Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ॲलर्जी की इन्फेक्शन? शिंक, खोकला आणि नाक बंद होणं यात फरक कसा ओळखायचा, जाणून घ्या तज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शिंक येणं, खोकला होणं आणि नाक बंद इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे व्हायरल आणि बॅक्टेरियल श्वसनसंस्थेच्या इन्फेक्शनमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 14, 2026 | 12:10 PM
ॲलर्जी की इन्फेक्शन? शिंक, खोकला आणि नाक बंद होणं यात फरक कसा ओळखायचा, जाणून घ्या तज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

ॲलर्जी की इन्फेक्शन? शिंक, खोकला आणि नाक बंद होणं यात फरक कसा ओळखायचा, जाणून घ्या तज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

Follow Us
Follow Us:

पावसाळ्यात शिंक येणं, खोकला होणं आणि नाक बंद होणं या तक्रारी खूपच सामान्य असतात. ही लक्षणं दमट वातावरण, बुरशीचे (फंगसचे) बीजक (स्पोर्स) यामुळे होणाऱ्या ॲलर्जीमुळेही असू शकतात, किंवा व्हायरल आणि बॅक्टेरियल श्वसनसंस्थेच्या इन्फेक्शनमुळेही होऊ शकतात. या दोन्ही परिस्थितींमध्ये लक्षणं बऱ्याचदा सारखीच दिसतात, त्यामुळे नेमकं कारण ओळखण्यासाठी आणि योग्य उपचार ठरवण्यासाठी लॅब चाचण्यांची महत्त्वाची भूमिका असते.या विषयावर डॉ. लक्ष्मीप्रिया आर., सीनियर कन्सल्टंट मायक्रोबायोलॉजिस्ट आणि मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट, मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड (चेन्नई), यांनी सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)

Health Update: मातेच्या गर्भातच थांबवला मृत्यूचा धोका! वाडियात आईला औषधे देत बाळाच्या हृदयातील गाठींवर उपचार

ॲलर्जीचा संशय असेल तर कम्प्लीट ब्लड काउंट (CBC) ही चाचणी काही महत्त्वाचे संकेत देऊ शकते. रक्तातील इओसिनोफिल्स (Eosinophils) ची संख्या वाढलेली आढळल्यास ॲलर्जी असण्याची शक्यता वाढते. मात्र, केवळ या चाचणीच्या आधारे ॲलर्जीच आहे, असा निष्कर्ष काढता येत नाही. ज्या रुग्णांना वारंवार किंवा सतत अशी लक्षणं जाणवत असतील, त्यांच्यासाठी ॲलर्जन-स्पेसिफिक IgE चाचणी उपयुक्त ठरू शकते. या चाचणीमुळे पावसाळ्यात आढळणारे डस्ट माइट्स (धुळीतील सूक्ष्म किडे), बुरशी (मोल्ड्स) किंवा परागकण (पोलन) यांसारखे अॅलर्जीचे ट्रिगर्स ओळखता येतात.

इन्फेक्शनचा संशय असल्यास कोणती चाचणी करायची हे रुग्णाच्या लक्षणांवर अवलंबून असते. इन्फ्लूएंझा आणि SARS-CoV-2 सारखे आजार ओळखण्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट काही मिनिटांत निकाल देते आणि सुरुवातीच्या तपासणीसाठी उपयुक्त ठरते. मात्र, खात्रीशीर निदानाची गरज असल्यास RT-PCR (रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेस पॉलिमरेज चेन रिॲक्शन) ही चाचणी अधिक संवेदनशील (Sensitive) आणि अचूक (Specific) असल्यामुळे श्वसनसंस्थेशी संबंधित व्हायरल इन्फेक्शनसाठी अधिक विश्वासार्ह मानली जाते.

ज्या रुग्णांना सतत खोकला, ताप किंवा फुफ्फुसांशी संबंधित खालच्या श्वसनमार्गाची लक्षणं असतील, त्यांच्यासाठी रेस्पिरेटरी PCR पॅनेल ही चाचणी एका नमुन्यातून अनेक प्रकारचे व्हायरस ओळखू शकते. जर बॅक्टेरियल इन्फेक्शनचा संशय असेल विशेषतः खूप ताप, वाढत जाणारी लक्षणं किंवा पूयुक्त (Purulent) कफ येत असेल. तर बॅक्टेरियल कल्चर आणि अँटिबायोटिक ससेप्टिबिलिटी टेस्ट करून कोणते जंतू कारणीभूत आहेत हे समजते आणि त्यानुसार योग्य अँटिबायोटिक निवडता येते.

सी-रिॲक्टिव्ह प्रोटीन (CRP) चाचणी शरीरात किती प्रमाणात दाह (Inflammation) आहे हे समजण्यास मदत करू शकते. तसेच, काही निवडक रुग्णांमध्ये प्रोकॅल्सिटोनिन (Procalcitonin) चाचणी करून हा आजार व्हायरल आहे की बॅक्टेरियल, याचा अंदाज घेता येतो. विशेषतः रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांमध्ये ही चाचणी अधिक उपयुक्त ठरू शकते.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) यांच्या मते, साध्या आणि गुंतागुंत नसलेल्या व्हायरल श्वसनसंस्थेच्या इन्फेक्शनमध्ये अँटिबायोटिक्स नियमितपणे देऊ नयेत. योग्य लॅब तपासण्यांमुळे आजाराचं नेमकं कारण समजतं, अनावश्यक अँटिबायोटिक्सचा वापर टाळता येतो आणि अँटिमायक्रोबियल स्ट्यूवर्डशिप (अँटिबायोटिक्सचा जबाबदारीने आणि योग्य पद्धतीने वापर) यालाही प्रोत्साहन मिळतं.

तासंतास लघवी रोखून धरता? चुकीच्या सवयींमुळे महिलांना होऊ शकते ‘या’ गंभीर आजारांची लागण, वेळीच व्हा सावध

पावसाळ्यात कोणती लक्षणं असतील तर कोणत्या चाचण्या उपयुक्त ठरू शकतात?

  • शिंक, नाकाला खाज, पातळ पाण्यासारखा नाकातून स्त्राव आणि ताप नसणे: CBC सोबत इओसिनोफिल काउंट, आणि गरज भासल्यास ॲलर्जन-स्पेसिफिक IgE चाचणी.
  • ताप, अंगदुखी आणि अचानक सुरू झालेला खोकला: रॅपिड अँटिजेन टेस्ट आणि/किंवा श्वसनसंस्थेतील व्हायरससाठी RT-PCR चाचणी.
  • सतत कफासह खोकला किंवा प्रकृती अधिक बिघडत जाणे: कफाची (Sputum) कल्चर चाचणी, अँटिबायोटिक ससेप्टिबिलिटी
  • टेस्ट आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक असल्यास दाह दर्शवणाऱ्या (Inflammatory) मार्कर्सच्या चाचण्या.
वेळेवर आणि योग्य चाचण्या केल्यास ॲलर्जी आहे की इन्फेक्शन, हे स्पष्टपणे ओळखता येतं. त्यामुळे योग्य उपचार वेळेवर सुरू करता येतात, अनावश्यक अँटिबायोटिक्सचा वापर टाळता येतो आणि पावसाळ्यात रुग्णांच्या आरोग्याचे परिणाम अधिक चांगले होण्यास मदत होते.
💡

Frequently Asked Questions

  • Que: ॲलर्जी आणि इन्फेक्शनमध्ये मुख्य फरक काय आहे?

    Ans: ॲलर्जी ही शरीराची धूळ, परागकण, पाळीव प्राणी किंवा इतर ॲलर्जन्सवरील प्रतिक्रिया असते, तर इन्फेक्शन हे विषाणू, जीवाणू किंवा बुरशीमुळे होते.

  • Que: ॲलर्जीमध्ये ताप येतो का?

    Ans: सामान्यतः ॲलर्जीमध्ये ताप येत नाही. ताप आल्यास संसर्गाची शक्यता तपासण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • Que: ॲलर्जी आणि सर्दी किती दिवस टिकते?

    Ans: व्हायरल सर्दी साधारण ७–१० दिवसांत बरी होते. मात्र ॲलर्जीचा संपर्क सुरू असेपर्यंत लक्षणे वारंवार किंवा दीर्घकाळ राहू शकतात.

Web Title: Allergy or infection how to tell the difference between sneezing cough and a stuffy nose according to experts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • Health Tips
  • Health Updates
  • monsoon care

संबंधित बातम्या

Health Update: मातेच्या गर्भातच थांबवला मृत्यूचा धोका! वाडियात आईला औषधे देत बाळाच्या हृदयातील गाठींवर उपचार
1

Health Update: मातेच्या गर्भातच थांबवला मृत्यूचा धोका! वाडियात आईला औषधे देत बाळाच्या हृदयातील गाठींवर उपचार

पावसाळ्यात पोटाचे विकार कशामुळे होतात? वाढत्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, राहाल कायमच फिट
2

पावसाळ्यात पोटाचे विकार कशामुळे होतात? वाढत्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, राहाल कायमच फिट

Monsoon Care Tips: पावसाळ्यात ‘हे’ पदार्थ खाण्याची अजिबात करू नका चूक! पचनाच्या समस्या वाढून होऊ शकते फूड पॉइझनिंग
3

Monsoon Care Tips: पावसाळ्यात ‘हे’ पदार्थ खाण्याची अजिबात करू नका चूक! पचनाच्या समस्या वाढून होऊ शकते फूड पॉइझनिंग

पावसाळ्यात नकळत करता का या 5 चुका? पायांपासून वाढू शकतो संसर्गाचा धोका; वेळीच व्हा सावध
4

पावसाळ्यात नकळत करता का या 5 चुका? पायांपासून वाढू शकतो संसर्गाचा धोका; वेळीच व्हा सावध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.