BSNL Recharge Plan: किंमत कमी अन् फायदे जास्त! हा आहे कंपनीचा 72 दिवसांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन, डेली 2.5GB डेटासह मिळणार हे फायदे
कंपनीने त्यांच्या यूजर्ससाठी एक 72 दिवसांचा प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना डेली 2.5GB डेटा, कॉलिंग आणि मोफत एसएमएससह अनेक फायदे मिळणार आहेत. कंपनीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर या नवीन प्लॅनबाबत माहिती दिली आहे. तसेच हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्ससाठी एक विशेष ऑफर देखील सादर करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
बीएसएनएलने त्यांच्या एक्स अकाऊंटवर नवीन रिचार्ज प्लॅनबाबत घोषणा केली आहे. हा एक प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहे. भारत संचार निगम लिमिटेडच्या या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये 72 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. या प्रीपेड रिचार्ज प्लॅनची किंमत 485 रुपये आहे. कंपनीच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये मिळणाऱ्या फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर यूजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री नेशनल रोमिंगचा लाभ मिळणार आहे. याशिवाय यूजर्सना डेली 100 फ्री एसएमएसचा फायदा देखील मिळणार आहे.
कंपनीच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये 2.5GB डेटा ऑफर केला जाणार आहे. याव्यतिरिक्त, यूजर्सना BiTV चा ॲक्सेस देखील मिळतो, ज्यामध्ये लाईव्ह टीव्ही चॅनेल आणि ओटीटी ॲक्सेस उपलब्ध आहे. खरं तर या प्लॅनसह कंपनी एक ऑफर देखील घेऊन आली आहे. 31 मार्चपर्यंत हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना 2.5GB डेटा ऑफर केला जाणार आहे. मात्र त्यानंतर या प्लॅनमध्ये 2 GB डेटा ऑफर केला जाणार आहे. ही ऑफर 31 मार्चपर्यंत व्हॅलिड असणार आहे.
Get more data for the same price! BSNL ₹485 data bonus offer plan now gives 2.5 GB Data/day instead of 2 GB Data/day, unlimited calls, 100 SMS/day for 72 days. Stream, share, and stay connected without limits. Recharge smart via #BReX 👉 https://t.co/41wNbHpQ5c#BSNL… pic.twitter.com/J33EMlkljA — BSNL India (@BSNLCorporate) March 22, 2026
WhatsApp Update: काय सांगता! सीक्रेट मेसेज वाचल्यानंतर आपोआप होणार डिलीट, लवकरच येणार नवं फीचर
कंपनीने अलीकडेच त्यांच्या यूजर्ससाठी एक नवीन ऑफर लाँच केली आहे. या ऑफरअंतर्गत यूजर्सना 997 रुपयांच्या प्लॅनमध्ये 14 दिवसांची जास्तीची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. भारत संचार निगम लिमिटेडच्या या प्लॅनमध्ये सहसा 150 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. मात्र कंपनीने केलेल्या घोषणेनंतर आता या प्लॅनमध्ये 164 दिवसांची व्हॅलिडीटी मिळणार आहे. याव्यतिरिक्त, या बीएसएनएल प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि मोफत नॅशनल रोमिंगची सुविधा मिळते. यूजर्सना दररोज 2 जीबी डेटा आणि 100 मोफत एसएमएसचाही लाभ मिळतो.






