Airtel Down (Photo Credit- X)
Airtel Network Down: दिल्ली, मुंबई, बंगळूर आणि हैदराबादसारख्या प्रमुख शहरांमध्ये एअरटेलच्या ग्राहकांना आज (रविवार) पुन्हा एकदा नेटवर्क समस्यांचा सामना करावा लागला. कॉलिंग आणि इंटरनेट सेवा अनेक तास ठप्प (Airtel Network Down) झाल्यामुळे लाखो युजर्सना मोठा मनस्ताप झाला. गेल्या एका आठवड्यात दुसऱ्यांदा अशी घटना घडल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) वर एअरटेलबद्दल तक्रारींचा पूर आला आहे. वापरकर्त्यांनी कंपनीला टॅग केले आणि नेटवर्क कधी पूर्ववत होईल असे विचारले. काही लोकांनी असेही लिहिले की त्यांचे नेटवर्क सकाळी १० ते दुपारपर्यंत पूर्णपणे बंद होते आणि कंपनीकडून कोणतीही मदत मिळाली नाही.
Airtel network down across Karnataka since morning. No calls, no internet. Please fix this ASAP @airtelindia @Airtel_Presence #AirtelDown #Karnataka #airtel pic.twitter.com/9aRyoSAX6e
— Panchakshari Hiremath (@Panchakshari_SH) August 24, 2025
Airtel, what happened bro? Come back. Please.
— Danish Sait (@DanishSait) August 24, 2025
Is #Airtel network down? @airindia pic.twitter.com/MtqfwwgCWZ
— 𝙉𝙄𝙎𝘼𝙍 𝘼𝙃𝙀𝙈𝘼𝘿 (@nisar_ahemad45) August 24, 2025
या समस्येबाबत एअरटेलने एक निवेदन जारी केले आहे. कंपनीने म्हटले आहे की, “ही समस्या तात्पुरत्या कनेक्टिव्हिटीमुळे उद्भवली आहे आणि ती एका तासात दुरुस्त केली जाईल.” या निवेदनात कंपनीने ग्राहकांची गैरसोय झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, समस्या दूर झाल्यानंतर ग्राहकांनी आपला फोन रीस्टार्ट केल्यास सेवा पुन्हा सुरू होईल.
नेटवर्क आउटेजचा मागोवा घेणाऱ्या ‘Downdetector’ या वेबसाइटनुसार, एअरटेलची सेवा अनेक शहरांमध्ये बाधित झाली आहे. यामध्ये सर्वाधिक फटका दिल्ली, मुंबई, बंगळूर आणि हैदराबादसारख्या मोठ्या शहरांना बसला आहे. या शहरांतील ग्राहक फोन कॉल करू शकले नाहीत आणि इंटरनेटचा वापरही करू शकले नाहीत. सकाळच्या ११ वाजल्यापासून तक्रारींची संख्या अचानक वाढली आणि हजारोंनी तक्रारी नोंदवल्या गेल्या.
यापूर्वी, सोमवारी, 18 ऑगस्ट रोजी देखील देशभरात मोठ्या प्रमाणात नेटवर्क समस्या निर्माण झाली होती. त्या वेळी सुद्धा एअरटेलवर सर्वाधिक परिणाम झाला होता. Downdetector नुसार, त्या वेळी सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत ३,६०० पेक्षा जास्त तक्रारी नोंदवल्या गेल्या होत्या, तर सामान्यतः १५ पेक्षा कमी तक्रारी येतात.