भारतीय विद्यार्थ्यांचा ChatGPT वापर पाहून OpenAI सुद्धा झालं चकित! उघड झालं मोठं गुपित, चॅटबोटला विचारले जातात हे प्रश्न
जगभरातील सर्वात लोकप्रिय AI चॅटबॉट्सपैकी एक म्हणजे ChatGPT. ChatGPT ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. ChatGPT चा वापर देखील मोठ्य प्रमाणात वाढला आहे. अमेरिकेनंतर भारत ChatGPT ची दुसरी मोठी बाजारपेठ बनले आहे. भारतातील ChatGPT ची वाढती लोकप्रियता पाहता OpenAI ने भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक खास उपक्रम सुरु केला आहे. “Chats for Students in India” या नावाने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. कंपनीने सांगितलं आहे की, या उपक्रमांतर्गत देशभरातील कॉलेजचे विद्यार्थी, विशेष IIT मद्रास, मणिपाल एकेडमी ऑफ हायर एजुकेशन (MAHE) आणि दिल्ली टेक्निकल कँपस सारख्या संस्थांचे विद्यार्थी ChatGPT चा वापर त्यांच्या अभ्यासासाठी कशाप्रकारे करतात, याबाबत रिसर्च करण्यात आला आहे.
OpenAI ने सांगितलं आहे की, भारतात ChatGPT चा सर्वाधिक वापर विद्यार्थी त्यांच्या अभ्यासासाठी करत असल्याचे आढळले आहे. विद्यार्थी ChatGPT कडून केवळ नोट्स किंवा असाइनमेंट्स नाही तर त्यांच्या परिक्षेची तयारी देखील करून घेत आहेत. ChatGPT चा वापर intellectual partner म्हणून केला जात आहे. जेणेकरून विद्यार्थी समस्या सोडवणे, विश्लेषणात्मक विचार आणि सर्जनशीलता यासारख्या वास्तविक जगातील कौशल्यांना विकसित करू शकतील. (फोटो सौजन्य – Pinterest)
OpenAI ने त्यांच्या वेबसाईटवर 54 अशी उदाहरण शेअर केली आहेत, ज्याचा वापर विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. जेणेकरून आपल्याला समजेल की, विद्यार्थी ChatGPT चा वापर कशा प्रकारे करत आहेत.
एका विद्यार्थ्याने ChatGPT मध्ये प्रोम्प्ट दिला होता की, “उद्या माझी Operating Systems क्लास टेस्ट आहे आणि मला या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायचं आहे. परीक्षेत 5 MCQ आणि 2 सिचुएशन-बेस्ड प्रश्न असतात. महत्त्वाचे विषय मला समजावून सांगा जेणेकरून मी लवकर आणि प्रभावीपणे शिकू शकेन.” या प्रश्नासोबत विद्यार्थ्याने संबंधित विषयाची PDF फाइल देखील जोडली जेणेकरून ChatGPT अचूक आणि संदर्भित उत्तरे देऊ शकेल.
एका विद्यार्थ्याने ChatGPT ला म्हटलं की, “माझी SEE परीक्षा सुरु होणार आहे. माझ्यासाठी अभ्यासाचे वेळापत्रक तयार कर, ज्यामध्ये रिवीजन, प्रॅक्टिस टेस्ट आणि विश्रांतीचा समावेश असेल. जेणेकरून मी लक्ष केंद्रित करू शकेन.” यामध्ये देखील विद्यार्थ्याने त्याचा सिलेबस अपलोड केला होता.
अनेक विद्यार्थी ChatGPT ला कठिण विषय सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी सांगतात. ज्यामुळे कठिण विषय अगदी सहज समजले जाऊ शकतात आणि विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करू शकतील.
एका प्रोम्प्टमध्ये विद्यार्थ्याने म्हटलं होतं की, “गोष्टी का तरंगतात ते मला समजावून सांगा, पण स्वतःला आर्किमिडीज म्हणून कल्पना करा.” यामुळे शिकणे मजेदार आणि संस्मरणीय झाले.
बरेच विद्यार्थी ChatGPT ला “माझे प्राध्यापक व्हा, माझ्या असाइनमेंट्सना ग्रेड द्या आणि मला कुठे सुधारणा हवी आहे ते सांगा” असे सांगतात.






