
डिजिटल क्रिएटर्सचे हाल! Canva–Picsart अचानक डाऊन, हजारो यूजर्सचा संताप; सोशल मीडियावर पोस्ट्सचा भडिमार
डिझाईन आणि एडीटींगसाठी वापरले जाणारे दोन लोकप्रिय प्लॅटफॉर्म कॅन्व्हा आणि पिक्सआर्ट अचानक डाऊन झाले आहेत. दोन्ही प्लॅटफॉर्म अचानक ठप्प झाल्यामुळे यूजर्स प्रचंड वैतागले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यूजर्स अनेक मिम्स शेअर करत आहेत. याशिवाय काही यूजर्सनी संताप देखील व्यक्त केला आहे. दोन्ही प्लॅटफॉर्म अचानक ठप्प झाल्याने अनेकांच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. अशी माहिती समोर आली आहे की, कॅन्व्हा आणि पिक्सआर्टसह अनेक इतर वेबसाईट देखील ठप्प झाल्या आहेत.
आज 5 डिसेंबर रोजी दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास यूजर्सच्या कॅन्व्हा डाऊन झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. त्यानंतर यूजर्सनी पिक्सआर्ट सर्च केले असता, तिथे देखील वेबसाईटवर उघडताच एरर दिसू लागले. दोन्ही डिझाईनिंग प्लॅटफॉर्म एकाच वेळी आणि अचानक डाऊन झाल्यामुळे यूजर्स प्रचंड वैतागले होते. दोन्ही प्लॅटफॉर्मचे लाखो यूजर्स आहेत. यूजर्स विविध कामांसाठी या दोन्ही प्लॅटफॉर्मचा वापर करतत असतात. मात्र दोन्ही एकाच वेळी डाऊन झाल्यामुळे यूजर्समध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवर पोस्ट शेअर करण्यास सुरुवात केली. सुमारे अर्ध्या तासानंतर कॅन्व्हा आणि पिक्सआर्ट पुन्हा सुरु झाले. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुम्ही एडीटर असाल किंवा तुम्हाला तुमच्या रोजच्या कामासाठी कॅन्व्हाची गरज पडत असेल, तर अचानक कॅन्व्हा बंद झाल्यामुळे तुम्ही देखील चिंतेत पडला असाल. आता आम्ही तुम्हाला काही पर्याय सांगणार आहोत, ज्यांचा वापर तुम्ही कॅन्व्हा आणि पिक्सआर्टचे अल्टरनेटिव्ह म्हणून करू शकता.
हा कॅन्व्हा आणि पिक्सआर्टचा लोकप्रिय पर्याय आहे. यामध्ये हजारो टेम्पलेट्स आहेत, तसेच सोशल मीडियासाठी पोस्ट, लोगो, पोस्टर्स आणि रील्स तयार करण्यासाठी हा पर्याय उत्तम आहे. यामध्ये AI-powered फीचर्स देखील देण्यात आले आहेत, ज्यामुळे पोस्ट डिझाईन करणं आणखी सोपं होतं.
एडीटींग आणि डिझाईन एकाच ठिकाणी करायचे असेल तर तुम्ही Fotor चा वापरस करू शकता. हा पिक्सआर्टचा उत्तम पर्याय मानला जातो. यामध्ये एआय बॅकग्राउंड रिमूव्हर, ब्युटी रीटचिंग आणि एचडी फिल्टर्स देण्यात आले आहेत.
मोबाईलवर पोस्टर, थंबनेल, फोटो एडिटिंग करायचे आहे, मग तुम्ही पिक्सलॅबचा वापर करू शकता. हा प्लॅटफॉर्म यूट्यूबर्स आणि क्रिएटर्समध्ये विशेष प्रसिद्ध आहे.
स्नॅपसिड हा फोटो एडीटींगसाठी एक पावरफुल पर्याय मानला जातो. यामध्ये प्रोफेशनल फोटोग्राफीसाठी उत्तम फीचर्स देण्यात आले आहे, जसे एचडीआर, कर्व्ह, लेन्स ब्लर, ट्यून इमेज.
एआय बॅकग्राउंड रिमूव्हल, उत्पादन फोटो आणि ई-कॉमर्स यासारख्या इमेजेस तयार करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म सर्वात उत्तम आहे.
CANVA IS DOWN! MY PROPOSALS! pic.twitter.com/oW5rX6HYBD — Niranjan Nakhate (@niranjannakhate) December 5, 2025
Is @canva down right now? Unable to access the editor. Anyone else experiencing this issue?#CanvaDown#CanvaNotWorking pic.twitter.com/hJ0ZAln6ba — Man Mohan Pal 🇮🇳 (@of2icalyurmohan) December 5, 2025