iPhone 17 Series launch: Apple यावर्षी लाँच नाही करणार हे 5 डिव्हाईस? समोर आली लिस्ट
सप्टेंबर महिना पुन्हा एकदा खास ठरणार आहे. कारण दरवर्षी प्रमाणे पुन्हा एकदा सप्टेंबर महिन्यात टेक जायंट कंपनी अॅपलच्या सर्वात मोठ्या ईव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे. या ईव्हेंटचे पूर्ण तयारी झाली आहे. 9 सप्टेंबर रोजी ईव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे. या ईव्हेंटमध्ये कोणते डिव्हाईस लाँच केले जाणार, याची लिस्ट समोर आली आहे. 9 सप्टेंबर रोजी ‘Awe Dropping’ ईव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी नवीन आयफोन सिरीज 17 सह अनेक प्रोडक्ट्स लाँच करणार आहे.
आगामी ईव्हेंटमध्ये कंपनी कोणते प्रोडक्ट्स लाँच करणार आहे, याची लिस्ट समोर आली आहे. त्याचप्रमाणे या ईव्हेंटमध्ये कोणते प्रोडक्ट्स लाँच केले जाणार नाहीत, याची लिस्ट देखील समोर आली आहे. काही डिव्हाइसेस अॅपल या वर्षी लाँच करणार नाही. पण हे डिव्हाईस पुढच्या वर्षी लाँच केले जाऊ शकतात किंवा या वर्षापासून हे डिव्हाईस बंद केले जाऊ शकतात. चला जाणून घेऊया कोणते 5 अॅपल डिव्हाइसेस आहेत जे आगामी ईव्हेंटमध्ये लाँच होणार नाहीत. (फोटो सौजन्य – Pinterest)
रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं जात आहे की, यावर्षी ईव्हेंटमध्ये कंपनी iPhone, MacBook आणि iPad सह इतर काही डिव्हाईस लाँच करणार नाहीत. या डिव्हाईसची माहिती समोर आली आहे. आगामी ईव्हेंटमध्ये कोणते डिव्हाईस लाँच होणार नाहीत, याबाबत जाणून घेऊया
Apple ने iPhone 14 सीरीजनंतर iPhone चे खास Plus व्हेरिअंट लाँच केले होते. हे व्हेरिअंट iPhone 16 सिरीजमध्ये देखील लाँच करण्यात आले होते. मात्र आता अशी शक्यता वर्तवली जात आहे की, यावेळी टेक दिग्गज कंपनी iPhone 17 च्या लॉचिंगसह प्लस मॉडेल पूर्णपणे बंद करू शकते. या मॉडेलऐवजी कंपनी यावेळी ऑल न्यू iPhone 17 Air लाँच करण्याची शक्यता आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने त्यांचा स्वस्त iPhone 16e लाँच केला होता. मात्र आता अपमिंग इव्हेंटमध्ये कंपनी हे मॉडेल लाँच करण्याची शक्यता नाही.
Apple चे M-सीरीज MacBooks बाजारात सर्वात प्रसिद्ध लॅपटॉप आहेत. मात्र आता अनेकांना अशी आशा आहे की यावेळी कंपनी त्यांच्या इव्हेंटमध्ये M5 चिपसेट लाँच करू शकते. याची अनेक लोकं अगदी आतुरतेने वाट बघत आहेत. त्यामुळे अशी शक्यता आहे की, 9 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या इव्हेंटमध्ये कंपनी M5 MacBook लाँच करणार नाही.
केवळ MacBook च नाही तर आगामी इव्हेंटमध्ये कंपनी कोणताही iPad देखील लाँच करणार नाही. iPad Pro, M-सीरीज चिपसेटसह पोर्टेबल फॉर्म फॅक्टरमध्ये पावरफुल परफॉर्मंस ऑफर करतो.
9 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या इव्हेंटमध्ये iPad Air आणि iPad 12 देखील लाँच होणार नाही. हे दोन्ही डिव्हाइस प्रो च्या तुलनेत आयपॅडचे अधिक परवडणारे मॉडेल आहेत.