
ChatGPT ने दिलं सीक्रेट ख्रिसमस गिफ्ट! फक्त एक ईमोजी आणि सांताक्लॉज स्वत: बनवणार तुमचा व्हिडीओ, नवं अपडेट पाहून यूजर्स खूश
Open AI ने ख्रिसमसनिमित्त AI मॉडेल ChatGPT यूजर्ससाठी एक खास सरप्राईज लाँच केला आहे. कंपनीचे सीईओ सॅम अल्टमन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करत या सरप्राईजबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, युजर्सला चॅट जीपीटीमध्ये नवीन क्रिसमस इस्टर एग मिळणार आहे. ज्यामध्ये यूजर्ससाठी एक खास सरप्राईज व्हिडिओ तयार केला जाईल.
YouTube चा नवा प्रयोग! शॉर्ट्समधील Dislike बटणाची जागा बदलण्याची शक्यता, कंपनी करतेय मोठं प्लॅनिंग
यूजर ChatGPT ला जेव्हा गिफ्ट ईमोजी पाठवतील तेव्हा चॅटबोट त्यांना एक सेल्फी अपलोड करण्यास सांगेल. यानंतर Open AI चे पावरफुल व्हिडिओ जनरेशन मॉडल Sora ऍक्टिव्हेट होईल आणि तुम्ही अपलोड केलेल्या फोटोने एक शॉर्ट पर्सनलाईज क्रिसमस व्हिडिओ तयार करेल. सुमारे पाच मिनिटांत तयार होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांताक्लॉज देखील पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य – Pinterest)
व्हिडिओ सुरू होताच सांताक्लॉज तुमचे स्वागत करेल आणि एका मजेदार शैलीत तुमच्यासोबत गप्पा देखील मारेल. हे वर्ष तुमच्यासाठी Nice की Naughty म्हणजे चांगले की खोडकर कसे होते हे सांताक्लॉज तुम्हाला सांगणार आहे. तसेच काही युजरची सांताक्लॉज प्रशांत करतील आणि त्यांना काही आवडते गिफ्ट देखील देणार आहे. तर काही युजर्सला मस्करीसाठी विचित्र गिफ्ट दिले जातील. जसे की कोळसे किंवा आणखी काही. सध्या हे फीचर प्रत्येक अकाऊंटवर केवळ एकदाच उपलब्ध आहे.
पुन्हा प्रयत्न केल्यानंतर तुमचा जुना व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. काही युजर्सचे असे म्हणणे आहे की दुसऱ्या ईमोजी वापर केल्यास गिफ्टचे वेगळे वर्जन ऍक्टिव्ह केले जाऊ शकतात. हा व्हिडिओ तयार करताना यूजर्सना कोणताही क्रिएटिव्ह कंट्रोल मिळत नाही विजुवल आणि सांताक्लॉज सर्व काही Sora स्वतः तयार करते आणि व्हिडिओ अतिशय मजेदार बनवते.
या नव्या फीचरबाबत थोडक्यात सांगायचे झाले तर, चॅटजीपीटीमध्ये एक खास क्रिसमस इस्टर एग फीचर लाँच केला आहे. या फिचरमध्ये युजर्स फक्त एक गिफ्ट इमोजी पाठवून पर्सनलाइज क्रिसमस व्हिडिओ तयार करू शकतात. जेव्हा युजर चॅटजीपीटीमध्ये गिफ्ट इमोजी सेंड करतात तेव्हा त्यांना सेल्फी अपलोड करून सांगितले जाते आणि यानंतर Sora युजर्सचा पर्सनल व्हिडिओ तयार करते. हे फीचर अद्याप सर्व युजरसाठी उपलब्ध करण्यात आलेलं नाही. त्यामुळे अजूनही काही यूजर्स या नवीन फीचरची प्रतिक्षा करत आहेत. लवकरच हे फीचर सर्व यूजर्ससाठी जारी केलं जाणार आहे. ज्यामुळे यंदाचा ख्रिसमस यूजर्ससाठी अतिशय खास ठरणार आहे.
Ans: प्रश्नांची उत्तरं, लेखन, कल्पना, अभ्यास आणि माहिती मिळवण्यासाठी
Ans: हो, फ्री व्हर्जन उपलब्ध आहे; पेड प्लॅनही आहेत.
Ans: नेहमी नाही; काही फीचर्समध्येच वेब अॅक्सेस असतो.