पहिल्यांदाच बाप्पासोबत चॅट करता येणार! फक्त ही एक स्टेप आणि तुमचेही मंडळ होईल डिजिटल
बदलत्या दुनियेत टेक्नॉलॉजी सुद्धा खूप पुढे जात चालली आहे. सध्या सगळीकडेच AI ची हवा दिसत आहे. आज प्रत्येक क्षेत्रात AI चा वापर होत आहे. याच AI च्या मदतीने ब्रँड्स मेकर संस्थेने हॅशटॅग बाप्पा या विशेष उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आता आपल्याला बाप्पासोबत चॅट करता येणार आहे.
मुंबईतील गणेशोत्सव म्हंटला तर बाप्पाचा जयघोष आणि सार्वजनिक मंडळांचे आकर्षक देखावे पहायला मिळतात. मुंबईतील या गणेश मंडळाचे दर्शन एकाच क्लिकवर आता होऊ शकणार आहे. गणेशोत्सव जागतिक दर्जावर पोहचवण्यासाठी ब्रँड्स मेकर संस्थेने एका छोटसं पाऊल उचललं आहे, हॅशटॅग बाप्पा या संकेतस्थळाद्वारे ते शक्य होणार आहे.
लवकरच लाँच होणार Samsung Galaxy S25 FE, स्पेसिफिकेशन्स आले समोर! जाणून घ्या सविस्तर
मुंबईत चाळ संस्कृतीपासून ते टॉवरपर्यत प्रत्येकाच्या घराघरात आणि मंडळात बाप्पा विराजमान झालेले दिसून येतात. मुंबईतील मानाच्या गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्याच मोठ्या रांगा लागलेल्या असतात. सार्वजनिक गणेश मंडळांची वाढती प्रसिद्धी पाहता, या सर्व गणपतींचे दर्शन घेण्यासाठी दहा दिवस देखील अपुरे पडतात. त्यामुळे राहून गेलेल्या तसेच घरबसल्या आपल्या आवडत्या मंडळातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी हॅशटॅग बाप्पा हे संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आले आहे. या संकेतस्थळामार्फत मुंबईतील कोणत्याही मानाच्या गणपतीचे एका क्लिकवर लाईव्ह दर्शन घेणे आता शक्य होणार आहे. क्यु आर कोड स्कँन करुन किंवा एन एफ सी कार्ड च्या माध्यमातून मुंबईतील कोणत्याही गणपती मंडळाची सविस्तर माहिती, मंडळाच्या उपक्रमांचा आढावा तसेच थेट प्रक्षेपण घेऊ शकता.
शासनाने यंदा सार्वजनिक गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे. ह्याच अनुषंगाने आपला उत्सव जास्तीतजास्त जनमानसात पोहचवला जावा म्हणून हॅश टॅग बाप्पा चळवळीचा जन्म झाला आहे.
पुन्हा Airtel ठप्प! दिल्ली ते मुंबई आणि बंगळुरूपर्यंत नेटवर्क डाऊन, लाखो ग्राहक हैराण
ब्रँड्स मेकर या संस्थेच्या माध्यमातून सन २०२३ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या शुभहस्ते गिरगावचा राजा चा पहिला क्यू आर कोड तयार करण्यात आला. मुंबईतील १६० अधिक मंडळ ह्या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. प्रथमच AI च्या माध्यमातून यंदा बाप्पा ही व्हॉट्स ॲप वर आपल्या शी जोडला जाणार आहे. प्रत्येक मंडळाचा गणपती बाप्पा आपल्या शी व्हॉट्स ॲप वर जोडला जाणार आहे. मंडळाच्या बाप्पाची आरती असो किंवा प्रसाद एक क्लिक वर आपल्या ला मिळू शकेल. तसेच अथर्वशीर्ष किंवा गणपती स्थापनेची पूजेची माहिती या सर्व उपयुक्त असा संग्रही ठेवा एका क्लिक वर सहज उपलब्ध होणार आहे.
गणपती बाप्पाचे व्हॉट्स ॲप चॅट बोट यंदा आकर्षणाचा नक्कीच भाग होऊ शकेल. आपल्या हवी असलेली आपल्या बाप्पा सर्व माहिती आता व्हॉट्स ॲप वर ही सहज भक्तांपर्यंत पोहचणार आहे. ९१३६१३६१५१ या क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही ही आपल्या मंडळाचे निःशुल्क रजिस्ट्रेशन करू शकता.