Meta Instagram Update: सरकारी नोटिसीनंतर Meta चा मोठा खुलासा! 40 लाखांहून अधिक संशयित अकाऊंट्स हटवल्याचा दावा,
Vivo चा डबल धमाका! दोन नव्या स्मार्टफोनसह सर्वांनाच केलं चकित; जाणून घ्या प्रिमियम फीचर्स आणि किंमत
मेटाने ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे की, बाल लैंगिक शोषण हा एक अतिशय गंभीर गुन्हा आहे. कंपनी रोज त्यांच्या प्लॅटफॉर्मवर अशा कंटेटविरोधात कारवाई करते. कंपनीने म्हटलं आहे की, त्यांना भारतात इंस्टाग्राम जाहिरातींंसंदर्भातील अलीकडील अहवालांची माहिती आहे. त्यांच्या धोरणांचे उल्लंघन करणारी कोणतीही जाहिरात किंवा कंटेंट प्लॅटफॉर्मवरून वेळीच काढून टाकली जाते. (फोटो सौजन्य: Pinterest)
मेटाने दावा केला आहे की, गेल्या वर्षभरात त्यांनी जगभरात फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून 40 लाखांहून अधिक संशयास्पद अकाऊंट हटवले आहेत. याशिवाय, बाल लैंगिक शोषणासंबंधित 3.60 करोडहून अधिक कंटेट देखील हटविण्यात आला आहे. भारतातबाबत कंपनीने म्हटलं आहे की, गेल्या 6 महिन्यात एआय टूल्सच्या मदतीने 1.60 लाख अकाऊंट हटविण्यात आले आहेत, जे बाल लैंगिक शोषणासंबंधित संशयास्पद हालचालींची लिंक शेअर करत होते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 या दरम्यान फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून बाल लैंगिक शोषणासंबंधित 1 करोड 30 लाख कंटेंट हटविण्यात आला आहे. यामध्ये 96 टक्के कंटेट असा आहे, जो यूजर्सच्या तक्रारी प्राप्त होण्यापूर्वीच कंपनीने स्वत:च हटवला आहे.
मेटाने कंपनीवर करण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचे सांगत, म्हटलं आहे की, अयोग्य आवड असलेल्या लोकांना कंपनी जाणूनबूजून मुलांशी संबंधित जाहिराती दाखवते, हा आरोप मेटाने फेटाळून लावला आहे. कंपनीने म्हटलं आहे की, त्यांची सिस्टिम अशा संशयास्पद अकाऊंटची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तयार केली आहे. कंपनीने म्हटलं आहे की, त्यांच्या या सिस्टिमने नियम तोडणाऱ्या अनेक जाहिराती आणि त्यासंबंधित अकाऊंटवर आधीच कारवाई केली आहे. यादरम्यान, अनेक जाहिराती हटवण्यात आल्या आणि काही अकाऊंट देखील बंद करण्यात आले, तसेच आक्षेपार्ह कंटेंटशी संबंधित यूआरएल ब्लॉक करण्यात आले आहेत.
मेटाने सांगितलं आहे की, जेव्हा त्यांना कधीही मुलांशी संबंधित प्रकरण आढळते, तेव्हा त्याची माहिती, अमेरिकेची संथ्या NCMEC ला दिली जाते. भारतात ही माहिती NCMEC द्वारे राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलपर्यंत पोहोचवली जाते.
एका मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, इंस्टाग्रामवर बाल लैंगिक शोषणाशी संबंधित कंटेटला प्रोत्साहन देणाऱ्या आणि यूजर्सना इतर प्लॅटफॉर्मवर पुनर्निर्देशित करणाऱ्या सशुल्क जाहिराती सुरू होत्या, त्यानंतर हा वाद सुरू झाला. यानंतर, 4 जुलै रोजी, मंत्रालयाने मेटाला नोटीस बजावून, CSEAM शी संबंधित सर्व जाहिराती आणि मजकूर तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले. कंपनीला सात दिवसांच्या आत सविस्तर उत्तर सादर करण्यासही सांगण्यात आले. या नोटीसवर मेटाने अद्याप अधिकृतपणे उत्तर दिलं नसलं तरी याबाबत आता एक ब्लॉग पोस्ट शेअर करण्यात आली आहे.






