iPhone 17 Series launch: लाँचपूर्वीच लीक झाला iPhone 17 Air चा ढासू लूक! असे असतील सर्वात पातळ आयफोनचे फीचर्स
iPhone 17 Air: Apple 9 सप्टेंबर रोजी त्यांची नवीन आयफोन सिरीज लाँच करणार आहे. यावेळी कंपनीने त्यांच्या आगामी आयफोन सिरीजमध्ये अनेक बदल केले आहेत. तसेच यावेळी कंपनी एक नवीन मॉडेल देखील लाँच करणार आहे. हे मॉडेल म्हणजे iPhone 17 Air. iPhone 17 Air हा आतापर्यंतचा सर्वात पातळ आयफोन असणार आहे. या मॉडेलबाबत सतत नवीन अपडेट्स समोर येत आहेत. येत्या काही तासांतच नवीन आयफोन सिरीज लाँच केली जाणार आहे. मात्र या लाँचिंगपूर्वीच iPhone 17 Air लूक लिक झाला आहे. iPhone 17 Air च्या फीचर्सचा देखील खुलासा झाला आहे.
iPhone 17 Series launch: iPhone 17 Pro Max मध्ये बॅटरीपासून कॅमेऱ्यापर्यंत… होणार हे 5 मोठे अपग्रेड
iPhone 17 सीरीजमध्ये यावेळी चार मॉडेल्सचा समावेश असणार आहे. यामध्ये iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max हे मॉडेल्स लाँच केले जाणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, यावेळी कंपनी iPhone 17 Plus हटवून iPhone 17 Air लाँच करणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
MacRumors ने शेअर केलेल्या एका रिपोर्टनुसार, Dbrand, Nudient आणि Pitaka सारख्या कंपन्यांनी iPhone 17 Air चे केस लिस्ट केले आहे. या केसद्वारे माहिती मिळत आहे की, आयफोनचा कॅमेरा कटआउट iPhone 16e सारखा असेल, म्हणजेच त्यात सिंगल रियर कॅमेरा असू शकतो. ही माहिती ड्युअल कॅमेरा सेटअपच्या पूर्वीच्या दाव्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. याशिवाय, केस डिझाइनमध्ये स्क्रीन आकाराबद्दल देखील संकेत देण्यात आले आहेत.
लीक झालेल्या रिपोर्टनुसार असा अंदाज लावला जाऊ शकतो की, iPhone 17 Air मध्ये काही महत्त्वाचे आणि जबरदसत बदल आणि फीचर्स पाहायला मिळणार आहेत. हा आयफोन मॉडेल 256GB, 512GB आणि 1TB या तीन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. तसेच डिझाईनच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा आतापर्यंतचा सर्वात पातळ आयफोन असणार आहे. या आयफोनची जाडी केवळ 5.5mm असणार आहे. तसेच या आयफोन मॉडेलमध्ये नवीन A18 Bionic चिपसेट प्रोसेसर पहायला मिळणार आहे. तसेच यामध्ये इनबिल्ट Apple Intelligence फीचरसह 48MP चा रियर कॅमेरा आणि एक एक्शन बटन आणि कैप्चर बटन देखील दिला जाण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर यावेळी तुम्हाला फोनमध्ये फिजिकल सिमऐवजी ई-सिम दिसू शकेल.
iPhone 17 Air केवळ त्याच्या स्लिम डिझाईनमुळेच चर्चेत नाही तर ही चर्चा iPhone 17 Air च्या नवीन प्रोसेसर, दमदार कॅमेरा आणि पोर्टलेस डिझाइनबाबत देखील आहे. या लीक्समुळे iPhone 17 Air बाबतची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. असा विश्वास आहे की iPhone 17 Air सॅमसंगच्या सर्वात पातळ फोन Samsung Galaxy S25 Edge ला कडक स्पर्धा देऊ शकेल.