BSNL Offer: हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना मिळणार तब्बल 412 दिवसांची व्हॅलिडीटी! स्वातंत्र्य दिनानिमित्त कंपनीची खास ऑफर
कंपनीने त्यांच्या 2,399 रुपयांच्या प्लॅनवर एक खास ऑफर लागू केली आहे. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना आता जास्तीची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध असणार आहे, त्यामुळे जर तुम्हाला रिचार्ज प्लॅनसह जास्तीची व्हॅलिडिटी पाहिजे असेल तर घाई करावी लागणार आहे. तुम्ही जर असा एखादा प्लॅन शोधत असाल ज्यामध्ये दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि अनेक फायदे ऑफर केले जात असतील तर कंपनीचा हा प्लॅन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
This Independence Day, give yourself the freedom from frequent recharges. Get 412 days of BSNL connectivity with one recharge, including 47 extra days beyond a year. Recharge smart via #BReX 👉 https://t.co/SpaVXw85OI#BSNLIndia #StayConnected #InternetForEveryone #DigitalLife… pic.twitter.com/qGtt7WkKxS — BSNL India (@BSNLCorporate) August 13, 2026
बीएसएनएलच्या पोर्टफोलिओमध्ये 2,399 रुपयांचा एक प्लॅन उपलब्ध आहे. खरं तर या प्लॅनची व्हॅलिडिटी 365 दिवसांची आहे. पण कंपनी मर्यादित काळासाठी या प्लॅनच्या खरेदीवर 412 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करणार आहे. म्हणजेच यूजर्सना एकूण 47 दिवसांची जास्तीची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. ही ऑफर 12 ऑगस्ट 2026 पासून 12 सप्टेंबर 2026 पर्यंत उपलब्ध असणार आहे.
कंपनीच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड वॉयस कॉल्स आणि रोज 100 एसएमएसची सुविधा दिली जाणार आहे. तसेच यूजर्सना रोज डेली 2GB डेटा मिळणार आहे. डेटा लिमिट संपल्यानंतर स्पीड 40 kbps होणार आहे. हा प्लॅन खरेदी करण्यासाठी यूजर्सना स्टँडर्ड व्हॅलिडिटीसाठी दररोज अंदाजे 6.57 रुपये आणि अतिरिक्त वैधतेसह दररोज अंदाजे 5.82 रुपये खर्च करावे लागणार आहेत. कंपनीने 15 ऑगस्टच्या निमित्ताने हा खास प्लॅन सादर केला आहे.
कंपनी त्यांच्या यूजर्ससाठी सतत नवीन रिचार्ज प्लॅन सादर करत असते. विशेषत: खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलच्या रिचार्ज प्लॅनमध्ये कमी किंमतीत जास्त फायदे ऑफर केले जातात. यामुळेच सध्या अनेक यूजर्स बीएसएनएलची निवड करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

