
भारतीय युजर्ससाठी OpenAI चे अविश्वसनीय गिफ्ट! 1 वर्षासाठी फ्री मिळणार ChatGPT Go चे सब्सक्रिप्शन, या प्रोसेसने करा क्लेम
तुम्ही देखील OpenAI च्या ChatGPT चा वापर करताय का? जर तुम्ही देखील OpenAI च्या ChatGPT चे युजर असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने एक मोठी घोषणा केली आहे. अलीकडेच कंपनीने सांगितलं आहे की, ChatGPT Go सब्सक्रिप्शन आता सर्व युजर्ससाठी एक वर्षापर्यंत फ्रीमध्ये उपलब्ध असणार आहे. काही दिवसांपूर्वीच ही घोषणा करण्यात आली होती. आता हि सर्विस भारतात देखील सुरु झाली आहे. आजपासून म्हणजेच 4 नोव्हेंबरपासून भारतातील युजर्स देखील ChatGPT Go चे मोफत सब्सक्रिप्शन क्लेम करू शकणार आहेत.
यापूर्वीच ChatGPT Go च्या प्लॅनची किंमत 399 रुपये प्रति महिना आणि याचे वर्षभराचे सबस्क्रिप्शन 4,788 रुपये होते. मात्र आता युजर्स एकही रुपये खर्च न करता ChatGPT Go चे मोफत सब्सक्रिप्शन क्लेम करू शकणार आहेत. या ऑफरचा फायदा घेण्यायासाठी तुम्हाला कोणत्याही खास डिव्हाईसची गरज नाही. यासाठी तुमच्याकडे केवळ 3 गोष्टी असणं गरजेचं आहे. ज्यामध्ये सर्वात आधी इंटरनेट वाला स्मार्टफोन किंवा लॅपटॉप असला पाहिजे. यासोबतच ChatGPT अॅप किंवा तुमच्याकडे एखादा वेब ब्राऊझर असणं गरजेचं आहे. यानंतर तुमच्याकडे तुमचे ChatGPT अकाऊंट पाहिजे जे Google ID द्वारे लॉगिन केले जाऊ शकते. तुमच्याकडे या तीन गोष्टी असतील तर तुम्ही ChatGPT Go चे 1 वर्षाचे सब्सक्रिप्शन फ्री मिळवू शकता. यासाठी तुम्हाला काही सोपी प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
ChatGPT Go प्लॅनमध्ये यूजर्सना OpenAI चे GPT-5 मॉडेलचा एक्सटेंडेड अॅक्सेस मिळणार आहे. ज्यामुळे चॅटबोटचा वापर करण्याचा अनुभव अधिक चांगला आणि पावरफुल बनणार आहे. यामध्ये युजर्सना अनेक फायदे देखील मिळणार आहेत. युजर्स या सब्सक्रिप्शनसह अधिकाधिक दीर्घ प्रॉम्प्ट्स आणि रिस्पॉन्सेस मिळू शकतात. तुम्हाला इमेज जनरेशन आणि फाइल एनालिसिस यासारख्या क्रिएटिव टूल्समध्ये देखील प्रवेश मिळतो. Python बेस्ड डेटा एनालिसिस टूल्स, एडवांस्ड यूजर्ससाठी अतिशय फायदेशीर आहेत. पर्सनलाइज्ड मेमोरी फीचर तुमची चॅट हिस्ट्री लक्षात ठेवतो आणि उत्तरं अधिक चांगली बनू शकतात.
ChatGPT म्हणजे काय?
ChatGPT ही OpenAI द्वारे विकसित केलेली AI भाषा मॉडेल आहे जी तुमच्या प्रश्नांना नैसर्गिक भाषेत उत्तर देऊ शकते, संभाषण करू शकते आणि माहिती, सल्ला, किंवा कल्पना देऊ शकते.
ChatGPT मोफत आहे का?
हो, ChatGPT ची बेसिक आवृत्ती मोफत उपलब्ध आहे. काही प्रगत फिचर्स किंवा प्रो आवृत्ती साठी सब्सक्रिप्शन लागू होऊ शकते.
ChatGPT कसे वापरायचे?
ChatGPT वेबसाईट किंवा मोबाइल अॅपवर लॉगिन करा. तुमचा प्रश्न किंवा संदेश टाईप करा. “Send” किंवा “Enter” बटणावर क्लिक करा. मॉडेल तुमच्या प्रश्नाचे उत्तर लगेच देईल.
ChatGPT कोणत्या भाषांमध्ये उपलब्ध आहे?
ChatGPT अनेक भाषांमध्ये संवाद साधू शकते, त्यात इंग्रजी, मराठी, हिंदी, स्पॅनिश, फ्रेंच इत्यादींचा समावेश आहे.