TikTok Unbanned: बॅन झालेल्या TikTok ची अमेरिकेत पुन्हा एंट्री, Google Play Store आणि Apple App Store वर उपलब्ध
लोकप्रिय सोशल मीडिया अॅप टिकटॉकने अमेरिकेत पुन्हा एंट्री केली आहे. बॅन करण्यात आलेलं सोशल मीडिया अॅप टिकटॉक आता अमेरिकेत पुन्हा उपलब्ध झालं आहे. खरं तर अमेरिकेने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव या अॅपवर बंदी घातली होती. मात्र आता हे अॅप अमेरिकेत पुन्हा परतले आहे. अमेरिकेने चीनी अॅप टिकटॉकवर काही गंभीर आरोप करत त्याच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता हे लोकप्रिय सोशल मीडिया अॅप टिकटॉक अमेरिकेत परतले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानंतर टिकटॉक अमेरिकेतील Google Play Store आणि Apple App Store वर उपलब्ध झाले आहे.
राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव या अॅपवर बंदी घालण्यात आली होती. टिकटॉक ही चिनी कंपनी बाईटडान्सच्या मालकीची आहे. अमेरिकेने दावा केला की हे अॅप युजर्सचा डेटा स्टोअर करते. चीन या डेटाचा वापर अमेरिकन नागरिकांची हेरगिरी करण्यासाठी आणि तेथील जनमतावर प्रभाव पाडण्यासाठी करू शकतो. या आरोपांमुळे, 2025 च्या सुरुवातीला गुगल आणि अॅपलच्या अॅप स्टोअर्समधून हे अॅप काढून टाकण्यात आले होते. मात्र आता हे अॅप पुन्हा अमेरिकेत उपलब्ध झाले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच टिकटॉकवरील बंदी 75 दिवसांसाठी स्थगित करण्याचे आदेश दिले. या ऑर्डरनंतर, टिकटॉक अॅपने अमेरिकेत पुनरागमन केले आहे. आता अॅपल आणि गुगलने पुन्हा एकदा त्यांच्या अॅप स्टोअरमध्ये टिकटॉक उपलब्ध करून दिले आहे, ज्यामुळे आता अमेरिकेतील स्मार्टफोन युजर्स त्यांच्या फोनवर टिकटॉक डाऊनलोड करण्यासाठी सक्षम असणार आहे. तथापि, टिकटॉकवरील ही बंदी अद्याप पूर्णपणे उठवण्यात आलेली नाही. बाईटडान्ससाठी हा तात्पुरता दिलासा आहे.
टिकटॉकवरील बंदी उठवण्यात आली असली तरी, अमेरिकन सरकारने बाईटडान्सला टिकटॉकची मालकी अमेरिकन कंपनीकडे सोपवण्यास सांगितले आहे अन्यथा हे अॅप पूर्णपणे बंद करावे लागेल असे अमेरिकेने सांगितलं आहे. अमेरिकेचे म्हणणे आहे की जर कंपनीने या बंदीचे उल्लंघन केले तर टिकटॉकला प्रति वापरकर्ता $5000 दंड होऊ शकतो.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बाईटडान्सला आणखी एक ऑफर दिली आहे. यानुसार, अमेरिकेतील टिकटॉकचे कामकाज संयुक्त उपक्रमाद्वारे चालवता येईल. यासाठी कंपनीला अमेरिकन कंपनीसोबत भागीदारी करावी लागेल. तथापि, यासाठी चीनची मान्यता देखील आवश्यक असेल. जर चीनने या कराराचे पालन केले नाही तर त्याला आर्थिक निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते, असेही ट्रम्प यांनी धमकीच्या स्वरात म्हटले आहे. त्यामुळे आता टिकटॉक अमेरिकेत किती काळ सुरु राहणार हे त्यांच्या वागणूकीवर अवलंबून असणार आहे.
नव्या रुपात लाँच झाला Redmi चा ‘हा’ पावरफुल 5G स्मार्टफोन! AI कॅमेरा आणि बरचं काही.. किंमत केवळ इतकी
टिकटॉक अनेक देशांमध्ये वादांनी वेढलेले आहे. 2020 मध्ये भारताने या अॅपवर पूर्णपणे बंदी घातली. यासोबतच, युरोपियन युनियन या अॅपच्या डेटा सुरक्षा मानकांची देखील चौकशी करत आहे. त्यामुळे टीकटॉक अनेक देशांमध्ये अडचणीत सापडलं आहे.