Realme लाँच करणार तगडा Smartphone, 'लाँग लास्टिंग बॅटरी चँपियन' आणि असे असणार फीचर्स! किती असेल किंमत जाणून घ्या
Realme लवकरच त्यांचा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. आगामी स्मार्टफोन Realme Narzo 80 Lite या नावाने लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनची बॅटरी पावरफुल असणार आहे, त्यामुळे युजर्स दिर्घकाळासाठी फोनचा वापर करू शकणार आहेत. Realme च्या आगामी स्मार्टफोनची मायक्रोसाईट अॅमेझॉनवर लाईव्ह झाली आहे. Realme Narzo 80 Lite हा Realme Narzo 80 सिरीजमधील तिसरा डिव्हाईस असणार आहे. आगामी डिव्हाईसचे अनेक स्पेसिफिकेशन्स सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. आगामी स्मार्टफोनमध्ये कोणते स्पेसिफिकेशन दिले जाणार आहे आणि त्याची किंमत काय असणार आहे, याचे काही लिक्स देखील समोर आले आहेत.
Realme Narzo 80 Lite लाँच झाल्यानंतर ग्राहक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवरून या स्मार्टफोनची खरेदी करू शकणार आहेत. या डिव्हाईस लाँचिंगच्या आधीच कंपनीने या स्मार्टफोनला भारतातील लाँग लास्टिंग बॅटरी चँपियन म्हटलं आहे. या स्मार्टफोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी दिली जाणार आहे. ही बॅटरी या स्मार्टफोन लाइनअपच्या इतर फोनमध्ये देखील देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये रिवर्स चार्जिंग फीचर देखील दिलं जाण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – X)
Realme Narzo 80 Lite 5G launching soon in India 🇮🇳
Rebranded Realme C73 5G 😴 #realme #realmeNarzo80Lite pic.twitter.com/cTwwn4yZYy — Tech Home (@TechHome100) June 7, 2025
एकदा चार्ज केल्यानंतर Realme Narzo 80 Lite मध्ये तुम्ही 46 तास फोनवर बोलू शकता. एकदा चार्ज केल्यानंतर, हे डिव्हाईस इंस्टाग्राम सुमारे 18 तास आणि युट्यूब 15.7 तास सतत चालणवण्यासाठी सक्षम असणार आहे. कंपनीने अद्याप लाँचिंगची नेमकी तारीख जाहीर केलेली नाही, मात्र आगामी स्मार्टफोन फक्त भारतात लाँच होण्याची पुष्टी केली आहे.
Realme Narzo 80 Lite हा स्मार्टफोन स्लिम डिझाइनसह लाँच जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या स्मार्टफोनची जाडी 7.94mm आहे. हा फोन जांभळ्या आणि काळ्या रंगात लाँच केला जाऊ शकतो. हा फोन ट्रिपल कॅमेरा डिझाइनसह येईल, असं देखील सांगितलं जात आहे. या स्मार्टफोनमध्ये उजव्या बाजूला पॉवर बटण आणि व्हॉल्यूम बटण दिलं जाणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे. डिझाइनच्या बाबतीत, हा फोन लाइनअपमधील इतर दोन फोनपेक्षा थोडा वेगळा असेल. रिपोर्टनुसार, हा आगामी स्मार्टफोन 4GB + 128GB आणि 6GB + 128GB व्हेरिअंटमध्ये लाँच केला जाणार आहे.
Samsung करणार मोठा धमाका! लवकरच लाँच करणार पहिला ट्राय-फोल्ड स्मार्टफोन, किंमतही आली समोर
Realme Narzo 80 Lite स्मार्टफोनची किंमत काय असणार याबाबत कंपनीने अधिकृतपणे कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र हा या सिरीजमधील सर्वात अफोर्डेबल फोन असणार आहे. Realme Narzo ची किंमत 19,999 रुपयांपासून सुरु होते.