PAN Card: पॅन कार्डसाठी अप्लाय करायचंय, पण प्रोसेस माहीत नाही? या सोप्या स्टेप्स फॉलो करा
आधार कार्डप्रमाणेच पॅन कार्ड देखील एक महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पॅनकार्डसाठी अप्लाय करू शकता. प्रत्येक भारतीय व्यक्तिसाठी पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी किंवा बँक अकाऊंट ओपन करण्यासाठी पॅन कार्डची आवश्यकता असते. वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपण पॅन कार्डसाठी अप्लाय करू शकता. यासाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींचा वापर करू शकता.
पॅन कार्डसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
अनेक सरकारी कामांसाठी तुमच्याकडे आधार कार्डसोबत पॅन कार्ड देखील असणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्याकडे पॅन कार्ड नसल्यास, तुम्ही काही मिनिटांत नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करू शकता. नवीन पॅनकार्ड बनवण्यासाठी नाममात्र खर्च येतो आणि काही दिवसांतच पॅन कार्ड तयार होऊन तुमच्या पत्त्यावर पोहोचते. येथे आम्ही तुम्हाला पॅन कार्डसाठी अर्ज करण्याची ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – pinterest)
तुम्हाला तुमचं पॅन कार्ड तयार करायचं असेल आणि यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू इच्छिता तर तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. अर्ज केल्यापासून साधारण 15 दिवसांत पॅन कार्ड पत्त्यावर वितरित केले जाते.
स्टेप1- NSDL किंवा UTIITSL पोर्टलवर जा.
स्टेप 2- नवीन पॅन पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 3- अर्ज प्रकारात ‘पॅन कार्ड फॉर्म 49A’ निवडा.
स्टेप 4- पेजवरील नाव, आडनाव, डीओबी आणि मोबाइल यांसारखी माहिती काळजीपूर्वक भरा.
स्टेप 5- प्रक्रिया सुरू करण्यासाठी, फॉर्म सबमिट केल्यानंतर, तुम्हाला प्रक्रिया शुल्क ऑनलाइन किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे भरावे लागेल.
स्टेप 6- पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला एक एकनॉलेजमेंट स्लिप मिळेल.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
स्टेप 7- आता तुम्हाला आधार ओटीपी ऑथंटिकेशन वापरून अर्जावर ई-स्वाक्षरी करावी लागेल. तुम्ही एनएसडीएल पॅन ऑफिस/यूटीआयआयटीएसएल ऑफिसला (कुरिअरद्वारे) आवश्यक कागदपत्रांसह अर्ज देखील पाठवू शकता.
स्टेप 8- वेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर, पॅन कार्ड क्रमांक जारी केला जातो. तुम्ही फक्त दोन तासांनंतर डिजिटल पॅन कार्ड डाउनलोड करू शकता, परंतु प्रत्यक्ष कार्ड येण्यासाठी किमान 15 दिवसांचा कालावधी लागतो.
तुम्ही जिल्हास्तरीय पॅन एजन्सीद्वारे पॅन कार्डसाठी ऑफलाइन अर्ज करू शकता. यासाठी सर्वप्रथम NSDL किंवा UTIITSL वेबसाइटवरून फॉर्म 49A डाउनलोड करावा लागेल. तुम्ही हा फॉर्म एजन्सीमधील एजंटकडून देखील मिळवू शकता. यानंतर, फॉर्म भरावा लागेल आणि आवश्यक कागदपत्रांसह NSDL/UTIITSL कार्यालयात सबमिट करावा लागेल. यासाठी काही शुल्क आकारले जाते. नवीन पॅन कार्ड वेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर 15 दिवसांत पत्त्यावर वितरित केले जाते. सरकारी कामांसाठी तुमच्याकडे आधार कार्डसोबत पॅन कार्ड देखील असणे अत्यंत आवश्यक आहे.