Phantom Ultimate G Fold Concept: Samsung ला टाकलं मागे! या कंपनीने लाँच केला ट्राय-फोल्ड फोन, अनोखी आहे डिझाईन
साउथ कोरिअन स्मार्टफोन ब्रँड सॅमसंग त्यांचा पहिला ट्राय फोल्ड स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहेत. हा स्मार्टफोन लवकरच लाँच केला जाईल, अशी चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. सॅमसंगच्या आगामी ट्राय फोल्ड फोनची चर्चा सुरु असतानाच आता टेक कंपनी Tecno ने त्यांचा ट्राय फोल्ड स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने Phantom Ultimate G Fold Concept या नावाने त्यांचा पहिला ट्राय-फोल्ड कॉन्सेप्ट फोन गुरुवारी लाँच केला आहे.
या फोनमध्ये इनवर्ड-फोल्डिंग डुअल-हिंज मॅकेनिज्म उपलब्ध आहे. Tecno Phantom Ultimate G Fold Concept मध्ये G-स्टाइल फोल्डिंग डिझाईन आहे. शिवाय या स्मार्टफोनची डिझाईन अतिशय युनिक आहे, जी युजर्सना आकर्षित करते. Tecno चा ट्राय-फोल्ड स्मार्टफोन सध्या कॉन्सेप्ट डिव्हाईस आहे. त्यामुळे Huawei Mate XT Ultimate हा जगातील एकमेव ट्राय-फोल्ड फोन आहे, जो सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहे. Transsion Holdings च्या सब्सिडियरीने त्यांच्या पहिल्या ट्राय-फोल्ड स्मार्टफोनच्या व्यावसायिक उपलब्धतेबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. Tecno Phantom Ultimate G Fold Concept हा स्मार्टफोन मोबाइल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2026 मध्ये सादर केला जाण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – X)
Meet TECNO’s latest tri-fold smartphone, the TECNO PHANTOM Ultimate G Fold Concept.
It’s a dual-screen, inward-folding tri-fold design and delivers a massive 9.94-inch display when unfolded. It’s just 11.49mm when folded and 3.49mm when unfolded. Crazy Stuff. pic.twitter.com/c54fNqlqNk
— Tech Bharat (Nitin Agarwal) (@techbharatco) July 17, 2025
Tecno Phantom Ultimate G Fold Concept हा Tecno चा पहिला ट्राय फोल्ड स्मार्टफोन आहे. यामध्ये G-स्टाइल फोल्डिंग डिझाईन देण्यात आलं आहे. त्याची मोठी इनर स्क्रीन दोन टप्प्यात फोल्ड होते आणि टेक्नोने म्हटलं आहे की ही डिझाईन स्क्रीनला फोल्ड अवस्थेत असताना स्क्रॅच आणि डॅमेजपासून सुरक्षित ठेवते. सेकेंडरी कव्हर डिस्प्ले सामान्य स्मार्टफोन स्क्रीनप्रमाणे काम करतो. यामध्ये कस्टम-डिझाइन्ड डुअल-हिंज सिस्टम देण्यात आले आहे, ज्यामध्ये एक छोटा वाटरड्रॉप हिंज आणि एक मोठा प्रायमरी हिंज आहे. फोल्डेड स्टेटमध्ये, छोटा हिंज स्क्रीनच्या उजव्या बाजूला आतून फोल्ड करतो, जसं बुक-स्टाइल फोल्डेबलमध्ये होते. यानंतर मोठा हिंज ऊर्वरित डिव्हाईसला वरून फोल्ड करतो.
Tecno Phantom Ultimate G Fold Concept मध्ये सेल्फ-लॉकिंग सिस्टम आहे, ज्यामुळे डिव्हाईस फोल्ड असताना गॅपलेस आणि सुरक्षित राहतो. Tecno Phantom Ultimate G Fold Concept चा मुख्य डिस्प्ले अनफोल्डेड स्टेटसाठी 9.94-इंच मोठा आहे. मोठे हिंज कस्टम ड्युअल-कॅम सेटअपला समर्थन देते जे मल्टी-अँगल होव्हरिंगला अनुमती देते. हे डिव्हाइसला पार्शियली फोल्डेड स्थितीत देखील कार्य करण्यास अनुमती देते. फोल्ड झाल्यानंतर Tecno Phantom Ultimate G Fold Concept ची जाडी 11.49mm आणि अनफोल्डेड स्थितीत त्याची जाडी 3.49mm आहे. Tecno ने दावा केला आहे की, हा जगातील सर्वात पातळ ट्राय-फोल्ड स्मार्टफोन बनला आहे. Huawei Mate XT Ultimate Design स्मार्टफोनची जाडी अनफोल्डेड स्थितीत 3.6mm आहे.
Tecno Phantom Ultimate G Fold Concept मध्ये कोणता चिपसेट देण्यात आला आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. असं सांगितलं जात आहे की, यामध्ये ‘हाय-परफॉर्मेंस चिपसेट’ आहे. या फोनमध्ये ट्रिपल-कॅमेरा सेटअप आहे. स्मार्टफोनमध्ये 5,000mAh हून अधिक पावरफुल बॅटरी दिली जाणार आहे. Tecno Phantom Ultimate G Fold Concept मध्ये अनेक AI-बेस्ड फीचर्स आहेत, ज्यामध्ये Tecno का इन-हाउस AI असिस्टेंट, Ella चा देखील समावेश आहे.