भाऊ असावा तर असा! रक्षाबंधनासाठी boAt-ब्लिंकिटची भन्नाट डिजिटल मोहीम, अरबाज खानने सांगितला ‘अच्छा भैया’ होण्याचा फंडा!
प्रीमियम लूक अन् भन्नाट फीचर्स… Sony च्या नव्या 5G स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, फीचर्स एकदा पाहाच
ही डिजिटल फिल्म मॉक्यूमेंट्री फॉरमॅटमध्ये तयार करण्यात आली आहे. या डिजिटल फिल्ममध्ये अरबाज खान हातात माइक घेऊन बॉलिवूडच्या ‘ऑल-टाईम फेव्हरेट भाई’ बनण्याच्या स्टाइलचे पृथक्करण करताना दिसतो. रात्री १ वाजताचे ट्विट्स, ठरवून मारलेले डायलॉग्स, आणि हिरोसारखा रुबाब दाखवणे म्हणजे प्रेम नव्हे, हे तो आपल्या खास शैलीत सांगतो. स्वतः अरबाजने ही भूमिका साकारल्यामुळे हा विनोद अधिकच रंगतो. बॉलिवूडमधील ‘युनिव्हर्सल भाई’ या प्रतिमेवर भाष्य करत जेव्हा अरबाज कॅमेऱ्याकडे पाहून म्हणतो, “मी भाईचा भाई आहे”, तेव्हा मोहिमेचा मुख्य संदेश समोर येतो: ‘आधा भैया’ बनू नका, ‘अच्छा भैया’ बना!
केवळ थाट आणि बडेजाव दाखवणे म्हणजे बहिणीसाठी उपस्थित राहणे नव्हे. या रक्षाबंधनाला एक चांगला भाऊ बनणे अत्यंत सोपे आहे. फक्त ब्लिंकिट ॲप उघडा, ‘बोट’ची आवडती भेटवस्तू ऑर्डर करा आणि काही मिनिटांत घरपोच डिलीव्हरी मिळवा. “या रक्षाबंधनाला ब्लिंकिटवरून बोटची खास वस्तू भेट द्या आणि भाऊ-बहिणीचे नाते अधिक घट्ट करा. आहे ना बोट (खूप) सोपे?” या ओळीने या मोहिमेचा गोफ विणला आहे.
या मोहिमेबद्दल बोलताना ‘बोट’च्या प्रवक्त्याने सांगितले, “दरवर्षी रक्षाबंधनाला भावांना ‘सर्वोत्कृष्ट भाई’ असल्याचा आव आणायला आवडतो. तो स्वॅग आणि ड्रॅमॅटिक संवाद. अरबाजने ही भूमिका अतिशय उत्तम साकारली आहे, कारण तो अशाच मोठ्या प्रतिमेभोवती लहानाचा मोठा झाला आहे. पण आमचा संदेश अगदी स्पष्ट आहे: चांगला भाऊ असणे हे परफॉर्मन्सवर नाही, तर बहिणीसाठी वेळेवर उपस्थित राहण्यावर अवलंबून आहे. ब्लिंकिट आणि बोटच्या माध्यमातून आता हे काम अगदी चुटकीसरशी शक्य आहे.”
ही मोहीम बोट आणि ब्लिंकिटच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह करण्यात आली आहे. यात ‘बोट रॉकर्स ४८०’ हेडफोन्स आणि ‘क्रोम आयरीस’ स्मार्टवॉचसह वायरलेस इयरबड्स आणि पोर्टेबल ऑडिओ डिव्हाइसची मोठी श्रेणी सादर करण्यात आली आहे. हे सर्व प्रॉडक्ट्स ब्लिंकिटवर तसेच बोटच्या अधिकृत प्लॅटफॉर्मवर क्विक-डिलिव्हरीसाठी उपलब्ध आहेत, ज्यामुळे शेवटच्या क्षणी रक्षाबंधनाची खरेदी करणाऱ्यांसाठी हा पर्याय अत्यंत सोयीचा ठरणार आहे. या मोहिमेची संकल्पना ‘बोट’च्या इन-हाउस टीमने तयार केली असून ‘ड्रिफ्ट’कडून निर्मिती आणि रायहान मुहिमतुले यांनी दिग्दर्शन केले आहे.






