
BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीच्या या प्लॅनला मिळाली यूजर्सची पसंती, केवळ इतक्या किंमतीत मिळणार 50 दिवसांची व्हॅलिडीटी
सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL च्या पोर्टफोलियोमध्ये अनेक असे रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत कमी पण फायदे जास्त आहेत. या प्लॅनमध्ये यूजर्सना कमी किंमतीत अनलिमिटेड कॉलिंग, डेटा सारखे इत्यादी फायदे ऑफर केले जातात. बीएसएनएलने डिसेंबर महिन्यातील टेरिफ प्लॅनची यादी जाहिर केली आहे. या यादीमध्ये कंपनीने त्यांच्या सर्व रिचार्ज प्लॅनची यादी शेअर केली आहे. कंपनीच्या या यादीमध्ये असा एक प्लॅन देखील आहे जो यूजर्सना 400 रुपयांहून कमी किंमतीत 50 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
BSNL च्या या प्लॅनमध्ये 50 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते आणि या प्लॅनची किंमत 347 रुपये आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमटेड वॉइस कॉलिंग आणि फ्री नॅशनल रोमिंगचा फायदा देखील मिळणार आहे. तसेच भारत संचार निगम लिमिटेड त्यांच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 2GB हाय स्पीड डेटा आणि 100 फ्री एसएमएस ऑफर करतात. म्हणजेच या प्लॅनमध्ये एकूण 100GB डेटाचा फायदा उपलब्ध आहे. एवढंच नाही कंपनीने या प्लॅनमध्ये यूजर्सना BiTV चा एक्सेस देखील ऑफर केला आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये यूजर्सना लाईव्ह टिव्ही चॅनल आणि फ्रीमध्ये ओटीटी अॅप्सचा अॅक्सेस देखील मिळणार आहे.
भारत संचार निगम लिमिटेड या 50 दिवसांच्या रिचार्ज प्लॅनव्यतिरिक्त कंपनीकडे 365 दिवसांचा प्लॅन देखील उपलब्ध आहे, ज्याची किंमत अत्यंत कमी आहे. 365 दिवसांच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि फ्री नेशनल रोमिंगचा फायदा देखील मिळणार आहे. भारत संचार निगम लिमिटेडच्या या स्वस्त प्लॅनमध्ये यूजर्सना डेली 2GB हाई स्पीड डेटा आणि 100 फ्री एसएमएसचा लाभ मिळणार आहे.
BSNL अत्यंत वेगाने त्यांचा नेटवर्क एक्सपांड करत आहे. सरकारी टेलीकॉम कंपनीने अलीकडेच 1 लाख नवीम 4G मोबाईल टॉवर लावण्याचे काम पूर्ण केले आहे. कंपनीचा 4G नेटवर्क पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून आहे आणि फ्यूचर रेडी आहे. म्हणजेच हे नेवटर्क 5G मध्ये अपग्रेड केले जाऊ शकते.
Ans: अद्याप BSNL 5G सर्वांसाठी सुरू नाही. 4G अपग्रेड पूर्ण झाल्यानंतर 5G रोलआउटची योजना आहे.
Ans: BSNL App, BSNL वेबसाइट, Paytm, GPay, PhonePe किंवा जवळच्या रिचार्ज स्टोअरवरून रिचार्ज करता येते.
Ans: होय. BSNL मध्ये 50GB, 100GB आणि LTE डेटा-फक्त प्लॅन्स उपलब्ध आहेत.