Satara News:साताऱ्यात घर खरेदीसह गुंतवणुकीची संधी; साताऱ्यात २६ नोव्हेंबरपासून ‘रचना २०२६’ प्रदर्शन!
या प्रदर्शनात सुमारे १०० स्टॉल्स उभारण्यात येणार असून, घरापासून ते आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानापर्यंतचे विविध पर्याय एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. असोसिएशनचे चेअरमन कौस्तुभ मोरे व व्हाईस चेअरमन हर्षद वालावलकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. असोसिएशनचेसचिव निलेश शिंदे खजिनदार शरद जाधव समिती सदस्य रामदास जगताप सचिन देशमुख संतोष कुमार जगताप इत्यादी एवढी उपस्थित होते.
बिल्डर्स असोसिएशनच्या सातारा शाखेचे हे ३६ वे वर्ष असून, सातारा शहरासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना या प्रदर्शनाची उत्सुकता असते. सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत प्रदर्शन खुले राहणार आहे. प्रवेश विनामूल्य असला तरी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. https://vms.ruha.co.in/registration/rachana-visitor या लिंकवर नोंदणी करता येणार आहे.
असोसिएशनचे सचिव निलेश शिंदे यांनी सांगितले की, सातारा शहर आणि परिसरात प्रस्तावित आयटी पार्क, वाढता औद्योगिक विस्तार, मेडिकल कॉलेज तसेच विविध शासकीय प्रकल्पांमुळे बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आगामी काळात सातारा गुंतवणुकीचे महत्त्वाचे केंद्र बनू शकते. स्वतःचे घर घेऊ इच्छिणारे तसेच मालमत्तेमध्ये गुंतवणूक करू पाहणाऱ्यांसाठी ‘रचना २०२६’ महत्त्वाची संधी ठरेल.
या प्रदर्शनात बिल्डर्सचे विविध गृहप्रकल्प, किचन इक्विपमेंट्स, इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज, आधुनिक बांधकाम साहित्य, इंटेरिअर डिझाइन, स्विमिंग पूल, गार्डन संकल्पना आणि फिटनेस उपकरणांचे स्टॉल्स असतील. विविध बांधकाम व्यावसायिक आकर्षक योजनांसह सहभागी होणार असल्याने ग्राहकांना प्रकल्पांची तुलना करून निर्णय घेता येणार आहे. बँकिंग क्षेत्रातील गृहकर्ज पर्यायांची माहितीही ग्राहकांना मिळणार आहे.
New Hyundai Elantra 2027 Revealed: नवीन ह्युंदाई एलांट्रा मध्ये 157 PS Hybrid इंजिन, मोठी केबिन
‘ना नफा, ना तोटा’ या भूमिकेतून असोसिएशन हे प्रदर्शन आयोजित करत असून, बांधकाम व्यवसायाला चालना देणे आणि ग्राहकांना योग्य पर्याय उपलब्ध करून देणे हा त्यामागील उद्देश आहे. मुख्य प्रायोजक म्हणून स्कॉन इन्फ्रा प्रोजेक्ट्स एलएलपी, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कंग्राळकर असोसिएट्स, तर सहप्रायोजक म्हणून उथान एलिव्हेटर्स, नवनिर्मिती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि परफेक्ट हाऊस प्रा. लि. सहभागी झाले आहेत.
पत्रकार परिषदेला माजी स्टेट चेअरमन सचिन देशमुख, उपाध्यक्ष हर्षद वालावलकर, खजिनदार शरद जाधव, कौन्सिल मेंबर रामदास जगताप, संतोषकुमार जगताप यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. प्रदर्शनातील स्टॉल बुकिंगसाठी ९७६७०००६७० या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा baisatara.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले.
Ans: बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सातारा सेंटरच्या वतीने २६ ते २९ नोव्हेंबर दरम्यान सातारा येथील पोलिस परेड ग्राऊंडवर ‘रचना २०२६’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
Ans: हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत खुले राहणार आहे. प्रदर्शनासाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आहे; मात्र त्यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे.
Ans: इच्छुक नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी [https://vms.ruha.co.in/registration/rachana-visitor](https://vms.ruha.co.in/registration/rachana-visitor) या लिंकवर जाऊन आपली पूर्वनोंदणी करायची आहे.






