Charger Switch Left On? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
घरात लाईट बिल बघून सगळ्यांनाच घाम फुटतो. बिल जास्त आलं की आपण म्हणतो, फ्रिज जास्त चाललाय, एसी जास्त लावलाय. पण कधी कधी चोर घरातच असतो. तो चोर म्हणजे आपला चार्जर.बऱ्याच घरात अशी सवय असते. फोन चार्जिंगला लावला, 100% झाला की फोन उचलून घेतला, पण प्लग तसाच बोर्डात ठेवला. स्विच पण बंद केला नाही. लॅपटॉपचं पण तेच. काम झालं की लॅपटॉप बंद केला, पण त्याचा अडॅप्टर रात्रभर बोर्डातच. आपल्याला वाटतं, फोन नाहीये तर वीज कशी जाणार? पण वीज जातेच. Charger Switch Left On?
बोर्डातला स्विच चालू असेल तर चार्जर आतून वीज ओढतच राहतो. त्याला काही जोडलेलं नसलं तरी तो गपचूप वीज पित असतो. इंग्रजीत याला फँटम लोड किंवा व्हॅम्पायर ड्रॉ म्हणतात. म्हणजे भूतासारखी वीज. दिसत नाही, पण बिलात दिसते.साधं उदाहरण घ्या. तुम्ही नळ बंद केला नाही तर पाणी थेंब थेंब गळत राहतं. दिवसभरात बादली भरते. तसंच इथे पण आहे. एक चार्जर थोडी वीज घेतो, पण घरात 3-4 चार्जर, एक टीव्हीचा प्लग, एक वायफायचं राऊटर, एक स्पीकर… सगळे मिळून दिवस रात्र वीज खातात.
BSNL New Plans: दोन SIM वापरणाऱ्यांची चिंता मिटली! BSNL चे ‘हे’ तीन स्वस्त व्हॉइस प्लॅन लॉन्च
एका चार्जरचा हिशोब केला तर तो 0.1 ते 0.5 वॅट वीज घेतो. ऐकायला खूप कमी वाटतं. पण 24 तास, 30 दिवस याचा गुणाकार केला तर आकडा मोठा होतो. तज्ज्ञ सांगतात, अशा फुकट जाणाऱ्या विजेमुळे घराच्या एकूण विजेच्या 5 ते 10 टक्के वीज वाया जाते. म्हणजे 1000 रुपयांच्या बिलात 50 ते 100 रुपये असेच जातात. जर घरात जास्त उपकरणं असतील तर महिन्याच्या शेवटी 200 ते 500 रुपये जास्त बिल येऊ शकतं. वर्षाचा हिशोब केला तर 2400 ते 6000 रुपये फक्त या निष्काळजीपणामुळे जातात. विचार करा, तेवढ्या पैशात महिन्याचा किराणा येईल.मग काय करायचं?हे काही मोठं काम नाहीये. फक्त एक सवय लावायची आहे.
आजकाल मोबाईल, लॅपटॉप शिवाय कुणाचं चालत नाही. 12-13 तास ते चालूच असतात. त्यामुळे चार्जिंग तर करावंच लागणार. पण चार्जिंग झाल्यावर स्विच बंद करणं हे आपल्याच हातात आहे. त्यामुळे पुढच्या वेळी फोन काढताना फक्त फोन काढू नका, स्विच पण बंद करा. ही छोटीशी सवय तुमचे महिन्याला 200-500 रुपये वाचवेल. आणि लाईट बिल बघून धक्का पण बसणार नाही.
Ans: होय. स्विच सुरू असल्यास काही चार्जर उपकरण जोडलेले नसतानाही थोड्या प्रमाणात वीज वापरतात.
Ans: उपकरण वापरात नसतानाही ते प्लगला जोडलेले आणि स्विच सुरू असल्यामुळे होणाऱ्या वीज वापराला फँटम लोड म्हणतात.
Ans: उपकरणे बंद किंवा निष्क्रिय असतानाही होणाऱ्या अनावश्यक वीज वापराला व्हॅम्पायर ड्रॉ म्हणतात.






