घड्याळ की रिंग? Casio घेऊन आलाय स्मार्ट रिंग! अनोखं डिझाईन आणि युनिक फीचर्सने सुसज्ज
जपानी कंपनी कॅसिओची घड्याळ जगप्रसिद्ध आहेत. कॅसिओची घड्याळ अतिशय युनिक आणि स्टायलिश असतात. कॅसिओच्या घड्याळांमुळे एक क्लासी लूक तर मिळतोच पण त्यासोबतच आपल्याला एक वेगळ्या प्रकाराचा आत्मविश्वास देखील अनुभवायला मिळतो. डिजीटल घड्याळांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कॅसिओने आता एक स्मार्ट रिंग लाँच केली आहे. स्मार्ट रिंगचं डिझाईन अगदी एखाद्या घड्याळासारखं आहे.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
सध्या डिजीटल घड्याळांची क्रेझ वाढली आहे. लोकं स्मार्टफोनसोबतच स्मार्टवॉच देखील वापरत आहेत. पण असे अनेकजण असतात त्यांना घड्याळ वापरायला आवडत नाही. अशा लोकांसाठी कॅसिओने लाँच केलेली ही रिंग फायदेशीर ठरू शकते. कॅसिओने लाँच केलेल्या या रिंगमध्ये एक घड्याळ आहे. यात लहान डिस्प्ले आणि क्लासिक डिझाइन आहे. या रिंगचे नाव CRW-001-1JR आहे. ही रिंग क्लासिक शैलीमध्ये वेळ दर्शवते. (फोटो सौजन्य – X)
Casio ने आपल्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त आपली स्मार्ट रिंग बाजारात लाँच केली आहे, ज्यामध्ये घड्याळ आहे. हि रिंग जपानमध्ये उपलब्ध असेल. कॅसिओच्या या रिंगमध्ये लहान डिस्प्लेमुळे, यात सात-सेगमेंट एलसीडी स्क्रीन आहे. यामध्ये यूजर्स तास, मिनिट आणि सेकंदात वेळ पाहू शकतात. हि रिंग इतर स्मार्ट रिंगसारखी नाही, ज्यामध्ये हार्ट रेट आणि हेल्थ ट्रॅकिंग सारखी वैशिष्ट्ये आहेत. सॅमसंगने नुकतीच एक स्मार्ट रिंग लाँच केली. ज्यामध्ये हार्ट रेट आणि हेल्थ ट्रॅकिंगसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. CRW-001-1JR रिंगमध्ये वेळ आणि डेटा बदलण्याची सुविधा देण्यात आली आहे.
कॅसिओच्या या रिंगमध्ये वापरकर्त्यांना तीन फंक्शनल बटणे पाहायला मिळतात. हे वापरकर्त्यांना वेळ आणि डेटा बदलण्याची सुविधा देते. या रिंगमध्ये स्टॉप वॉचची सुविधा देखील देण्यात आली आहे. ही रिंग वॉच जपानमध्ये उपलब्ध आहे.
कॅसिओच्या या रिंग वॉचमध्ये वापरकर्त्यांना लाईट आणि अलार्मची सुविधा मिळते. यात पॉवरसाठी एकच बॅटरी आहे. याबाबत कंपनीचा दावा आहे की, ही 2 वर्षे सहज टिकेल आणि बॅटरी खराब झाल्यानंतर ती सहजपणे बदलता येईल.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
खरं तर कंपनीने असं एक युनिक डिझाईन तयार केलं आहे, ज्यामध्ये लहान डिझाइनमध्ये एक मोठे घड्याळ समाविष्ट केले आहे. ही संपूर्ण रिंग एकच तुकडा आहे, ज्यामध्ये मेटल इंजेक्शन प्रक्रिया वापरली गेली आहे. वापरकर्त्यांना आराम देण्यासाठी आणि विविध आकारांसाठी स्ट्रेचेबल बँड वापरण्यात आले आहेत.
बाजारात कॅसिओची अनेक डिजीटल घड्याळ उपलब्ध आहेत. या घड्याळांमध्ये तुम्हाला हार्ट रेट आणि हेल्थ ट्रॅकिंगसारखे फीचर्स पाहायला मिळू शकतात. पण आता लाँच करण्यात आलेल्या स्मार्ट रिंगमध्ये या फीचर्सचा समावेश नाही.