Samsung च्या फोल्ड स्मार्टफोनवर मिळतंय सर्वात मोठं डिस्काऊंट, 1 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी
Samsung ने अलीकडेच त्यांचा नवीन गॅलेक्सी Z फोल्ड 7 लाँच केला आहे. हा नवीन स्मार्टफोन लाँच केल्यानंतर आता जुन्या स्मार्टफोनवर म्हणजेच गॅलेक्सी Z फोल्ड 6 वर अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. अशाच एक ऑफरबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. विजय सेल्समध्ये गॅलेक्सी Z फोल्ड 6 वर मोठं डिस्काऊंट आणि ऑफर्स उपलब्ध आहेत. ज्यामुळे तुम्हाला हा स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. विजय सेल्स या फोनवर सर्वात मोठी ऑफर देत आहे. ज्यामुळे तुम्ही हे डिव्हाइस फक्त 99,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
एवढंच नाही तर या स्मार्टफोनच्या खरेदीवर अनेक बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत, त्यामुळे या स्मार्टफोनची किंमत आणखी कमी होते. खरं तर कंपनीने हा स्मार्टफोन सुमारे 1,64,999 रुपयांत लाँच केला होता. मात्र आता ऑफर्स आणि डिस्काऊंटसह हा स्मार्टफोन 1 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
या डिव्हाइसमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप, व्हायब्रंट AMOLED डिस्प्ले, बुक-स्टाईल डिझाइन आणि उत्तम परफॉर्मंस देण्यात आला आहे. जर तुम्हाला खरोखरच डिव्हाइस फोल्डेबल हवे असेल, तर Galaxy Z Fold 6 5G वर उपलब्ध असलेली ही डील फायदेशीर आहे.
65,009 रुपयांच्या डिस्काऊंटसह तुम्ही हा उत्तम सॅमसंग फोन आता फक्त 99,990 रुपयांना खरेदी करू शकता. फोनवर एक खास बँक ऑफर देखील उपलब्ध आहे. जिथे तुम्ही HDFC बँक क्रेडिट/डेबिट कार्ड EMI आणि RBL बँक क्रेडिट कार्ड EMI पर्यायांसह 4000 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. येस बँक क्रेडिट कार्ड ईएमआय ऑप्शनसह 2500 रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे.
दुसरीकडे, फ्लिपकार्ट या फोनवर एक खास डील देखील देत आहे जिथून तुम्ही 48,000 रुपयांच्या मोठ्या डिस्काउंटनंतर हा फोन, सॅमसंग गॅलेक्सी Z फोल्ड 6 5G 1,16,250 रुपयांना कोणत्याही ऑफरशिवाय खरेदी करू शकता. जर तुमच्याकडे फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेचे क्रेडिट कार्ड असेल किंवा तुम्ही ते वापरू शकत असाल, तर तुम्हाला या डिव्हाइसवर 4 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. यामुळे फोनची किंमत 1,12,250 रुपयांपर्यंत कमी होते. तथापि, विजय सेल्स एक चांगली डील देत आहे.
Samsung Galaxy Z Fold 6 5G मध्ये 6.3 इंच AMOLED आउटर स्क्रीन आणि 7.6 इंच AMOLED इनर पॅनल देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये पावरफुल स्नॅपड्रॅगन 8 जेनरेशन 3 प्रोसेसर देखील देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये 4,400 mAh बॅटरी देण्यात आली आहे. डिव्हाईसमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP चा प्रायमरी सेंसर, 12MP चा अल्ट्रा-वाइड आणि 10MP चा टेलीफोटो कॅमेरा आहे.