Tech Tips: YouTube चॅनेलचे नावच ठरवणार व्ह्युज आणि सबस्क्रायबर्स! व्हायरल होण्यासाठी आत्ताच वाचा या सिक्रेट टिप्स
चॅनेलचे नाव बघितल्यानंतर समजले पाहिजे की तुमच्या चॅनेलवर कोणत्या प्रकारचा कंटेंट पोस्ट केला जाणार आहे. जर तुम्ही खेळासंबंधी कंटेंट तुमच्या चॅनेलवर पोस्ट करणार असाल तर चॅनेलचे नाव स्पोर्ट्ससंबंधित असले पाहिजे. यामुळे चॅनलचे नाव पाहतच पहिल्या नजरेतच लोकांना समजेल की त्यांना या ठिकाणी खेळासंबंधित व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. तुमच्या यूट्यूब चॅनेलचे नाव जर स्पोर्ट्ससंबंधित असेल आणि तुम्ही जेवणासंबंधित व्हिडिओ पोस्ट करत असाल तर युजर्स गोंधळात पडू शकतात.
तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनेलसाठी असे नाव निवडा जे समजण्यासाठी सोपे असेल, सहज लक्षात ठेवले जाऊ शकेल आणि दुसऱ्यांपेक्षा काही हटके असेल. जर तुम्ही मोठे किंवा कठीण निवडले तर काही लोकांना हे नाव वाचण्यात आणि लक्षात ठेवण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. यामुळे तुमचे युट्यूब सर्च कमी होऊ शकते. यामुळे तुमच्या यूट्यूब चॅनेलला स्पष्ट, छोटे आणि युनिक नाव द्या. ज्यामुळे लोक तुमचे चॅनेल अगदी सहज सर्च करू शकतील.
जर तुम्ही चॅनेलवरील कंटेटच्या हिशोबाने नावाची निवड केली तर व्हिडिओ जास्त व्हायरल होण्याची आणि तुमच्या व्हिडिओला जास्त व्ह्यू मिळण्याची शक्यता असते. जर तुमच्या चॅनलचे नाव आणि अपलोड केला जाणारा कंटेट दोन्ही एकसारखा असेल तर युट्यूबचे अल्गोरिदम तुमचा कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करते. यामुळे तुमचा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्याला जास्तीत जास्त व्ह्यूज मिळतात. तसेच तुमचे सबस्क्राइबर्स वाढण्यासाठी देखील मदत होते. यामुळे नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या चॅनलचे नाव कंटेंट संबंधित, छोटे, सोपे आणि हटके असले पाहिजे.






