Jio Recharge Plan: जिओचा भन्नाट प्लॅन! डेटा, कॉलिंग, ओटीटी अन् बरंच काही... जाणून घ्या किंमत आणि व्हॅलिडिटी
जिओच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 749 रुपये आहे. या प्लॅनमध्ये 72 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. त्यामुळे एकदा रिचार्ज प्लॅन खरेदी केल्यानंतर दोन महिने पुन्हा रिचार्ज खरेदी करण्याची आवश्यकता नाही. जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये कोणते फायदे मिळणार, याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Pinterest)
जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 164GB डेटा ऑफर केला जाणार आहे. तसेच, या प्लॅनमध्ये दररोज यूजर्सना 2GB हाय-स्पीड डेटा देखील मिळणार आहे. डेली डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps होणार आहे. तर कॉलिंगसाठी या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील ऑफर केली जाणार आहे. यासोबतच या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएसची सुविधा देखील मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 72 दिवसांची आहे. इतकंच नाही तर हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना अनलिमिटेड 5G डेटाचा लाभ देखील मिळणार आहे. मात्र यासाठी तुमच्या क्षेत्रात 5G नेटवर्क आणि तुमच्याकडे 5G सपोर्टेड डिव्हाईस असणं गरजेचं आहे.
या जिओ प्लॅनमध्ये यूजर्सना जिओहॉटस्टार मोबाईल सब्सक्रिप्शन देखील मोफत मिळणार आहे. याद्वारे तुम्ही तुमच्या मोबाईलवर जिओहॉटस्टारचा कंटेट पाहू शकता. यासोबतच यामध्ये जिओएआयक्लाऊडचे 50GB फ्री स्टोरेज मिळणार आहे. यासोबतच यामध्ये 12 महिन्यांसाठी कॅनव्हा प्रो लाईटचे सब्सक्रिप्शन देखील मोफत मिळणार आहे. म्हणजेच हा प्लॅन यूजर्सना केवळ डेटा, कॉलिंग आणि एसएमएसच नाही तर जिओहॉटस्टार मोबाईल सब्सक्रिप्शन आणि कॅनव्हा प्रो लाईटचे सब्सक्रिप्शन देखील ऑफर करत आहे.
Ans: जिओच्या ₹749 रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 72 दिवसांची वैधता मिळते.
Ans: या प्लॅनमध्ये एकूण 164GB डेटा मिळतो. यामध्ये दररोज 2GB हाय-स्पीड डेटा आणि अतिरिक्त 20GB डेटा समाविष्ट आहे.
Ans: होय, या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते.






