सौजन्य - सोशल मिडीया
कोण होती नंदिनी?
नंदिनी ही तेलंगणातील विकाराबाद जिल्ह्यातील यलाल मंडळातील संगय्यापल्ली गावची रहिवासी होती. ती शिक्षणासाठी आणि क्रिकेटचे व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यासाठी विकाराबाद शहरातील मधु कॉलनी इथं तिच्या आजीकडे राहत होती. अभ्यासासोबतच ती क्रिकेटचा सराव करत होती. तिच्या मेहनतीला यश मिळालं आणि नुकतीच तिची BCCI अंडर-19 महिला क्रिकेट संघात निवड झाली होती. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरात आनंदाचं वातावरण होतं. भविष्यात भारतीय संघाकडून खेळण्याचं स्वप्न तिने पाहिलं होतं. मात्र, तिच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमीक माहितीनुसार, मृत नंदिनीने आपल्याच घरातील सिलिंग फॅनच्या हुकाला दुपट्ट्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. काही युवकांच्या सततच्या त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून या तरुण खेळाडूने आपले आयुष्य संपवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर कायदेशीर व पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करून शुक्रवारी सकाळी मृतदेह पोस्टमार्टम नंतर शोकाकुल कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला.
या अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटनेनंतर मृत नंदिनीच्या कुटुंबियांनी आणि संतप्त नातेवाईकांनी रस्त्यावर उतरत जोरदार निदर्शने केली. अनिल आणि कृष्णा नावाच्या दोन युवकांच्या सततच्या मानसिक त्रासाला व ब्लॅकमेलिंगला कंटाळूनच आपल्या मुलीने हे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. तसेच, या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कुटुंबियांनी लावून धरली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल व निष्पक्ष तपास करण्यासाठी विकाराबादचे सर्कल इन्स्पेक्टर रघु यांनी मृत नंदिनीचा मोबाईल जप्त केला असून, तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून तिला नेमका कोणी व कशा प्रकारे त्रास दिला होता, हे शोधून काढण्यासाठी तिचे इंस्टाग्राम अकाउंट आणि चॅट्स कसून तपासले जात आहेत. एका होतकरू व प्रतिभावान खेळाडूचा अशा प्रकारे अचानक अंत होणे क्रीडा जगतासाठी कधीही न भरून निघणारे नुकसान मानले जात आहे. पोलीस तपासातून समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारावर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Ans: नंदिनी ही तेलंगणातील विकाराबाद जिल्ह्यातील यालाल मंडलातील संगयापल्ली गावची रहिवासी होती. ती विकाराबाद शहरातील मधु कॉलनी येथे आजीकडे राहून शिक्षणासोबत क्रिकेटचे प्रशिक्षण घेत होती. नुकतीच तिची बीसीसीआय अंडर-19 महिला क्रिकेट संघात निवड झाली होती.
Ans: दोन युवकांच्या सततच्या मानसिक त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून नंदिनीने टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी निदर्शनांद्वारे केली आहे.
Ans: पोलिसांनी संशयास्पद मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. नंदिनीचा मोबाईल जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. तिचे इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲप अकाऊंट तपासून सोशल मीडियातून त्रास दिला जात होता का, याचा तपास सुरू आहे.






