144Hz रिफ्रेश रेट, दमदार कॅमेरा अन् मोठी बॅटरी! लवकरच येणार Vivo चा नवा स्मार्टफोन... लाँचपूर्वीच फीचर्स लीक
टेक कंपनी विवोची आगामी विवो एक्स500एस स्मार्टफोन सिरीज 26 नोव्हेंबर रोजी लाँच करण्याची शक्यता आहे. टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशन (DCS) ने विवोच्या आगामी स्मार्टफोनचे काही डिटेल्स शेअर केले आहेत. आगामी विवो एक्स500एस स्मार्टफोनमध्ये 6.85-इंच फ्लॅट एलटीपीओ डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचे रेजोल्यूशन 2K+ आणि रिफ्रेश रेट 144Hz पर्यंत असू शकते. विवोच्या आगामी स्मार्टफोनमध्ये 64-मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा मिळणार आहे, जो मिड-साइज सेंसर असणार आहे. असं सांगितलं जात आहे की, फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 9-सीरीज चिपसेट दिला जाऊ शकतो. आगामी स्मार्टफोनच्या प्रोसेसरबाबत अद्याप अचूक माहिती शेअर करण्यात आली नाही. (फोटो सौजन्य: Vivo)
आगामी विवो स्मार्टफोन मागील जेनरेशन Vivo X300s च्या तुलनेत मोठ्या बॅटरीसह बाजारात लाँच केला जाऊ शकतो. कमेंट सेक्शनमध्ये यूजर्सच्या प्रश्नांची उत्तरं देताना टिपस्टरने म्हटलं आहे की, एस व्हेरिअंटचा हा फोन मोठ्या डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. यापूर्वी टिपस्टरने वीवोच्या आगामी स्मार्टफोनटच्या डिस्प्ले स्पेसिफिकेशन्सबाबत माहिती शेअर केली होती.
विवो एक्स300एस स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच अमोलेड डिस्प्ले दिला होता, ज्याचे रेजोल्यूशन 1.5K आणि रिफ्रेश रेट 144Hz आहे. विवोचा हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सिटी 9500 चिपसेट आणि 7,100mAh बॅटरीसह लाँच करण्यात आला होता. फोनमध्ये 90W वायर्ड आणि 40W वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 200-मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि 50-मेगापिक्सेल सोनी LYTIA 602 पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा (3.5x ऑप्टिकल झूम) सपोर्ट देण्यात आला आहे. तर फोनमध्ये सेल्फीसाठी 50-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.
Ans: रिपोर्ट्सनुसार, Vivo X500 सीरिज 26 नोव्हेंबर रोजी लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनीने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.
Ans: या स्मार्टफोनमध्ये 6.85 इंचांचा फ्लॅट LTPO डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे.
Ans: फोनमध्ये 2K+ रिझोल्यूशन आणि 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले मिळू शकतो.






