गेमर्सना मोठा झटका! या दिवशी बंद होणार गूगलची हि सर्विस, कंपनीने केली घोषणा; जाणून घ्या सविस्तर
जगातील सर्वात मोठी टेक कंपनी असलेल्या गुगलने एक घोषणा केली आहे. कंपनीने केलेल्या या घोषणेमुळे सर्व गेमर्सना मोठा धक्का बसला आहे. गुगलने घोषणा केली आहे की, 2025 च्या शेवटी क्रोमबुकवरील स्टीम बीटा सपोर्ट पूर्णपणे बंद केला जाणार आहे. 1 जानेवारी 2026 पासून युजर्स स्टीम लाँच करू शकणार नाहीत, नवीन गेम इंस्टॉल करू शकणार नाहीत किंवा प्लॅटफॉर्मवर प्रवेश करू शकणार नाहीत. कंपनीने केलेल्या या घोषणेचा गेमर्सवर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे.
एवढंच नाही तर कंपनीने असं देखील सांगितलं आहे की आधीपासूनच इंस्टॉल करण्यात आलेले गेम देखील हटवले जाणार आहेत. या निर्णयामुळे 2022 मध्ये सुरू झालेल्या बीटा प्रोग्रामचा शेवट झाला आहे ज्यामध्ये गुगल आणि स्टीमने क्रोमबुकवर पीसी गेमिंग अनुभव आणण्याचा प्रयत्न केला होता. स्टिम सर्विस नक्की काय आहे, त्याचा युजर्सवर कशा प्रकारे परिणाम होणार आहे, याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
स्टीम जगातील सर्वात मोठे पीसी गेमिंग प्लॅटफॉर्म आहे, जिथे हजारो गेम्सची खरेदी, विक्री आणि भाड्याने दिले जातात. सुरुवातीला हे प्लॅटफॉर्म केवळ Windows, macOS आणि Linux साठी उपलब्ध होते. परंतु स्टीम बीटा द्वारे क्रोमबुकवर खेळण्यासाठी 99 निवडक पीसी गेम देखील उपलब्ध होते, ज्यामुळे क्रोमओएस यूजर्सना उच्च-गुणवत्तेच्या गेममध्ये प्रवेश मिळाला.
क्रोमबुक त्यांच्या हलके, वेगवान आणि इंटरनेट-फोकस्ड ऑपरेटिंग सिस्टमसाठी अत्यंत लोकप्रिय आहे. मात्र यामध्ये पूर्वी हाय-एंड AAA पीसी गेम्स चालवणं देखील शक्य नव्हतं. स्टीम बीटाने ही कमतरता भरून काढली, मात्र आता कंपनीने घोषणा केली आहे की, ते ही सर्विस बंद करणार आहेत त्यामुळे, युजर्सना गुगल प्ले स्टोअरवरील अँड्रॉइड गेमवर अवलंबून राहावे लागेल, ज्यामध्ये पीसी-एक्सक्लुझिव्ह गेम्सचा अभाव आहे.
गूगलने आधीच क्रोमबुक यूजर्सना या बदलाबाबत नोटिफिकेशन पाठवण्यास सुरुवात केली आहे. स्टीम बीटा 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्णपणे सक्रिय असणार आहे. मात्र त्यानंतर युजर्स पीसी-क्वालिटी गेमिंगसाठी NVIDIA GeForce Now किंवा Xbox Cloud Gaming सारख्या सर्विसवर अवलंबून राहावे लागणार आहे.
भारतात विद्यार्थी आणि हलकी कामं करणाऱ्या यूजर्समध्ये क्रोमबुक विशेषतः लोकप्रिय आहेत. अनेक तरुण गेमर्सनी महागडे गेमिंग लॅपटॉप न खरेदी करता स्टीम बीटाद्वारे पीसी गेमिंगचा आनंद घेतला आहे.
क्रोमबुक का लोकप्रिय आहे?
हलके, वेगवान आणि इंटरनेट-फोकस्ड ऑपरेटिंग सिस्टमसाठी
स्टिम सर्विस नक्की काय आहे?
स्टीम जगातील सर्वात मोठे पीसी गेमिंग प्लॅटफॉर्म आहे
स्टिम सर्विस कधी बंद होणार आहे?
31 डिसेंबर 2025