लवकरच लाँच होणार Samsung Galaxy S25 FE, स्पेसिफिकेशन्स आले समोर! जाणून घ्या सविस्तर
Samsung Galaxy S25 FE लवकरच भारतात लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोनची प्रचंड चर्चा सुरु झाली आहे. हा स्मार्टफोन आता लवकरच भारतात एंट्री करणार आहे. या स्मार्टफोनबाबत सतत नवीन अपडेट्स समोर येत आहेत. असं सांगितलं जात आहे की, हा Fan Edition स्मार्टफोन लवकरच लाँच केला जाणार आहे. अलीकडेच हँडसेटचे रेंडर्स लीक झाले आहेत. ज्यामध्ये या स्मार्टफोनची डिझाईन पाहायला मिळाली आहे. साउथ कोरियन टेक जायंटने या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबाबत सविस्तर माहिती दिली नाही. मात्र एका टिप्स्टरने गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या Samsung Galaxy S24 FE च्या सक्सेसरचे स्पेसिफिकेशन्स लीक केले आहेत. हा स्मार्टफोन 5 रंगात लाँच केला जाणार आहे.
टिप्स्टर अहमद कवैदर (@AhmedQwaider888) ने Samsung Galaxy S25 FE चे मेजर स्पेसिफिकेशन्स आणि त्याचे अपेक्षित कलर ऑप्शन्सबाबत एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, हा स्मार्टफोन नेवी, डार्क ब्लू, लाइट ब्लू, ब्लॅक आणि व्हाइट कलर ऑप्शन्समध्ये लाँच केला जाणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
टिप्सटरने असं देखील सांगितलं आहे की, हँडसेटमध्ये 6.7-इंच Dynamic AMOLED डिस्प्ले दिला जाणार आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,900 nits पीक ब्राइटनेस असणार आहे. Galaxy S25 FE च्या फ्रंट आणि रियर पॅनलमध्ये Gorilla Glass Victus+ प्रोटेक्शन देण्यात आले आहे. असं सांगितलं जात आहे की, Galaxy S25 FE स्मार्टफोन Samsung च्या Exynos 2400 प्रोसेसरसरह लाँच केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये 4,900mAh बॅटरी दिली जाऊ शकते, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हे आधीच्या लीक्सशी देखील जुळते, ज्यामध्ये फोनच्या बॅटरीबद्दल समान स्पेसिफिकेशनचा उल्लेख करण्यात आला होता. तथापि, आधी असे म्हटले होते की हा फोन Exynos 2400e चिपद्वारे चालवला जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार, अपकमिंग सॅमसंग Fan Edition स्मार्टफोन गेल्या वर्षीच्या मॉडेलपेक्षा ते 13 टक्के चांगले कूलिंग परफॉर्मन्स देखील देईल. फोटो आणि व्हिडिओसाठी, यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी शूटर, 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड-अँगल लेन्स आणि 3x ऑप्टिकल झूमसह 8-मेगापिक्सेलचा टेलिफोटो सेन्सर असेल. फ्रंटला, 12-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा असू शकतो.
हा फोन Android 16-बेस्ड One UI 8 वर चालणार आहे. या स्मार्टफोनमध्ये सॅमसंगचा AI-पावर्ड फीचर्स (Galaxy AI) देखील दिला जाणार आहे. Samsung Galaxy S25 FE ला धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP68 रेटिंग देखील मिळू शकते आणि त्यात Wi-Fi 6E कनेक्टिव्हिटी सपोर्ट देखील असेल. अलिकडच्या एका अहवालानुसार, Samsung Galaxy S25 FE या वर्षी 4 सप्टेंबर रोजी लाँच होऊ शकतो. याशिवाय, फोनची किंमत EUR 679 म्हणजेच सुमारे 69,000 रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे.