BSNL यूजर्सना झटका! कंपनीने कमी केली या प्लॅनची व्हॅलिडीटी, कोणत्या रिचार्ज प्लॅन्सचा समावेश , जाणून घ्या
भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने अलीकडेच एक नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केाला आहे, ज्याची किंमत केवळ 1 रुपये आहे. स्वतंत्र्यता दिनानिमित्त कंपनीने हा रिचार्ज प्लॅन खास त्यांच्या युजर्ससाठी आणला आहे. खरं तर गेल्या काही महिन्यात कंपनीच्या युजर्स संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. खराब नेटवर्क समस्येमुळे हजारो युजर्सनी BSNL ची साथ सोडली. त्यामुळे कंपनीचं मोठं नुकसान देखील झालं. आता BSNL ने नवे युजर्स आकर्षित करण्यासाठी आणि जुने युजर्स पुन्हा यावेत, यासाठी एक रुपयांच्या किंमतीत नवा रिचार्ज प्लॅन लाँच केला.
नवीन रिचार्ज प्लॅन चर्चेत असतानाच कंपनीने युजर्समध्ये लोकप्रिय असलेल्या एका रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच BSNL ने 197 रुपये आणि 99 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनच्या व्हॅलिडीटीमध्ये कपात केली होती, त्यामुळे अनेक युजर्सनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता कंपनीने आणखी एका रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, हा निर्णय 147 रुपयांच्या लोकप्रिय रिचार्ज प्लॅनसाठी घेण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
यापूर्वी जेव्हा कंपनीने 147 रुपयांचा रिचार्ज प्लॅन लाँच केला होता, तेव्हा त्याची व्हॅलिडीटी 30 दिवसांची होती. 147 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, फ्री नेशनल रोमिंग आणि 10GB हाय-स्पीड डेटा ऑफर केला जात होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजेच या प्लॅनमध्य मोफत SMS ची सुविधा दिली जात नाही. मात्र आता या 147 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी 5 दिवसांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता युजर्सना या 147 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 25 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. रिचार्ज प्लॅनमध्ये ऑफर केल्या जाणाऱ्या बेनिफिट्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. केवळ रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी कमी करण्यात आली आहे. कॉलिंग, रोमिंग आणि डेटा बेनिफिट्स अजूनही प्लॅनमध्ये समाविष्ट आहेत, परंतु वैधता कमी झाल्यामुळे, वापरकर्त्यांना वारंवार रिचार्ज करावे लागेल.
ज्याप्रमाणे भारतातील खाजगी टेलिकॉम कंपन्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत कोणताही बदल न करता केवळ प्लॅनची व्हॅलिडीटी कमी करतात, तीच कल्पना आता BSNL ने देखील लागू केली आहे. प्लॅनची किंमत तीच, केवळ व्हॅलिडीटी कमी करण्यात आली आहे. यापूर्वी कंपनीने 197 रुपये आणि 99 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनच्या व्हॅलिडीटीमध्ये कपात केली होती. 99 रुपयांचा रिचार्ज प्लॅन 18 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह लाँच करण्यात आला होता. मात्र कंपनीने या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी 15 दिवसांची केली. तर 197 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी 70 दिवसांची होती. मात्र आता 197 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी 54 दिवस करण्यात आली. कंपनीच्या या हालचालीकडे त्यांचे ARPU (Average Revenue Per User), म्हणजेच प्रति वापरकर्ता सरासरी कमाई वाढवण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.
BSNL ने कोणत्या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी कमी केली?
147 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी कमी केली.
147 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडीटी आता किती आहे?
25 दिवस
यापूर्वी BSNL ने कोणत्या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी कमी केली?
197 रुपये आणि 99 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी कमी केली.