Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL ने लाँच केला नवा सॅटेलाईट फोन; खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला घ्यावी लागणार परवानगी

सॅटेलाइट फोन उपग्रहाशी जोडलेला असतो. सिग्नल पाठवण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी त्याला मोबाईल नेटवर्कची आवश्यकता नसते. तो थेट उपग्रहाला सिग्नल पाठवतो आणि तिथून ते प्राप्त करतो.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 09, 2026 | 06:20 PM
BSNL ने लाँच केला नवा सॅटेलाईट फोन; खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला घ्यावी लागणार परवानगी

BSNL ने लाँच केला नवा सॅटेलाईट फोन; खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला घ्यावी लागणार परवानगी

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : देशातील एकमेव सरकारी मालकीची कंपनी बीएसएनएलने एक नवीन सॅटेलाइट फोन लाँच केला आहे. ज्या भागात मोबाईल नेटवर्क उपलब्ध नाही, तिथे हा फोन उपयुक्त ठरणार आहे. नावाप्रमाणेच, हा फोन सॅटेलाईटला जोडून काम करतो. बीएसएनएलने सांगितले की, हा हँडसेट जागतिक सॅटेलाइट नेटवर्क प्रोव्हायडर इनमारसॅटच्या भागीदारीत विकसित करण्यात आला आहे.

भारतात सॅटेलाईट फोन बाळगणे बेकायदेशीर आहे. जर तुम्ही तो खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला आधी सरकारी परवानगी घ्यावी लागेल. परवानगीशिवाय खरेदी केल्यास किंवा बाळगल्यास तुम्ही कायदेशीर अडचणीत येऊ शकता. बीएसएनएलच्या म्हणण्यानुसार, सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी असूनही हा फोन क्रिस्टल-क्लिअर व्हॉईस कॉलची सुविधा देईल आणि आपत्कालीन सपोर्टसह येतो. फोनची रचना मजबूत आणि टिकाऊ आहे, ज्यामुळे तो खाली पडल्यास तुटणार नाही आणि त्याची बॅटरी दीर्घकाळ टिकते.

बीएसएनएलने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, हा सॅटेलाइट फोन संरक्षण, सागरी, आपत्ती व्यवस्थापन, खाणकाम, दुर्गम भागातील कामकाज आणि साहसी प्रवासासाठी योग्य आहे. कंपनी सर्वसामान्यांसाठी त्याचे विपणन करत नाही. या सरकारी मालकीच्या सॅटेलाइट फोनची किंमत 134166 आहे. तुम्ही तो तुमच्या जवळच्या BSNL कार्यालयातून खरेदी करू शकता. मात्र, तो खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला दूरसंचार विभागाकडून परवानगी घ्यावी लागेल. याशिवाय, तुम्ही सॅटेलाइट फोन खरेदी करू शकणार नाही.

सॅटेलाइट फोन कसा काम करतो?

नावाप्रमाणेच, सॅटेलाइट फोन उपग्रहाशी जोडलेला असतो. सिग्नल पाठवण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी त्याला मोबाईल नेटवर्कची आवश्यकता नसते. तो थेट उपग्रहाला सिग्नल पाठवतो आणि तिथून ते प्राप्त करतो. यामुळे जिथे मोबाईल नेटवर्क नाही अशा ठिकाणी वापरण्यासाठी तो योग्य ठरतो. म्हणूनच त्याचा वापर जहाजांवर आणि इतर ठिकाणी केला जातो.

Samsung Galaxy A27 5G च्या विक्रीला भारतात सुरुवात

टेक कंपनी सॅमसंगने अलीकडेच लाँच केलेल्या सॅमसंग गॅलेक्सी ए२७ ५जी स्मार्टफोनची विक्री आता भारतात अधिकृतपणे सुरु करण्यात आली आहे. मिड रेंज किंमतीत लाँच करण्यात आलेला हा स्मार्टफोन आता ग्राहकांना ऑफर्स आणि डिस्काऊंटसह आणखी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

Meta Instagram Update : सरकारी नोटिसीनंतर Meta चा मोठा खुलासा! 40 लाखांहून अधिक संशयित अकाऊंट्स हटवल्याचा दावा

Web Title: Bsnl launches new satellite phone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • BSNL plan
  • technology news

संबंधित बातम्या

Phone Theft Protection: फोन चोरीला गेला तरी चोर करू शकणार नाहीत बंद! ‘हे’ सेटिंग लगेच करा ऑन
1

Phone Theft Protection: फोन चोरीला गेला तरी चोर करू शकणार नाहीत बंद! ‘हे’ सेटिंग लगेच करा ऑन

सरकारची सोशल मीडियावर नजर! पाच महिन्यांत तब्बल 1.95 लाख पोस्ट ब्लॉक करण्याचे आदेश, वाचा सविस्तर
2

सरकारची सोशल मीडियावर नजर! पाच महिन्यांत तब्बल 1.95 लाख पोस्ट ब्लॉक करण्याचे आदेश, वाचा सविस्तर

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स
3

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स

BSNL Recharge Plan: कंपनीचा 1 रुपयांचा प्लॅन पुन्हा सुरु! अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटासह मिळणार हे फायदे… जाणून घ्या
4

BSNL Recharge Plan: कंपनीचा 1 रुपयांचा प्लॅन पुन्हा सुरु! अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटासह मिळणार हे फायदे… जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.