आता अनोळखी नंबर ओळखण्यासाठी Truecaller ची गरज नाही! BSNL घेऊन येतोय जबरजस्त फीचर, यूजर्सना असा होणार फायदा
OnePlus चा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच! डिझाईन आणि फीचर्स आहेत टॉपक्लास… जाणून घ्या किंमत
दूरसंचार नियामक TRAI ने टेलीकॉम ऑपरेटर्सना CNAP सर्विस रोलआऊट करण्याचे निर्देश जारी केले आहेत. अनोळखी नंबरवरून येणाऱ्या फ्रॉड आणि स्कॅम कॉलची ओळख पटवण्यासाठी ही सर्विस रोलआऊट करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यामुळे जर यूजर्सकडे ट्रूकॉलर नसेल तरी देखील त्यांना समजू शकेल की त्यांना कोण कॉल करत आहे. ट्रायने दिलेल्या आदेशानुसार, एयरटेल, जियो आणि वोडाफोन आइडियाने ही सेवा वेगवेगळ्या टेलिकॉम सर्कल्समध्ये टप्प्याटप्प्याने सुरू केली आहे. भारत संचार निगम लिमिटेडने सध्या खाजगी टेलीकॉम ऑपरेटर्ससह मिळून CNAP सर्विसची चाचणी सुरु केली आहे. या क्षेत्रातील एका एग्जीक्यूटिवने असा दावा केला आहे की, बीएसएनएलने खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या मदतीने टप्प्याटप्प्याने प्रत्येक क्षेत्रात या सर्विसची चाचणी सुरु केली आहे. ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर पुढील 3 ते 4 महिन्यांमध्ये संपूर्ण भारतात ही सर्विस रोलआऊट केली जाईल. हे सोल्यूशन बीएसएनएलसाठी सीएनएपीकरिता सी-डॉटने विकसित केले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
CNAP म्हणजेच कॉलर नेम प्रेझेंटेशन सर्विसमध्ये फोनवर येणाऱ्या इनकमिंग कॉलमध्ये कॉलरचे नाव दर्शवले जाते. सिम खरेदी करताना कॉलरने जे नाव कस्टमर एक्वीजिशन फॉर्ममध्ये लिहीले आहे तेच नाव यूजरच्या स्क्रीनवर दर्शवले जाते. या सर्विसच्या मदतीने कोणत्याही अनोळखी कॉलरचे नाव यूजरच्या स्क्रीनवर दिसते. यामुळे स्कॅम आणि फ्रॉड कॉल्सपासून यूजर्सचे संरक्षण होऊ शकते. यापूर्वी टेलीकॉम ऑपरेटर्सने CNAP सर्विस सुरु करण्यास विरोध दर्शवला होता आणि सांगितलं होतं की, या सर्विसमुळे यूजर्सच्या प्रायव्हसीवर परिणाम होऊ शकतो. मात्र, ट्रायच्या शिफारशीनुसार ही सेवा नंतर सुरू केली जात आहे.
सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने अलीकडेच Vo WiFi सर्विस सुरु केली आहे. यामध्ये यूजर्सना नेटवर्क नसलेल्या ठिकाणी देखील कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. Vo WiFi म्हणजेच वॉइस ओवर वाय-फाय. या सर्विस अंतर्गत यूजर्सच्या डिव्हाईसमध्ये ब्रॉडबँड इंटरनेट म्हणजेच वायफाय कनेक्टिविटी असेल तरी देखील यूजर्स कॉल करू शकणार आहेत. अशा परिस्थितीत, कमी नेटवर्क असलेल्या भागातही यूजर्सच्या फोनवर येणारे महत्त्वाचे कॉल चुकणार नाहीत.






