Maha Kumbh Shield: BharatPe ने लाँच केली नवीन स्किम, महाकुंभात येणाऱ्या भाविकांचे UPI पेमेंट होणार सुरक्षित
13 जानेवारी 2025 पासून प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याला सुरुवात झाली. 26 फेब्रुवारी रोजी म्हणजेच पुढील 10 दिवसांत महाकुंभमेळ्याची सांगता होणार आहे. आतापर्यंत करोडो भाविकांनी महाकुंभात स्नान केलं आहे. महाकुंभ 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी दररोज लाखो लोक प्रयागराजला पोहोचत आहेत. आतापर्यंत अनेक दिग्गजांनी महाकुंभाला उपस्थिती लावली आहे. ज्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील समावेश आहे.
महाकुंभाला जाताना प्रवासाच्या काळात किंवा तेथे पोहोचल्यावर, लोक खरेदी आणि इतर कामांसाठी UPI पेमेंटचा वापर करत आहेत. गर्दीच्या ठिकाणी लोकं कॅश हरवणे, चोरी होणे या सगळ्यापासून वाचण्यासाठी UPI पेमेंटचा वापर करत आहेत. परंतु, गर्दीच्या ठिकाणी सायबर फसवणुकीचा धोकाही वाढतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
UPI पेमेंटमुळे आपली कामं सहज सोपी होत असली ना तरी देखील याच UPI मुळे आपण सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकू शकतो. म्हणून, युजर्सची सुरक्षितता लक्षात घेत भारतपेने ‘महाकुंभ शील्ड’ नावाची एक नवीन योजना सुरू केली आहे. ही योजना प्रयागराजमध्ये 2025 च्या महाकुंभात येणाऱ्या भाविकांचे UPI पेमेंट सुरक्षित करेल. स्कॅम आणि फसवणूकीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
UPI व्यवहारांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी महाकुंभ शील्ड तयार करण्यात आले आहे. ही योजना वापरकर्त्याला फिशिंग, घोटाळे, चोरीला गेलेल्या फोनच्या बाबतीत अनधिकृत व्यवहार आणि इतर सायबर फसवणुकीपासून संरक्षण देते. सध्या ऑनलाईन पेमेंट करताना फसवणूकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत महाकुंभाला येणाऱ्या ग्राहकांची सुरक्षा टीकून राहावी यासाठी ही नवीन सेवा सुरु करण्यात आली आहे.
24×7 सपोर्ट – फसवणूक झाल्यास,यूजरला 24 तास सपोर्ट मिळेल.
फास्ट क्लेम – फसवणूक झाल्यास, यूजर सहजपणे दावा दाखल करू शकतात आणि 10 दिवसांच्या आत भरपाई मिळवू शकतात.
25,000 रुपयांपर्यंतचे कवरेज – UPI ट्रांजेक्शनमध्ये 25,000 रुपयांपर्यंतचे नुकसान झाल्यास यूजरला भरपाई मिळेल.
पहिला महिना मोफत – युजर या सुविधेचा पहिला महिना मोफत वापर करू शकतात, त्यानंतर युजरना या सेवेचा वापर करायचा असल्यास दरमहा 19 रुपये शुल्क आकारले जाईल.
भारतपे अॅप डाउनलोड करा – सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअरवरून भारतपे अॅप डाउनलोड करा.
प्रयागराजमध्ये पहिले UPI ट्रांजेक्शन करा – महाकुंभ 2025 मध्ये पहिला UPI ट्रांजेक्शन केल्याने महाकुंभ शिल्ड सक्रिय होईल.
पहिला महिना मोफत – तुम्हाला पहिल्या महिन्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. मात्र त्यानंतर या सेवेसाठी शुल्क आकारले जाणार आहे.
मासिक शुल्क – पहिल्या महिन्यानंतर, या योजनेचा लाभ घेण्यासाठी वापरकर्त्याला दरमहा 19 रुपये शुल्क भरावे लागेल.