगामी आयफोन 18 आणि आयफोन 18 प्रो मॉडेल्स गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या आयफोन मॉडेल्सच्या किंमतीत लाँच केले जाऊ शकतात. मात्र आता टिम कुक यांनी आशांवर पाणी फेरले आहे. टिम कुक म्हणाले आहे की, स्टोरेज आणि मेमोरी चिप यांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढत आहे, याचा परिणाम आयफोनच्या किंमतीवर देखील होणार आहे. आगामी आयफोनच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

आगामी आयफोनच्या किंमतीबाबत टिम कुक काय म्हणाले?

अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत टिम कुक यांनी म्हटलं आहे की, दरवाढ थांबवता येणार नाही. आतापर्यंत आम्ही आमच्यावर येणारा भार संभाळत होतो आणि यापासून ग्राहकांना वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र आता ही परिस्थिती संभाळली जाऊ शकत नाही. तथापी, यावेळी टिम कुक यांनी आयफोन 18 मॉडेल्सच्या किंमतींचा थेट उल्लेख केला नसला तरी देखील आता असं मानलं जात आहे की, आगामी काळात लाँच होणाऱ्या आयफोनसोबतच आयपॅडच्या किंमतीवर देखील मोठा परिणाम होऊ शकतो. हे डिव्हाईस खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागू शकतात.

नवीन आयफोनच्या किंमती किती वाढू शकतात?

समोर आलेल्या काही रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, अ‍ॅपल त्यांचा सध्याचा नफा टिकवून ठेवण्यासाठी आयफोन 18 प्रो च्या किंमतीत सुमारे 25 ते 30 हजार रुपयांची वाढ करू शकतो. कंपनी आयफोनच्या किंमती स्टोरेजच्या हिशोबाने ठरवू शकतो. आयफोन 17 प्रो च्या एक मॉडेलमध्ये 12GB रॅमसाठी कंपनीने 39 डॉलर म्हणजेच सुमारे 3700 रुपये दिले होते. मात्र आयफोन 18 प्रो मॉडेलमध्ये इतक्याच रॅमसाठी कंपनीला सुमारे 14,000 रुपये खर्च करावे लागू शकतात. बेस मॉडेलच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, स्टोरेजची किंमत 13 डॉलर म्हणजेच सुमारे 1228 रुपयांहून वाढून 51 डॉलर म्हणजेच सुमारे 4820 रुपये होण्याची शक्यता आहे.

Father’s Day 2026: फादर्स डे सेलिब्रेशन होणार खास; Google Gemini ने बनवा क्रिएटिव्ह फोटो, हे आहेत प्रॉम्प्ट्स

अ‍ॅपलचा खर्च किती वाढला?

कंपनीला आयफोन 17 प्रो चे पार्ट्स आणि उत्पादनासाठी 530 डॉलर म्हणजेच सुमारे 50,000 रुपये खर्च करावे लागले होते. मात्र आता मेमोरी चिप्सच्या किंमती वाढल्यामुळे कंपनीला आयफोन 18 प्रो मॉडेलच्या उत्पादनासाठी 726 डॉलर म्हणजेच सुमारे 69,000 रुपये खर्च करावे लागण्याची शक्यता आहे. याशिवाय कंपनी त्यांच्या आगामी आयफोनमध्ये अपग्रेडेड कॅमेरा सिस्टिम देण्याचा देखील विचार करत आहे. ज्यामुळे डिव्हाईसची किंमत आणखी वाढू शकते. कंपनीचे प्रॉफिट मार्जिन आणि प्राइसिंग स्ट्रॅटजीचा विचार केला तर आयफोन 18 प्रो अमेरिकेत 1399 डॉलर म्हणजेच सुमारे 1,32,244 रुपयांच्या किंमतीत लाँच केला जाऊ शकतो.

Web Title: Apple may launch iphone 18 models at high price because of memory chip crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 09:16 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
1

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

IIT बॉम्बे विद्यार्थी मृत्यू प्रकरण; परीक्षा हॉल ते हॉस्टेलदरम्यान साहिल कुठे होता? iPhone 17 मधील डेटा ठरू शकतो महत्त्वाचा
2

IIT बॉम्बे विद्यार्थी मृत्यू प्रकरण; परीक्षा हॉल ते हॉस्टेलदरम्यान साहिल कुठे होता? iPhone 17 मधील डेटा ठरू शकतो महत्त्वाचा

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी
3

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर
4

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.