Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनी वैज्ञानिकांचा धमाका! स्पेसपासून पृथ्वीपर्यंत मिळणार सर्वांना Internet, Starlink पेक्षा 5 पटीने वेग

या तंत्रज्ञानाची खास गोष्ट म्हणजे पृथ्वीच्या वातावरणामुळे येणाऱ्या अडथळ्यांना न जुमानता ते १ गिगाबिट प्रति सेकंद (Gbps) वेगाने डेटा प्रसारित करू शकते. Starlink पेक्षाही अधिक चांगली टेक्नॉलॉजी

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 24, 2025 | 12:46 PM
स्टारलिंकसारख्या विद्यमान तंत्रज्ञानापेक्षा खूपच प्रगत इंटरनेट (फोटो सौजन्य - Google Gemini AI)

स्टारलिंकसारख्या विद्यमान तंत्रज्ञानापेक्षा खूपच प्रगत इंटरनेट (फोटो सौजन्य - Google Gemini AI)

Follow Us
Close
Follow Us:

चिनी शास्त्रज्ञांच्या एका पथकाने उपग्रह लेसर कम्युनिकेशनचे एक नवीन तंत्रज्ञान विकसित केली आहे, म्हणजेच उपग्रहावरून पृथ्वीवर डेटा पाठवणे, ज्यामुळे इंटरनेटचा वेग स्टारलिंकपेक्षा जास्त होऊ शकतो. या तंत्रज्ञानाची खास गोष्ट म्हणजे पृथ्वीच्या वातावरणामुळे येणाऱ्या अडथळ्यांना न जुमानता ते १ गिगाबिट प्रति सेकंद (Gbps) वेगाने डेटा प्रसारित करू शकते. ही क्षमता सध्या स्टारलिंकसारख्या विद्यमान तंत्रज्ञानापेक्षा खूपच चांगली आहे, जी सध्या मेगाबिट श्रेणीत वेग प्रदान करते असे सांगण्यात आले आहे 

हे संशोधन चीनच्या बीजिंग युनिव्हर्सिटी ऑफ पोस्ट अँड टेलिकम्युनिकेशन्सचे वू जियान आणि Chinese Academy of Sciences चे लिऊ चाओ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. शास्त्रज्ञांनी पृथ्वीपासून ३६,००० किलोमीटर उंचीवर असलेल्या उपग्रहावरून हे डेटा ट्रान्समिशन केले आणि फक्त २ वॅटच्या लेसर बीमचा वापर केला. (फोटो सौजन्य – Google Gemini AI)

कुठे केली चाचणी

ही चाचणी चीनमधील लिजियांग शहरातील एका संशोधन सुविधेत घेण्यात आली, जिथे १.८ मीटर दुर्बिणीचा वापर करण्यात आला. या प्रयोगातील सर्वात मोठे आव्हान वातावरणातील अशांतता (Atmospheric Turbulence) होती, जी लेसर सिग्नल कमकुवत करते आणि डिस्टॉर्ट करते.

AI+ ची एंट्री स्मार्टफोन मार्केटला टाकणार हादरवून, येत आहेत AI फीचर्सने लोडेड असलेले धमाकेदार फोन

इतका वेग कसा मिळाला?

या समस्येचे निराकरण करण्यासाठी, शास्त्रज्ञांनी दोन विशेष तंत्रांचा वापर केला:

  1. Adaptive Optics (AO) – हे तंत्र लेसर बीमच्या डिस्टॉर्ट वेव्हफ्रंटला योग्य आकार देते
  2. Mode Diversity Reception (MDR) – हे सिग्नलला अनेक चॅनेलमध्ये विभाजित करते आणि एकाच वेळी कॅप्चर करते

या दोघांना एकत्र करून तयार केलेल्या AO-MDR तंत्रामुळे सिग्नलची ताकद वाढलीच नाही तर ट्रान्समिशनची विश्वासार्हता देखील सुधारली. संशोधनात असे म्हटले आहे की या नवीन प्रणालीमुळे सिग्नल रिसेप्शनचा यशस्वी दर ७२% वरून ९१% पेक्षा जास्त झाला आहे.

कोणत्या प्रकारची उपकरणे वापरली गेली?

  • दुर्बिणीत ३५७ मायक्रो-मिरर होते, जे लेसरची दिशा आणि वेव्हफ्रंट सुधारतात
  • मल्टी-प्लेन कन्व्हर्टरद्वारे सिग्नल ८ चॅनेलमध्ये विभागला गेला
  • एका कस्टम अल्गोरिथमने त्या चॅनेलमधून ३ सर्वात मजबूत सिग्नल निवडले आणि त्याद्वारे डेटा ट्रान्सफर केला.

हे भविष्यातील इंटरनेट असेल का?

चीन यापूर्वी लेसर-आधारित उपग्रह संप्रेषणात पुढे होता. २०२० मध्ये, चीनच्या शिजियान-२० उपग्रहाने १०Gbps चा विक्रमी लेसर वेग गाठला. तथापि, तेव्हा वापरल्या जाणाऱ्या पॉवर तपशीलांची माहिती अद्याप सार्वजनिक केलेली नाही.

परंतु या नवीन तंत्रज्ञानावरून हे स्पष्ट होते की भविष्यात आपण उपग्रहाद्वारे खूप जलद आणि विश्वासार्ह इंटरनेट कनेक्शन मिळवू शकतो, तेही फायबर किंवा मोबाइल टॉवरशिवाय. त्यामुळे आता अधिकाधिक प्रगती होत असलेली दिसून येत आहे. 

Mark Zuckerberg ने लाँच केले AI स्मार्ट ग्लासेस! 8 तासापर्यंत मिळणार फुल चार्ज, जाणून घ्या किंमत

Web Title: Chinese researcher revealed 5 times faster china laser satellite internet than starlink technology news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 12:46 PM

Topics:  

  • internet
  • Starlink Internet Service
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: अरेरे! पुन्हा विसरलात Wi-Fi चा पासवर्ड? Don’t Worry… अँड्रॉईड असो किंवा आयफोन, फक्त फॉलो करा या स्टेप्स
1

Tech Tips: अरेरे! पुन्हा विसरलात Wi-Fi चा पासवर्ड? Don’t Worry… अँड्रॉईड असो किंवा आयफोन, फक्त फॉलो करा या स्टेप्स

Gemini AI मध्ये येणार Nano Banana चं नवीन वर्जन! लवकरच बदलणार डिजिटल क्रिएशनचा खेळ, Google करणार कमाल
2

Gemini AI मध्ये येणार Nano Banana चं नवीन वर्जन! लवकरच बदलणार डिजिटल क्रिएशनचा खेळ, Google करणार कमाल

Today’s Google Doodle: आजचे डूडल बोलतंय गणिताची भाषा, क्रिएटिव्ह पद्धतीने सेलिब्रेट केलं Quadratic Equation
3

Today’s Google Doodle: आजचे डूडल बोलतंय गणिताची भाषा, क्रिएटिव्ह पद्धतीने सेलिब्रेट केलं Quadratic Equation

Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार आज हे स्पेशल रिवॉर्ड्स, लवकरात लवकर क्लेम करा आजचे रिडीम कोड्स
4

Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार आज हे स्पेशल रिवॉर्ड्स, लवकरात लवकर क्लेम करा आजचे रिडीम कोड्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.