Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Monsoon Bike Care : पावसाळ्यात बाईक राइडचा प्लॅन आहे? आधी जाणून घ्या ‘या’ 5 महत्त्वाच्या गोष्टी

Monsoon Bike Care : रोज ऑफिस, कॉलेज किंवा इतर कामासाठी बाईक किंवा स्कूटर वापरणाऱ्यांनी या दिवसांत थोडी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. काही सध्या सवयी अंगीकारल्या तर पावसातील प्रवास अधिक सुरक्षित आणि निर्धास्त होऊ शकतो.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 16, 2026 | 03:22 PM
Monsoon Bike (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Monsoon Bike (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

पावसाळ्यात अनेकजण बाईक राइडचा विचार करतात.

मस्त पावसात बाईक चालवण्याचा काही वेगळाच अनुभव असतो

परंतू पावसात काही चालवण्याच्या आधी ‘या’ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.. 

 

पावसाळा सुरु झाला की वातावरणात आल्हाददायक होतं, पण दुचाकी चालवणाऱ्यांसाठी हा काळ तितकाच धोकादायकही असतो. रस्त्यावर चिखल, पाणी, खड्डे आणि कमी दिसणारा मार्ग यामुळे छोट्याशा चुकीचाही मोठा फटका बसू शकतो. रोज ऑफिस, कॉलेज किंवा इतर कामासाठी बाईक किंवा स्कूटर वापरणाऱ्यांनी या दिवसांत थोडी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. काही सध्या सवयी अंगीकारल्या तर पावसातील प्रवास अधिक सुरक्षित आणि निर्धास्त होऊ शकतो.

टायर व्यवस्थित आहेत का, याची खात्री…
सर्वात आधी लक्ष द्यायचं ते म्हणजे दुचाकीच्या टायरकडे. टायरची पकड चांगली नसेल तर ओल्या रस्त्यावर गाडी सहज घसरू शकते. टायर जास्त झिजले असतील किंवा त्यात योग्य प्रमाणात हवा नसेल, तर वाहनावर नियंत्रण ठेवणं कठीण होतं. त्यामुळे प्रवास सुरू करण्यापूर्वी टायर व्यवस्थित आहेत का, याची खात्री करून घ्या. गरज वाटल्यास वेळ न दवडता नवीन टायर बसवणे हा चांगला निर्णय ठरू शकतो.

दोन्ही ब्रेकचा योग्य वापर केल्यास वाहनावर संतुलन टिकते
ब्रेक ही दुचाकीची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. पावसात ब्रेक योग्य प्रकारे काम करत नसतील तर अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे ब्रेकमध्ये काही अडचण वाटत असेल तर लगेच मेकॅनिककडून तपासणी करून घ्या. गाडी चालवताना अचानक जोरात ब्रेक दाबण्याऐवजी हळूहळू वेग कमी करा. पुढील आणि मागील दोन्ही ब्रेकचा योग्य वापर केल्यास वाहनावर संतुलन टिकवणे सोपे जाते.

Monsoon Bike Care : पावसात बाईक ठेवायची ब्रेकडाउन-फ्री? या टिप्स …

ओल्या रस्त्यावर गाडी हळू चालवा…
पावसाळ्यात वेगावर नियंत्रण ठेवणं खूप आवश्यक आहे. अनेकजण रिकामा रस्ता पाहून गाडी वेगात चालवतात, पण ओल्या रस्त्यावर असा निर्णय धोकादायक ठरू शकतो. वाहन जितकं कमी वेगात असेल तितकं ते नियंत्रित करणं सोपं असतं. पुढे अचानक एखादा खड्डा, पादचारी किंवा दुसरं वाहन आल्यास वेळेत गाडी थांबवता येते. त्यामुळे नेहमी संयमाने आणि सुरक्षित वेगात प्रवास करा.

उठून दिसणाऱ्या रंगाचा रेनकोट किंवा परावर्तित पट्टे असलेले कपडे वापरा…
पावसात अनेकदा समोरचा रस्ता नीट दिसत नाही. धुकं, पावसाचे थेंब आणि कमी प्रकाश यामुळे दृष्टी कमी होते. अशा वेळी दुचाकीचे दिवे सुरू ठेवणं फायदेशीर ठरतं. हेल्मेटची काच स्वच्छ असणंही तितकंच गरजेचं आहे. घाण किंवा धुक्यामुळे दृष्टी अडल्यास अपघाताचा धोका वाढतो. शक्य असल्यास उठून दिसणाऱ्या रंगाचा रेनकोट किंवा परावर्तित पट्टे असलेले कपडे वापरा. त्यामुळे इतर वाहनचालकांनाही तुमची उपस्थिती लवकर लक्षात येते.

पाणी भरलेल्या भागातून जाताना गाडी अगदी सावकाश चालवा…
रस्त्यावर पाणी साचलेलं दिसलं की अनेकजण अंदाजाने गाडी पुढे नेतात. मात्र अशा पाण्याखाली मोठे खड्डे किंवा उघडी गटारे असू शकतात. त्यामुळे पाणी भरलेल्या भागातून जाताना गाडी अगदी सावकाश चालवा. शक्य असेल तर अशा रस्त्यांना पर्याय निवडा. पाण्यात गाडी बंद पडल्यास इंजिनचं नुकसान होण्याची शक्यता देखील असते.

दुचाकीची संपूर्ण तपासणी करून घेणं फायदेशीर…
पावसाळ्यापूर्वी एकदा दुचाकीची संपूर्ण तपासणी करून घेणं फायदेशीर ठरतं. बॅटरी, लाईट्स, हॉर्न, इंडिकेटर, चेन आणि इतर भाग व्यवस्थित आहेत का, हे पाहून घ्या. पावसात भिजल्यानंतर वाहन स्वच्छ करून कोरडं करणंही महत्त्वाचं आहे. त्यामुळे गंज लागत नाही आणि वाहनाचं आयुष्य वाढतं. चेनला वेळोवेळी तेल लावल्यास तिचं काम सुरळीत सुरू राहतं.

चप्पल किंवा घसरडे सँडल वापरल्यास पाय घसरू शकतो…
दुचाकी चालवताना सुरक्षिततेची सुरुवात हेल्मेटपासूनच होते. फक्त नियम म्हणून नाही, तर स्वतःच्या सुरक्षेसाठी चांगल्या दर्जाचं पूर्ण चेहरा झाकणारं हेल्मेट वापरा. यासोबत हातमोजे आणि मजबूत बूट घातल्यास पावसात गाडी चालवणं अधिक सुरक्षित होतं. चप्पल किंवा घसरडे सँडल वापरल्यास पाय घसरू शकतो आणि वाहनावरचं नियंत्रण सुटू शकतं.

Bike Knowledge: पावसामध्ये बाईक किती स्पीडमध्ये चालवावी …

मोठ्या वाहनांच्या अगदी जवळ जाणं टाळा
पावसात रस्त्यावर इतर वाहनचालकांकडूनही चुका होऊ शकतात. त्यामुळे स्वतः बरोबर चालवणं पुरेसं नसून इतरांपासून योग्य अंतर ठेवणंही गरजेचं आहे. मोठ्या वाहनांच्या अगदी जवळ जाणं टाळा. त्यांच्या चाकांमधून उडणारं पाणी आणि चिखल दृष्टी अडवू शकतो. शिवाय अचानक ब्रेक लागल्यास धडक होण्याची शक्यता वाढते.

पावसाळ्यातील प्रवास थोडा अवघड असला तरी योग्य काळजी घेतली तर तो नक्कीच सुरक्षित होऊ शकतो. वाहनाची नियमित देखभाल, मर्यादित वेग, योग्य सुरक्षासाहित्य आणि सतर्कपणे वाहन चालवण्याची सवय या काही साध्या गोष्टी तुमचा प्रत्येक प्रवास अधिक सुरक्षित आणि निर्धास्त बनवू शकतात. सुरक्षित प्रवास हीच खरी शहाणपणाची सवय आहे.

 

Web Title: Are you planning a bike ride during the monsoon here are 5 important things to know

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • bike riding tips
  • Car service tips
  • monsoon care

संबंधित बातम्या

तळलेले तिखट पदार्थ खाण्याऐवजी पावसाळ्यात घरी बनवा ‘हे’ गरमागरम पौष्टिक सूप, सर्दी खोकल्यापासून राहाल लांब
1

तळलेले तिखट पदार्थ खाण्याऐवजी पावसाळ्यात घरी बनवा ‘हे’ गरमागरम पौष्टिक सूप, सर्दी खोकल्यापासून राहाल लांब

पावसाळ्यात घसा कायमच दुखतो? मग आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या जेष्ठमधाचे ‘या’ पद्धतीने करा सेवन, आजारांपासून राहाल दूर
2

पावसाळ्यात घसा कायमच दुखतो? मग आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या जेष्ठमधाचे ‘या’ पद्धतीने करा सेवन, आजारांपासून राहाल दूर

ॲलर्जी की इन्फेक्शन? शिंक, खोकला आणि नाक बंद होणं यात फरक कसा ओळखायचा, जाणून घ्या तज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
3

ॲलर्जी की इन्फेक्शन? शिंक, खोकला आणि नाक बंद होणं यात फरक कसा ओळखायचा, जाणून घ्या तज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

पावसाळ्यात पोटाचे विकार कशामुळे होतात? वाढत्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, राहाल कायमच फिट
4

पावसाळ्यात पोटाचे विकार कशामुळे होतात? वाढत्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, राहाल कायमच फिट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.