Curved Display वाला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? OnePlus पासून Oppo पर्यंत, हे आहेत बेस्ट चॉईस
स्मार्टफोन क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली आहे. सध्या बाजारात विविध डिझाईनमध्ये स्मार्टफोन लाँच केले जात आहे. यामध्ये कर्व डिस्प्लेवाल्या स्मार्टफोनची सर्वात जास्त क्रेझ आहे. यापूर्वी कंपन्या केवळ प्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये कर्व डिस्प्ले ऑफर करत होत्या, मात्र आता मिड रेंज स्मार्टफोनमध्ये देखील कर्व डिस्प्ले ऑफर केला जात आहे. यामुळे केवळ युजर्सचा अनुभव सुधारत नाहीत तर फोनचा लूक देखील अनेक पटीने वाढतो.
OnePlus 13 स्मार्टफोन फ्लॅगशिप स्पेसिफिकेशनसह लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये कर्व डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये 6.82-इंच Quad HD+ (1,440 x 3,168 pixels) LTPO AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या फोनमध्ये 24 जीबीपर्यंत रॅमसह Snapdragon 8 Elite चिपसेट आणि 50 मेगापिक्सेलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 6000mAh बॅटरीसह 100W वार्ड फास्ट चार्जिंग आहे. फोनची किंमत 57,999 रुपयांपासून सुरु होते. (फोटो सौजन्य – Pinterest)
कर्व डिस्प्लेसह लाँच करण्यात आलेला Oppo Find X8 Pro स्मार्टफोन हा एक फ्लॅगशिप फोन आहे. यामध्ये 6.78-इंच फुल HD+ (1,264×2,780 pixels) LTPO AMOLED कर्व डिस्प्ले आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 9400 प्रोसेसर आणि 80W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 5910mAh बॅटरी देण्यात आली आहे. या फोनच्या मागील पॅनलमध्ये 50 मेगापिक्सेलचे 4 कॅमेरा सेन्सर आहेत. यासोबतच फोनच्या पुढील भागात 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनची सुरुवातीची किंमत 99,999 रुपये आहे.
Motorola Edge 60 Pro स्मार्टफोनमध्ये 4C कर्व डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये 6.67-इंच 1.5K (1,220 x 2,712 पिक्सल) 10-bit pOLED पॅनल आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 8350 Extreme चिपसेट आणि 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाले तर, यात 50 मेगापिक्सेल कॅमेरा सेटअप आहे. या फोनच्या पुढच्या बाजूला 50 मेगापिक्सेलचा लेन्स देखील उपलब्ध आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 29,999 रुपये आहे.
Vivo Y400 Pro 5G स्मार्टफोनबाबात कंपनीने दावा केला आहे की, हा सेगमेंटमधील सर्वात स्लिम 3D कर्व डिस्प्ले वाला स्मार्टफोन आहे. यामध्ये 6.77-इंच फुल-HD+ (1,080 x 2,392 पिक्सेल) 3D कर्व AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर आहे. यात 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. त्याच्या फ्रंटमध्ये 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल. फोनमध्ये 5500mAh बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 24,999 रुपये आहे.
Tecno Pova Curve 5G स्मार्टफोन कर्व डिस्प्लेवाला सर्वात अफोर्डेबल स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये 6.78-इंच फुल HD+ (1,080×2,436 pixels) कर्व AMOLED डिस्प्ले, MediaTek Dimensity 7300 Ultimate प्रोसेसर आणि 5,500mAh बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये 64-मेगापिक्सेलचा प्रायमरी आणि 13-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 15,999 रुपये आहे.