Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गेमर्सची प्रतिक्षा लवकरच संपणार! 2026 च्या अखेरपर्यंत लाँच होणार BGMI Lite… कमी रॅम असलेल्या फोनवरही खेळता येणार गेम

मोबाईल गेमर्ससाठी मोठी खुशखबर आहे. क्राफ्टन इंडियाने BGMI Lite लाँच करण्याची घोषणा केली आहे. हे गेमिंग वर्जन 2026 च्या अखेरपर्यंत लाँच होण्याची शक्यता असून, कमी क्षमतेच्या स्मार्टफोन्सवरही चांगला गेमिंग अनुभव देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 17, 2026 | 11:56 AM
गेमर्सची प्रतिक्षा लवकरच संपणार! 2026 च्या अखेरपर्यंत लाँच होणार BGMI Lite... कमी रॅम असलेल्या फोनवरही खेळता येणार गेम

गेमर्सची प्रतिक्षा लवकरच संपणार! 2026 च्या अखेरपर्यंत लाँच होणार BGMI Lite... कमी रॅम असलेल्या फोनवरही खेळता येणार गेम

Follow Us
Follow Us:
  • क्राफ्टन इंडिया 2026 च्या अखेरपर्यंत बीजीएमआय लाईट लाँच करण्याची तयारी करत आहे.
  • कमी क्षमतेच्या बजेट आणि मिड-रेंज स्मार्टफोन्सवर बीजीएमआय चांगला परफॉर्मंस देत नसल्यामुळे लाईट वर्जन आणले जात आहे.
  • बीजीएमआय लाईटमध्ये ग्राफिक्स, मॅप आणि गेमप्लेमध्ये नेमके कोणते बदल असतील, याबाबत कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही.
मोबाईल गेमर्ससाठी आनंदाची बातमी आहे. क्राफ्टन इंडियाने घोषणा केली आहे की, बॅटग्राऊंड मोबाईल इंडिया (बीजीएमआय) लाईट लवकरच लाँच केला जाणार आहे. 2026 च्या अखेरपर्यंत कंपनी बीजीएमआयचे लाईट वर्जन लाँच करण्याची तयारी करत आहे. खरं तर बीजीएमआय चाहते गेल्या बऱ्याच काळापासून गेमच्या लाईट वर्जनची मागणी करत होते. आता अखेर कंपनी त्यांची ही मागणी पूर्ण करणार आहे. 2026 च्या अखेरपर्यंत लोकप्रिय बीजीएमआयचे लाईट वर्जन लाँच केले जाणार आहे. कंपनीच्या या निर्णयाने गेमर्समध्ये आनंदाचे वातावरण असले तरी देखील आता प्रश्न असा आहे की, कंपनी या गेमचे लाईट वर्जन आता का लाँच करत आहे?

Pixel 11 VS iPhone 17: कोण आहे खरा किंग? कॅमेऱ्यापासून किंमतीपर्यंत… खरेदीपूर्वी वाचा संपूर्ण तुलना

कंपनी का लाँच करणार बीजीएमआय लाईट?

गेल्या काही वर्षांपर्यंत लोकप्रिय बीजीएमआय गेम मिड रेंज आणि बजेट स्मार्टफोन्समध्ये अतिशय चांगला परफॉर्मंस ऑफर करत होता. मात्र गेल्या काही काळांत स्मार्टफोनच्या सुट्या भागांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे, कंपन्यांनी बजेट आणि मध्यम श्रेणीतील स्मार्टफोन्समध्ये चिपसेट्स तसेच मेमरी चिप्सचा (रॅम आणि स्टोरेज) दर्जा कमी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे स्मार्टफोनच्या परफॉर्मंसवर देखील परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याचा परिणाम बीजीएमआय प्लेअर्सवर झाला आहे. बजेट फ्रेंडली आणि मिड रेंज स्मार्टफोन्सवर आता बीजीएमआय चांगला परफॉर्मंस ऑफर करत नाही. याच कारणामुळे आता कंपनीने बीजीएमआय गेमचे लाईट वर्जन लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

विविध कारणांमुळे कंपनीने घेतला हा निर्णय

काही रिपोर्ट्समध्ये असं सांगण्यात आले आहे की, क्राफ्टन इंडिया कंपनीच्या पोर्टफोलिओचा विस्तार करण्यासाठी नाही तर नवीन फोन्सच्या हार्डवेअरला अनुकूल व्हावा यासाठी बीजीएमआयचे लाईट वर्जन लाँच करणार आहे. 2020 मध्ये चिनी ॲप्सनवर बंदी घालण्यापूर्वी भारतात पबजी मोबाईल लाईट प्रचंड लोकप्रिय होता. हे गेमिंग वर्जन एंट्री लेवल स्मार्टफोन यूजर्समध्ये प्रचंड लोकप्रिय होते. मात्र नंतर जेव्हा कंपनीने भारतात बीजीएमआय लाँच केला, तेव्हा त्याचे लाईट वर्जन लाँच करण्यात आले नव्हते. आता गेमर्सची मागणी आणि विविध कारणांमुळे कंपनीने बीडीएमआयचे लाईट वर्जन लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे.

Tech Tips: तुम्हीही Digital Wallet वापरताय? सायबर फ्रॉडपासून बचावासाठी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

बीजीएमआय लाईटबद्दल काय म्हणाली कंपनी?

बीजीएमआय लाईट गेमच्या लाँचिंगची घोषणा करताना कंपनीने सांगतलं आहे की, हे गेमिंग वर्जन 2026 च्या अखेरपर्यंत लाँच केले जाणार आहे. बीजीएमआय लाईटचा उद्देश गेमचा अनुभव अधिक व्यापक मोबाईल गेमिंग कम्युनिटीपर्यंत पोहोचवणे हा आहे. तथापि, कमी क्षमतेच्या हार्डवेअरला अनुकूल करण्यासाठी ग्राफिक्समधील बदल, मॅपमधील कपात किंवा गेमप्लेबद्दल कंपनीने अद्याप कोणतीही माहिती उघड केलेली नाही. अशी शक्यता आहे की कंपनी लॉन्चच्या वेळी हे डिटेल्स शेअर केले जाऊ शकतात.

Web Title: Bgmi lite to launch by end of 2026 in india krafton announces lite version for budget smartphones

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 11:56 AM

Topics:  

  • online games
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

ऑनलाइन कपडे खरेदी करण्यापूर्वीच करता येणार ट्रायल! ChatGPT ने सादर केले नवं ‘ट्राय ऑन’ फीचर, कसं करणार काम? जाणून घ्या
1

ऑनलाइन कपडे खरेदी करण्यापूर्वीच करता येणार ट्रायल! ChatGPT ने सादर केले नवं ‘ट्राय ऑन’ फीचर, कसं करणार काम? जाणून घ्या

आपत्कालीन परिस्थितीत केवळ एक आवाज अन् मदत हजर? Google च्या नव्या फीचरची सर्वत्र चर्चा, असं करणार काम
2

आपत्कालीन परिस्थितीत केवळ एक आवाज अन् मदत हजर? Google च्या नव्या फीचरची सर्वत्र चर्चा, असं करणार काम

WhatsApp घेऊन येतोय नवं Restricted Chat फीचर! लिंक्ड डिव्हाईस आणि चॅट एक्सपोर्टवर येणार निर्बंध, यूजर्सची सुरक्षा वाढणार
3

WhatsApp घेऊन येतोय नवं Restricted Chat फीचर! लिंक्ड डिव्हाईस आणि चॅट एक्सपोर्टवर येणार निर्बंध, यूजर्सची सुरक्षा वाढणार

Tech Tips: या कारणांमुळे होऊ शकतो Power Bank चा ब्लास्ट! सावध राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स
4

Tech Tips: या कारणांमुळे होऊ शकतो Power Bank चा ब्लास्ट! सावध राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.