फक्त 35 रुपयांत मनोरंजनाची मेजवानी! Vi चा नवा प्लॅन यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर, डेटासह मिळणार या सुविधा
Vi ने सादर केलेला हा 35 रुपयांचा प्रीपेड प्लॅन, नऊ भारतीय भाषांमधील सहा सेवांच्या पर्यायांपैकी कोणत्याही दोन ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा ॲक्सेस ऑफर करतो. ज्यामध्ये सोनीलिव्ह साऊथ, चौपाल, मनोरमा मॅक्स, क्लिक, अड्डाटाइम्स, आणि Aao NXT समाविष्ट आहे. या ॲड ऑन पॅकमध्ये यूजर्सना 1GB डेटा देखील ऑफर केला जाणार आहे. हा प्लॅन 7 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह उपलब्ध आहे. मात्र यामधील एक विशेष ट्विस्ट म्हणजेच यूजर्सनी निवडलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा ॲक्सेस 28 दिवसांपर्यंत ॲक्टिव्ह असणार आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
कंपनीने लाँच केलेला हा 35 रुपयांचा प्रीपेड ॲड-ऑन पॅक ॲक्टिव्ह सर्विस व्हॅलिडीटी प्लॅन असणाऱ्या पात्र Vi प्रीपेड सब्सक्राइबर्ससाठी उपलब्ध आहे. सब्सक्राइबर्स त्यांच्या स्मार्टफोनवर Vi मूव्हीज अँड टीव्ही ॲपद्वारे कंटेंट स्ट्रीम करू शकतात. सोनीलिव्ह साऊथ तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड कंटेंट ऑफर करतात, तर चौपाल पंजाबी, हरियाणी आणि भोजपुरी एंटरटेनमेंट सादर करतो. मनोरमा मॅक्सवर मल्याळम चित्रपट आणि दूरदर्शन कंटेंट उपलब्ध आहेत, तर KLiKK आणि अड्डाटाइम्सवर बंगाली कंटेंट पाहायला मिळणार आहे. तसेच, Aao NXT वर ओडिया कंटेंट उपलब्ध आहे.
Vi सब्सक्राइबर्स त्यांच्या प्रादेशिक कंटेंट प्राधान्यानुसार, उपलब्ध यादीमधील कोणत्याही दोन सर्विसची निवड करू शकतात. पात्र Vi प्रीपेड कस्टमर्स Vi मोबाइल ॲपद्वारे किंवा सपोर्टेड थर्ड-पार्टी रीचार्ज प्लॅटफॉर्म्सद्वारे 35 रुपयांच्या ॲड ऑन पॅकद्वारे रिचार्ज करू शकतात. रिचार्ज केल्यानंतर यूजर्स Vi मुव्हिज अँड टिव्ही ॲप ओपन करू शकतात आणि त्यांच्या Vi मोबाईल नंबरचा वापर करून लॉगिन करू शकतात. यानंतर एंटरटेनमेंट फायदे मिळवण्यासाठी उपलब्ध पर्यायांमधून पसंतीनुसार दोन ओटीटी प्लॅटफॉर्म्सची निवड केली जाऊ शकते.
Ans: या प्लॅनमध्ये १GB डेटा आणि सहा पर्यायांपैकी कोणत्याही दोन OTT प्लॅटफॉर्म्सचा अॅक्सेस मिळतो.
Ans: या ॲड-ऑन पॅकची वैधता ७ दिवस आहे. मात्र, निवडलेल्या OTT प्लॅटफॉर्म्सचा अॅक्सेस २८ दिवसांपर्यंत मिळतो.
Ans: SonyLIV South, Chaupal, ManoramaMAX, KLiKK, AddaTimes आणि Aao NXT या सहा पर्यायांपैकी कोणतेही दोन प्लॅटफॉर्म निवडता येतात.






