
पावसाळ्यात घसा कायमच दुखतो? मग आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या जेष्ठमधाचे 'या' पद्धतीने करा सेवन, आजारांपासून राहाल दूर
खोकला कमी करण्यासाठी उपाय?
जेष्ठमध खाण्याचे फायदे?
जेष्ठमध कशा पद्धतीने खावे?
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीरसंबंधित समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवतात. कारण या दिवसांमध्ये विषाणू आणि कीटक यांच्या वाढीसाठी पोषक वातवरण असते. ज्याच्या परिणामामुळे शरीराला वेगाने आजारांची लागण होते. पाऊस पडल्यानंतर सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू, मलेरिया इत्यादी आजार झपाट्याने वाढतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. सतत होणाऱ्या सर्दी खोकल्यामुळे घशात वेदना होणे, घसा खवखवणे इत्यादी असंख्य शरीरसंबंधित आजार वाढू लागतात. त्यामुळे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे फार आवश्यक आहे. अन्यथा शरीराला गंभीर आजारांची लागण होऊ शकते. पाऊस पडून गेल्यानंतर वातावरणात बदल होतात. या बदलांचा थेट परिणाम शरीरावर होतो.(फोटो सौजन्य – istock)
घशात वाढलेल्या वेदना किंवा घसा खवखवत असेल तर वारंवार मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी घरगुती उपाय करून शरीराची काळजी घ्यावी. खोकला, सर्दीवरील अतिशय प्रभावी उपाय म्हणजे ज्येष्ठमध. आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले जेष्ठमध शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. ही वनस्पती आयुर्वेदातील अतिशय महत्वाची मानली जाते. घसा, पचन आणि श्वसनाशी संबंधित आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी जेष्ठमधाचे सेवन केले जाते. आज आम्ही तुम्हाला जेष्ठमध खाल्ल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात आणि जेष्ठमधाचे कशा पद्धतीने सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. मात्र जेष्ठमधाचे मर्यादित प्रमाणात सेवन करावे. अतिसेवन केल्यास शरीरसंबंधित समस्या कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू शकतात.
घसा खवखवणे, आवाज बसणे किंवा कोरडा खोकला यांसारख्या समस्यांवर जेष्ठमध अतिशय प्रभावी ठरते. घशाच्या वाढत्या तक्रारी कमी करण्यासाठी जेष्ठमधाची छोटी कढी तोंडात ठेवून सतत चघळत राहावी. यामुळे घशात वाढलेला कोरडेपणा कमी होऊन ओलावा मिळतो आणि घसा सुकत नाही. गायक, शिक्षक किंवा सतत बोलण्याचे काम करणारी अनेक लोक जेष्ठमधाचे सेवन करतात. यामुळे आवाज आणि घसा व्यवस्थित राहतो. घशासंबंधित कोणत्याही समस्या वाढू लागल्यास जेष्ठमधाचे आवर्जून सेवन करावे.
जेष्ठमध केवळ घशातील वेदना कमी करण्यासाठी नाहीतर अपचन, ऍसिडिटी, बद्धकोष्ठता आणि घशात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरते. पोटात वाढलेली जळजळ आणि पचनसंस्थेच्या आतील भाग शांत करण्यासाठी जेष्ठमधाचे सेवन केले जाते. श्वसनसंस्थेच्या आरोग्यासाठीही ज्येष्ठमध खूप जास्त फायदेशीर आहे. सर्दी, कफ किंवा घशात साचून राहिलेला चिकट थर कमी करण्यासाठी जेष्ठमध कढीचे किंवा जेष्ठमध पावडर मधात मिक्स करून खावी.
Health Tips: रोज मूठभर खा गूळ-चना; शरीराला मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे
ज्येष्ठमधामध्ये अँटी ऑक्सिडंट्स आणि दाह कमी करणारे घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. शरीरातील पेशींचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी आणि शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी जेष्ठमधाचे सेवन करावे. वारंवार तोंड येणे किंवा तोंडात फोड येत असतील तर जेष्ठमध खावे. यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होते. अनेक लोक जेष्ठमधाचा हर्बल चहा पितात. पण वारंवार जेष्ठमधाचे सेवन करू नये. तसेच उच्च रक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार, गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने जेष्ठमध खावे.
Ans: जेष्ठमध (यष्टिमधु/मुळेठी) ही आयुर्वेदातील एक औषधी वनस्पती असून घसा खवखवणे, खोकला आणि सर्दी यांसारख्या समस्यांमध्ये उपयुक्त मानली जाते.
Ans: जेष्ठमधाचा काढा, कोमट पाण्यातील चूर्ण, हर्बल चहा किंवा वैद्यांच्या सल्ल्याने चूर्ण स्वरूपात सेवन करता येते.
Ans: दीर्घकाळ किंवा जास्त प्रमाणात सेवन करणे योग्य नाही. नियमित सेवन करण्यापूर्वी आयुर्वेदिक तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.