Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता अनोळखी नंबर ओळखण्यासाठी Truecaller ची गरज नाही! BSNL घेऊन येतोय जबरजस्त फीचर, यूजर्सना असा होणार फायदा

बीएसएनएल त्यांच्या यूजर्ससाठी एक नवीन सर्विस लवकरच सुरु करणार आहे. या सर्विससाठी कंपनीने चाचणी देखील सुरु केली आहे. टप्प्याटप्प्याने प्रत्येक क्षेत्रात ही सर्विस सुरु केली जाणार आहे. या सर्विसबाबत अधिक जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 25, 2026 | 11:55 AM
BSNL ने आणला हटके प्लॅन; फक्त 51 रुपयांत 28 दिवसांची व्हॅलिडिटी अन् दररोज 2GB डेटा

BSNL ने आणला हटके प्लॅन; फक्त 51 रुपयांत 28 दिवसांची व्हॅलिडिटी अन् दररोज 2GB डेटा

Follow Us
Follow Us:
  • बीएसएनएलचे नवे फीचर! आता अनोळखी नंबरवरून कॉल आला तरी स्क्रीनवर दिसणार नाव
  • बीएसएनएल यूजर्ससाठी मोठी खुशखबर; ट्रूकॉलर शिवायही कॉलरचे नाव समजणार
  • अनोळखी कॉल ओळखणे झाले सोपे! बीएसएनएल लाँच करणार CNAP सर्विस
सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलने त्यांच्या यूजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच करण्याची तयारी सुरु केली आहे. सरकारी टेलीकॉम ऑपरेटरने CNAP म्हणजेच कॉलर नेम प्रजेंटेशनची चाचणी सुरु केली आहे. रिपोर्टनुसार, काही टेलिकॉम सर्कलमध्ये या नवीन फीचरची प्रायोरिटी बेसिसवर चाचणी केली जात आहे. खाजगी टेलिकॉम कंपन्या एअरटेल, जिओ आणि व्हीआयने अनेक टेलीकॉम सर्कलमध्ये यापूर्वीच CNAP सर्विस रोलआऊट केली आहे. या फीचरअंतर्गत यूजर्सना अनोळखी नंबरवरून कॉल आल्यावर समोरील व्यक्तीचे नाव स्क्रीनवर दिसते. यासाठी ट्रूकॉलरची देखील गरज नसते.

OnePlus चा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच! डिझाईन आणि फीचर्स आहेत टॉपक्लास… जाणून घ्या किंमत

बीएसएनएलच्या नव्या फीचरची सुरु

दूरसंचार नियामक TRAI ने टेलीकॉम ऑपरेटर्सना CNAP सर्विस रोलआऊट करण्याचे निर्देश जारी केले आहेत. अनोळखी नंबरवरून येणाऱ्या फ्रॉड आणि स्कॅम कॉलची ओळख पटवण्यासाठी ही सर्विस रोलआऊट करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यामुळे जर यूजर्सकडे ट्रूकॉलर नसेल तरी देखील त्यांना समजू शकेल की त्यांना कोण कॉल करत आहे. ट्रायने दिलेल्या आदेशानुसार, एयरटेल, जियो आणि वोडाफोन आइडियाने ही सेवा वेगवेगळ्या टेलिकॉम सर्कल्समध्ये टप्प्याटप्प्याने सुरू केली आहे. भारत संचार निगम लिमिटेडने सध्या खाजगी टेलीकॉम ऑपरेटर्ससह मिळून CNAP सर्विसची चाचणी सुरु केली आहे. या क्षेत्रातील एका एग्जीक्यूटिवने असा दावा केला आहे की, बीएसएनएलने खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या मदतीने टप्प्याटप्प्याने प्रत्येक क्षेत्रात या सर्विसची चाचणी सुरु केली आहे. ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर पुढील 3 ते 4 महिन्यांमध्ये संपूर्ण भारतात ही सर्विस रोलआऊट केली जाईल. हे सोल्यूशन बीएसएनएलसाठी सीएनएपीकरिता सी-डॉटने विकसित केले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

CNAP सर्विस काय आहे?

CNAP म्हणजेच कॉलर नेम प्रेझेंटेशन सर्विसमध्ये फोनवर येणाऱ्या इनकमिंग कॉलमध्ये कॉलरचे नाव दर्शवले जाते. सिम खरेदी करताना कॉलरने जे नाव कस्टमर एक्वीजिशन फॉर्ममध्ये लिहीले आहे तेच नाव यूजरच्या स्क्रीनवर दर्शवले जाते. या सर्विसच्या मदतीने कोणत्याही अनोळखी कॉलरचे नाव यूजरच्या स्क्रीनवर दिसते. यामुळे स्कॅम आणि फ्रॉड कॉल्सपासून यूजर्सचे संरक्षण होऊ शकते. यापूर्वी टेलीकॉम ऑपरेटर्सने CNAP सर्विस सुरु करण्यास विरोध दर्शवला होता आणि सांगितलं होतं की, या सर्विसमुळे यूजर्सच्या प्रायव्हसीवर परिणाम होऊ शकतो. मात्र, ट्रायच्या शिफारशीनुसार ही सेवा नंतर सुरू केली जात आहे.

Tech Tips: YouTube चॅनेलचे नावच ठरवणार व्ह्युज आणि सबस्क्रायबर्स! व्हायरल होण्यासाठी आत्ताच वाचा या सिक्रेट टिप्स

सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने अलीकडेच Vo WiFi सर्विस सुरु केली आहे. यामध्ये यूजर्सना नेटवर्क नसलेल्या ठिकाणी देखील कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. Vo WiFi म्हणजेच वॉइस ओवर वाय-फाय. या सर्विस अंतर्गत यूजर्सच्या डिव्हाईसमध्ये ब्रॉडबँड इंटरनेट म्हणजेच वायफाय कनेक्टिविटी असेल तरी देखील यूजर्स कॉल करू शकणार आहेत. अशा परिस्थितीत, कमी नेटवर्क असलेल्या भागातही यूजर्सच्या फोनवर येणारे महत्त्वाचे कॉल चुकणार नाहीत.

Web Title: Bsnl is planning to release new feature which help users to recognize unknown number tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • bsnl
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
1

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन
2

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या
3

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी
4

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.