Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मध्यरात्री Apple Store मध्ये गोंधळ! मास्क घातला, चेहला लपवला आणि केली iPhones ची चोरी; Video Viral

अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडत आहे. लॉस एंजेलिसमध्ये गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेले हे निदर्शने सोमवारी रात्री (९ जून) पूर्णपणे अनियंत्रित झाली.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 11, 2025 | 11:19 AM
मध्यरात्री Apple Store मध्ये गोंधळ! मास्क घातला, चेहला लपवला आणि केली iPhones ची चोरी; Video Viral

मध्यरात्री Apple Store मध्ये गोंधळ! मास्क घातला, चेहला लपवला आणि केली iPhones ची चोरी; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

अमेरिकेच्या लॉस एंजेलिस शहरात एक मोठी घटना घडली आहे. मध्यरात्री चक्क येथील Apple Store मध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) च्या छाप्यांविरुद्ध सुरू असलेल्या निदर्शनांनी आता हिंसक वळण घेतले आहे. गेल्या 5 दिवसांपासून या छाप्यांविरुद्ध निदर्शनं सुरु आहेत. मात्र 9 जून रोजी रात्री निदर्शनांनी हिंसक वळण घेतले. यावेळी निदर्शकांनी डाउनटाउन लॉस एंजेलिस येथील प्रमुख रिटेल स्टोर्सनना त्यांचा निशाणा बनवला.

Realme लाँच करणार तगडा Smartphone, ‘लाँग लास्टिंग बॅटरी चँपियन’ आणि असे असणार फीचर्स! किती असेल किंमत जाणून घ्या

मध्यरात्री गोंधळ आणि आयफोन्सची चोरी

निदर्शकांनी लॉस एंजेलिस येथील अ‍ॅपल स्टोअरमध्ये मध्यरात्री गोंधळ घातला आणि आयफोन्सची चोरी केली. ICE ने केलेल्या कारवाईनंतर ही घटना घडली आहे. अ‍ॅपल स्टोअर, जॉर्डन फ्लॅगशिप स्टोअर, एडिडास स्टोअर, एक फार्मेसी आणि एक ज्वेलरी स्टोअरमध्ये निदर्शकांनी गोंधळ घातला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. निदर्शकांनी या दुकांनांची तोडफोड केली आणि दुकानातील सर्व सामानाची चोरी केली. (फोटो सौजन्य – X) 

Apple store in downtown LA being looted tonight pic.twitter.com/3k5i7wKiSG — Brendan Gutenschwager (@BGOnTheScene) June 10, 2025

Apple Store मध्ये झाली चोरी

एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये असं दिसत आहे की, मोठ्या संख्येने लोकं Apple Store मध्ये घुसले आणि त्यांनी स्टोअरच्या काचा फोडल्या. याशिवाय Apple Store मध्ये असणाऱ्या आयफोन्स आणि आयपॅडची देखील चोरी केली. या सर्वांनी चेहऱ्याला मास्क लावला होता आणि चेहरा लपवला होता. या संपूर्ण घटनेनंतर काही लोकं खिडक्या फोडून बाहेर पळताना दिसले. दुकानाच्या खिडक्यांवर ग्रॅफिटी देखील रंगवली गेली आणि महागडे इलेक्ट्रॉनिक्स सामान चोरीला गेले. एका दागिन्यांच्या दुकानाचेही मोठे नुकसान झाले. या दुकानात देखील निदर्शकांनी गोंधळ घातला आणि सर्व सामानाची चोरी केली.

एका महिलेला अटक

लॉस एंजेलिस पोलिस विभाग (LAPD) चे अधिकारी क्रिस मिलर यांनी सांगितलं आहे की, Apple Store मधून चोरी करत असलेल्या लोकांपैकी एका आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. याशिवाय अन्य 2 लोकांना देखील चोरीच्या संशायाखाली ताब्यात घेतलं आहे. LAPD ने आतापर्यंत 100 हून अधिक लोकांना अटक केली आहे. ज्यातील 21 लोकांना 8 जून रोजी ताब्यात घेतलं होतं. अटक करण्यात आलेल्या एकावर मोलोटोव्ह कॉकटेलने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

Google Fraud Alert: तुमच्या स्मार्टफोनमधून आत्ताच डिलीट करा हे 9 Apps, अन्यथा हॅकर्स रिकामं करतील तुमचं बँक अकाऊंट

प्रशासनाने काय सांगितलं?

लॉस एंजेलिसच्या महापौर करेन बैस यांनी सांगितलं की, जे लोक शहराच्या मध्यभागी तोडफोड आणि लूटमार करत आहेत त्यांना आपल्या प्रवासी समुदायांबद्दल काहीही आदर नाही. त्यांना जबाबदार धरले जाईल.

Web Title: Apple store of america los angeles looted by protestors video viral tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 11:19 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
1

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
2

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Flipkart Big Festival Dhamaka 2025: बिग बिलीयन डेजमधून शॉपिंग करून थकलात? फ्लिपकार्ट करणार पुन्हा नवा धमाका
3

Flipkart Big Festival Dhamaka 2025: बिग बिलीयन डेजमधून शॉपिंग करून थकलात? फ्लिपकार्ट करणार पुन्हा नवा धमाका

Samsung Galaxy Z TriFold: कधी लाँच होणार सॅमसंगचा ट्रिपल स्क्रीनवाला फोन? लाँच डेट आली समोर, असे असतील फीचर्स
4

Samsung Galaxy Z TriFold: कधी लाँच होणार सॅमसंगचा ट्रिपल स्क्रीनवाला फोन? लाँच डेट आली समोर, असे असतील फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.