Airtel Recharge Plan: वर्षभर रिचार्ज करण्याची चिंता मिटली! हा आहे सुपरहिट अॅनुअल प्लॅन, परवडणाऱ्या किंमतीत मिळणार बरेच फायदे
तुम्ही देखील दिर्घकाळ व्हॅलिडीटी असलेल्या रिचार्ज प्लॅनच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता आम्ही तुम्हाला अशा एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्याची व्हॅलिडिटी 365 दिवस म्हणजेच संपूर्ण वर्षाची आहे. हा प्लॅन अशा यूजर्ससाठी बेस्ट ठरणार आहे, जे कमी किंमतीत दिर्घकाळ व्हॅलिडीटी, कॉलिंग आणि डेटा ऑफर करणारा प्लॅन शोधत आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
Airtel च्या 365 दिवसांच्या या अॅनुअल प्लॅनची किंमत 2249 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 1 वर्षाची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना कॉलिंग, डेटा आणि इतर अनेक फायदे दिले जाणार आहे. कंपनीच्या या 365 दिवसांच्या व्हॅलिडीटीवाल्या प्लॅनमध्ये कोणते फायदे ऑफर केले जाणार आहेत, याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
Airtel ने ग्राहकांना मंथली रिचार्जपासून सूटका मिळावी यासाठी बजेट किंमतीत अॅनुअल प्लॅन सादर केला आहे. एयरटेलच्या या प्लॅनची किंमत केवळ 2249 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना कमी किंमतीत वर्षभराची व्हॅलिडीटी ऑफर केली जात आहे. म्हणजेच हा रिचार्ज प्लॅन खरेदी केल्यानंतर यूजर्सना संपूर्ण वर्षभर रिचार्ज करण्याची चिंता नाही.
TRAI Report October 2025: Jio ने मारली बाजी, 20 लाख नवीन यूजर्स जोडले! Airtel नेही दाखवली आपली ताकद
Airtel च्या या प्लॅनमध्ये यूजर्सना व्हॉईस कॉल आणि इंटरनेट सारखे फायदे दिले जाणार आहेत. यासोबतच प्लॅनमध्ये यूजर्सना एका वर्षांपर्यंत कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग सारखे फायदे दिले जातात. यासोबतच, एका वर्षासाठी 3600 एसएमएस उपलब्ध आहेत. याचा अर्थ असा की यूजर्सना दरमहा 300 एसएमएस मिळतात.
Airtel त्यांच्या सुपरहिट अॅनुअल प्लॅनमध्ये यूजर्सना 30GB डेटा ऑफर करते. या प्लॅनसह यूजर्सना प्रत्येक महिन्याला 2.5GB डेटा ऑफर केला जाणार आहे. म्हणजेच एयरटेलचा प्लॅन अशा लोकांसाठी बेस्ट पर्याय ठरणार आहे, ज्यांना जास्त डेटाची आवश्यकता नसते. यासोबतच या प्लॅनमध्ये यूजर्सना Perplexity Pro चे फ्री सब्सक्रिप्शन देखील ऑफर केले जात आहे. Perplexity Pro च्या एका वर्षाच्या सब्सक्रिप्शन प्लॅनची किंमत 17000 रुपये आहे.
Ans: जर रक्कम कट झाली पण रिचार्ज झाला नसल्यास, वापरलेल्या प्लॅटफॉर्मवरून refund मिळतो किंवा Airtel Support शी संपर्क साधता येतो.
Ans: Airtel Thanks App → Services → Balance & Validity येथे तपासता येते.
Ans: Airtel Thanks App, UPI apps (GPay/Paytm/PhonePe), Airtel वेबसाइट किंवा दुकानातून रिचार्ज करता येतो.






